जाणून घेवूयात विहीर बांधकाम अनुदान vihir bandhkam anudan yojana योजना अर्ज संदर्भात सविस्तर माहिती.
तुम्हाला जर विहीर बांधकाम करायची असेल तर त्यासाठी शासकीय अनुदान मिळते. तुम्हाला जर प्रश्न पडला असेल कि यासाठी अर्ज कोठे आणि कसा करावा, अर्ज ऑफलाईन आहे कि ऑनलाईन तर काळजी करू नका या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर तर खोदतात परंतु त्या विहिरीचे बांधकाम केले गेले नाही तर विहीर ढासळून विहिरीमध्ये गाळ जमा होण्याची शक्यता असते.
सिंचन विहीर योजना 2024 संपूर्ण प्रस्ताव मोफत उपलब्ध sinchan vihir prastav
विहीर बांधकाम करणे गरजेचे
जास्त पाऊस झाला आणि पूर आला तर पुराच्या पाण्यासोबत गाळ दगड गोटे विहिरीत जाण्याची शक्यता असते.अशावेळी विहिरीचे बांधकाम करणे गरजेचे असते.
महागाई वाढल्याने लोखंड सिमेंट खडी वाळू मिस्त्री मजुरी इत्यादीचे दर वाढल्याने अनेक शेतकरी बांधवाना इच्छा असूनही विहिरीचे बांधकाम करता येत नाही.
अशावेळी तुम्ही जर शासकीय अनुदानाचा लाभ घेवून विहीर बांधकाम केली तर नक्कीच तुम्हाला मदत मिळू शकते.
विहीर बांधकाम अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात जाणून घेवूयात सविस्तर माहिती.
विहीर बांधकाम अनुदान योजना लॉगीन करण्याची पद्धत
Mahadbt farmer login असा शब्द गुगलमध्ये शोधा.
Applicant login here अशा प्रकारची एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
असे करताच महाडीबीटी शेतकरी वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
युजरआयडी, पासवर्ड व कॅपचा कोड टाकून लॉगीन करा. आधार कार्डचा उपयोग करून देखील तुम्ही लॉगीन करू शकता.
लॉगीन झाल्यावर अर्ज करा अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
या ठिकाणी एक सूचना दिसेल ती वाचून घ्या. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना व घटकांतर्गत विविध बाबींना अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यापैकी आपल्या पसंतीची प्रत्येक बाब स्वतंत्रपणे निवडावी व त्याच्याशी संबधित तपशील नमूद करावा आणि शेवटी आपण निवडलेल्या सर्व बाबींचा अर्जात समावेश करावा.
हि सूचना संपताच अर्ज ओपन होईल, अर्जामध्ये इतर माहिती याअगोदरच आलेली असेल बाब या चौकटीवर क्लिक करताच या ठिकाणी विविध योजनांची यादी तुम्हाला दिसेल यापैकी नवीन विहिरीचे बांधकाम हि योजना निवडा.
सशुल्क भरून करता येतो अर्ज
योजनेचा अटी आणि शर्थी समोर असलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि अर्ज जतन करा.
त्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या.
तुम्ही जर नवीन असाल किंवा पहिल्यांदा या वेबसाईटवर अर्ज सादर करत असाल तर तुम्हाला २६.३० रुपये शुल्क भरून अर्ज सादर करावा लागेल.
अशा पद्धतीने तुम्ही नवीन विहीर बांधकाम अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता.
तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना हि माहिती नक्की पाठवा.
विहीर बांधकाम करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
कमीत कमी ०.२० ते जास्तीत जास्त ५ हेक्टर पर्यंत जमीन धारणा असलेला शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतो.