एव्हाना सर्वाना माहित झालेले आहे कि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत शासनाकडून 10000 महिना मिळणार आहे.
१२ वी पास, आयटीआय व पदवी धारकांना अनुक्रमे ६ हजार, ८ हजार व १० हजार रुपये महिना शासनाकडून दिला जाणार आहे.
खालील योजना पण पहा
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम ज्याला लाडका भाऊ योजना असे देखील म्हणतात तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांना कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा या संदर्भात माहिती मिळत नाही.
शासनाकडून या योजनेचा प्रचार प्रसार अगदी जोरात सुरु आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा कोणते कागदपत्रे लागतात या संदर्भात देखील शासनस्तरावरून माहिती देण्यात आली आहे.
एवढे असूनही जर तुम्हाला वेबसाईट शोधण्यास अडचण येत असेल तर आता शासनाकडून योजनेचा अर्ज करण्यासाठी QR कोड प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हा QR कोड स्कॅन केले कि तुम्ही डायरेक्ट महा स्वयं वेबसाईटवर जाता जेथे तुम्हाला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.
शासनाकडून 10000 महिना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी QR कोड स्कॅन करा
अनेकांना वेब ॲड्रेस टाकता न येण्याची शक्यात असते किंवा एखाद्या वेळेस या वेब ॲड्रेसमध्ये एखादे अक्षर जरी चुकीचे टाईप झाले तरी ती वेबसाईट ओपन होत नाही.
अशावेळी तुम्ही QR कोड स्कॅन केले तर डायरेक्ट महा स्वयं वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करू शकता. शिवाय सध्या सोशल मिडीयावर लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजन संदर्भात अनेक लिंक्स येत आहेत अशावेळी यामध्ये ओरीजनल लिंक कोणती आहे हे कळण्यास काही अर्जदारांना अडचण येवू शकते.
किंवा चुकीच्या लिंकवर क्लिक करून तुमची फसवणूक होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अशावेळी शासनाकडून जो QR कोड दिलेला आहे तो स्कॅन करून अर्ज करू शकता.
कसा कराल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
QR कोड स्कॅन केल्यावर एक लिंक ओपन होईल जी कि शासकीय वेबसाईटची लिंक असेल. त्या लिंकवरती क्लिक केल्यास तुम्ही डायरेक्ट महास्वयं वेबसाईटवर जाल.
या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात जर तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर तुमच्यासाठी एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे तुमचा लाडका भाऊ योजनेसाठी म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अर्ज सादर करून द्या.
वरील व्हिडीओ तुम्ही जर पहिला असेल तर तुम्ही देखील शासनाकडून 10000 महिना अनुदानासाठी पात्र ठरू शकता.