जाणून घेवूयात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना mukhyamantri tirth darshan yojana संदर्भातील सविस्तर माहिती.
देव दर्शनासाठी शासनाकडून १० नव्हे २० नव्हे तर तब्बल ३० हजार रुपये मिळणार आहेत.
विशेष बाब म्हणजे या योजनेचा जीआर देखील काढण्यात आला आहे. कशी आहे हि योजना कोणते लागणार आहेत कागदपत्रे कोठे करावा लागेल अर्ज काय आहेत अटी जाणून घेवूयात संपूर्ण माहिती.
अनेकांना देव दर्शन करण्याची इच्छा असते परंतु त्यासाठी खर्च येतो यामुळे अनेकजण इच्छा असूनही देवदर्शन करू शकत नाहीत.
मात्र आता हि इच्छा शासन पूर्ण करणार आहे. ज्यांना देव दर्शन करायचे आहे त्यांना यासाठी ३० हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
शासकीय अनुदान म्हटल्यावर नक्कीच योजनेचा लाभ घेण्याची अनेकांची इच्छा असते. जाणून घेवूयात या योजनेची सविस्तर माहिती.
खालील योजना पण पहा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जात व योजनेत झाले बदल नवीन GR आला.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
नागरिकांचे वय कमीत कमी ६० किंवा त्यावरील असावे.
अर्जदाराचे उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
वरील पात्रतेचे नागरिक शासनाच्या मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
कोणत्या नागरिकांना मिळणार नाही या योजनेचा लाभ.
ज्या कुटुंबातील व्यक्ती कर भरते अशा कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र नसणार आहेत.
तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीकडे चारचाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे
लाभार्थीला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
लाभार्थ्याकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला. जर हे कागदपत्र नसले तर १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा दाखला यापैकी एक असणे गरजेचे आहे.
उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे नाहीतर केशरी राशन कार्ड.
वैद्यकीय प्रमाणपत्र.
पासपोर्ट आकाराचा फोटो.
जवळच्या नातेवाइकांचा मोबाईल क्रमांक.
योजनेच्या नियम व अटी पळणार असल्याचे हमीपत्र.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
लाडकी बहिण योजनेसाठी कागदपत्रे अशा पद्धतीने करा अपलोड नाहीतर अर्ज होऊ शकतो बाद शासनाच्या नवीन सूचना
कशी होणार अर्जदारांची निवड
प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक कोटा निश्चित केला जाईल. अर्ज जर निश्चित कोट्याच्या वर आले तर अशा सर्व अर्जांचा संगणकीय पद्धतीने लॉटरी काढण्यात येईल.
या लॉटरीमध्ये ज्या अर्जदारांची निवड होईल त्यामधील नागरिकांना मुख्यमंत्री देवदर्शन योजनेसाठी पात्र ठरविण्यात येईल. जे उर्वरित अर्जदार असतील ते प्रतीक्षायादीमध्ये असतील.
समजा एखद्या अर्जदाराची निवड होऊन देखील त्याला ऐनवेळी देवदर्शनासाठी जाता आले नाही तर प्रतीक्षा यादीतील अर्जदारांना संधी देण्यात येईल.
सविस्तर माहितीसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना संदर्भातील खालील जी आर पहा