Yuva Parivartan युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने पुरस्कार

Yuva Parivartan युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने पुरस्कार

दादाराव गावंडे यांना Yuva Parivartan युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने पुरस्कार मिळाला. युवा परिवर्तन संस्थेच्या वतीने संपूर्ण देशामध्ये विविध कौशल्यपूर्ण शासकीय कोर्सेस शिकविल्या जातात. ही संस्था भारतातील वेगवेगळ्या १७ राज्यामध्ये कार्यरत आहे. ग्रामीण भागातील बेरोजगार युवक व युवतींना रोजगारक्षम कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देतात. युवा परिवर्तन संस्थेच्यावतीने भोकरदन रिजनमध्ये बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने ऑनलाईन शेळी पालन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल डीजी युट्युब चॅनलची या शेळी पालन प्रशिक्षणासाठी टेक्निकल मदत घेण्यात आली होती.

Yuva Parivartan संस्थेच्या वतीने भोकरदन तालुक्यामध्ये शेळी पालन प्रशिक्षण

भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये विविध सोशल मिडिया कॅम्पेन आयोजित करून तरुणांना या प्रशिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. वेबसाईट आर्टिकल, ऑनलाइन गुगल फॉर्म, व्हिडीओ प्रमोशन इत्यादी क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी केल्यामुळे संस्थेच्या भोकरदन सेंटर प्रमुख सौ. संपदा नळणीकर, डिजिटल डीजी युट्युब चॅनलतर्फे दादाराव गावंडे व उत्कृष्ठ व्हिडीओग्राफीसाठी गोपाल पालकर यांना औरंगाबाद येथील हॉटेल शगुन एक्झिकेटिव्ह येथे संस्थेचे सिनीअर डायरेक्टर अजित परब व मराठवाडा विभागीय अधिकारी कैलास जोगळेकर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. ( आमचा teligram group जॉईन करा. )

Yuva Parivartan

whatsapp group मध्ये सामील व्हा आणि योजनांची माहिती मिळवा अगदी मोफत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *