crop insurance application pdf 2024 नुकसान भरपाई अर्ज असा भरा

crop insurance application pdf 2024 नुकसान भरपाई अर्ज असा भरा

शेतकरी बंधुंनो crop insurance application pdf म्हणजेच पिक विमा नुकसान भरपाई 2021 form कसा भरावा लागतो, त्यामध्ये कोणकोणती माहिती लिहावी लगते, ती कोणत्या ठिकाणी सादर करावी लागते या संदर्भात या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत. हि माहिती अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा या लेखाच्या सर्वात शेवटी crop insurance application pdf मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तो फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.

पिक नुकसानीसाठी पिक विमा कंपनीकडे दावा करा

सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र धो धो पाऊस सुरु आहे. या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

अशावेळी तुम्ही जर तुमच्या पिकांचा पिक विमा काढलेला असेल तर तुम्ही लगेच पिक नुकसान भरपाईसाठी दावा करू शकता. मित्रांनो शेतकरी बांधवांना शेती करत असतांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. नैसर्गिक संकटामुळे जर शेतीमधील पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी त्यांच्या पिक नुकसानीसाठी पिक विमा कंपनीकडे दावा करू शकतात.

विविध माहितीसाठी Whatsapp group मध्ये जॉईन व्हा.

पिक विमा नुकसान भरपाईसाठी दावा करण्याच्या पद्धती.

मित्रांनो तुमच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असेल तुम्ही खालील तीन प्रकारे पिक नुकसान भरपाईसाठी दावा करू शकता.

  • crop insurance mobile application
  • call center
  • offline crop insurance application.
crop insurance application pdf

crop insurance application क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲप्लिकेशन

क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून तुम्ही कशा प्रकारे पिक नुकसानीचा दावा करू शकतात या संदर्भातील माहितीचा व्हिडीओ तुम्हाला बघायचा असेल तर खालील लिंकवर टच करा.

तुमच्या मोबाईलमधील crop insurance application चा उपयोग करून तुम्ही लगेच हा दावा पिक विमा कंपनीकडे करू शकतात. क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲप्लिकेशनचा कसा उपयोग करायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील लिंकला टच करून तुम्ही बघू शकता.

क्रॉप इन्सुरन्स मोबाईल ॲप्लिकेशन

offline crop insurance application कार्यालयात जावून पिक नुकसानीची माहिती देणे

शेतकरी बंधुंनो आपण यावरच आज चर्चा करणार आहोत कि कशाप्रकारे तुम्ही पिक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जावून तुमच्या पिक नुकसानभरपाईसाठी दावा करू शकतात. मित्रांनो पिक नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत तुम्हाला हि माहिती तुमच्या तालुक्यातील पिक विमा कंपनीस कळवायची आहे.

खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • पिक विमा काढलेल्या पावतीचा क्रमांक enrollment application no या रकान्यामध्ये टाका.
  • शेतकऱ्यांच्या तपशिलामध्ये शेतकऱ्याचे नाव, वडिलांचे नाव, शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाका.
  • शेतकरी तपशील आणि बँक प्रकारामध्ये जिल्हा, तालुका, महसूल मंडळ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, गाव, प्रभावित सर्वेक्षण क्रमांक, विमा संरक्षित क्षेत्र, प्रभावित पिकाचे नाव, प्रभावित पिकांच्या पेरणीची तारीख इत्यादी माहिती अगदी बिनचूक शेतकरी बांधवाना भरायची आहे.
  • पिकाच्या नुकसानीचे तपशील या रकान्यामध्ये कोणत्या कारणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे ते कारण निवडायचे आहे.
  • आणि सर्वात शेवटी या अर्जासोबत तुम्हाला पिक विमा नोंदणी पावती, बँक पासबुक व आधार कार्डची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे.

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

crop insurance application दोन प्रतीमध्ये सादर करा.

वरील प्रमाणे पिक नुकसानीची सर्व माहिती भरल्यानंतर हा पिक विमा नुकसान भरपाई अर्ज दोन प्रतीमध्ये पिक विमा कंपनीकडे सादर करायची आहे. एक प्रत कंपनीकडे सादर करायची आहे आणि दुसरी प्रत पोहोच पावती म्हणून शेतकऱ्याने स्वतःकडे ठेवायची आहे. पिक विमा नुकसान भरपाई फॉर्म तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *