शासकीय अनुदानावर ठिबक हवे का मग असा करा अर्ज Thibak sinchan online application maharashtra 2024

शासकीय अनुदानावर ठिबक हवे का मग असा करा अर्ज Thibak sinchan online application maharashtra 2024

सध्या शेतकरी बांधवांची पेरणीची घाई सुरु आहे. अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन पद्धतीने सिंचनाची सुविधा करतांना दिसत आहे.

यामध्ये ठिबक खरेदी करण्यापासून ते शेतामध्ये ठिबक पांगविण्यापर्यंत अगदी जोरात शेतकरी बांधवांचे काम सुरु आहे. बाजारातून ठिबक खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप पैसे मोजावे लागत आहे. परंतु तुम्ही जर महाडीबीटी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला हे ठिबक शासकीय अनुदानावर मिळू शकते.

ठिबक अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणारच आहोत, तत्पूर्वी जाणून घेवूयात ठिबक संच संदर्भात थोडक्यात माहिती.

शेततळे ठिबक सिंचन मोटर इ साठी निधी आला असा करा ऑनलाईन अर्ज 2024

ठिबक सिंचन सुविधेमुळे कमी पाण्यात केली जाते शेती

विहीर किंवा बोअरला पाणी कमी असेल तर अशावेळी शेतकरी त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचनद्वारे पिकांना पाणी देवून पाणी बचत करू शकतात.

ठिबकद्वारे कमी पिकांना कमी पाणी लागते शिवाय पूर्ण शेतातील पिकांना हवे तसे पाणी मिळत असल्याने मोकळ्या पद्धतीने पाणी देण्याची गरज पडत नाही.

त्यामुळे सध्या अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये ठिबक सिंचन अंथरण्याचे काम करत आहेत. isi आणि non ISI अशा दोन प्रकारचे ठिबक सध्या बाजारात उपलब्ध आहे. isi प्रमाणित जे ठिबक संच आहे तो अनुदानास पात्र असतो आणि त्याचा एकरी खर्च हा सरासरी ४० हजार रुपये एवढा येवू शकतो.

जे non ISI ठिबक संच आहेत ते मात्र या तुलनेने स्वस्त असल्याने अनेक शेतकरी बांधवांचा कल त्याकडे दिसून येतो.

अधिकृत वेबसाईट लिंक

दोन प्रकारचे ठिबक संच

isi प्रमाणित जो ठिबक संच उच्च दर्जाचा असल्याने तो दीर्घकाळ टिकतो मात्र याची किंमत जास्त असते. यासाठी शासकीय अनुदान देखील मिळते हे अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

non isi ठिबक संचाची गुणवत्ता कमी असल्याने हे स्वस्त कमतीत मिळते. परंतु हे ठिबक संच लवकर खराब होते.

ज्या शेतकरी बांधवांकडे उच्च दर्जाचे ठिबक खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत ते मात्र हे नॉन आयएसआय ठिबक खरेदी करतात.

ठिबक संच ऑनलाईन अर्ज संदर्भातील सविस्तर माहिती.

तुम्हाला जर उच्च दर्जाचे ठिबक संच खरेदी करण्यासाठी शासकीय अनुदान हवे असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

हा अर्ज करण्यासाठी गुगलमध्ये mahadbt farmer login असा शब्द टाका

लॉगीन करा.

लोगिन केल्यावर अर्ज करा या लिंकवर क्लिक करा.

खालील व्हिडीओ पहा.

त्यानंतर सिंचन साधने व सुविधा या पर्यायावर क्लिक करा.

आता अशा प्रकारचा अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल त्यामध्ये योग्य ती माहिती भरा.

सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज जतन करा.

या ठिकाणी २३.६० एवढे पेमेंट करून तुम्ही अर्ज सादर करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही ठिबक संच अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *