मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना Mukhyamantri Annapurna yojana 2024 अंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 गॅस मोफत रिफील करून मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या योजनेचे नाव असून या योजनेचा जी आर नुकताच काढण्यात आला आहे.
सुरुवातीला या योजनेचा लाभ केवळ उज्ज्वला गॅस योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच मिळत होता परंतु आता या योजनेचा लाभ मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलेला देखील मिळणारा आहे.
मुख्यमंत्री उज्ज्वला गॅस योजना हि केंद्र शासनाची योजना असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य शासनाची आहे.
त्यामुळे आता ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरतील त्या महिलांना देखील आता मोफत गॅस मिळणार आहे.
कशी असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना 2016 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेतून पात्र लाभार्थींना गॅस जोडणीसाठी आर्थिक सहाय्य केंद्र शासनाकडून येते.
आता राज्यशासनाकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र महिलांना वर्षाला १४.२ किलो ग्रॅम वजनाचे ३ गॅस मोफत रिफील करून दिला जाणार आहे.
ग्रामीण भागामध्ये स्वयंपाक करण्यासाठी सरपण वापरले जाते यासाठी वृक्षतोड करावी लागते. शिवाय सरपण वापरत असतांना चुलीतून मोठ्या प्रमाणात धूर निघतो यामुळे महिलांना डोळ्याचे व इतर वेगवेगळे आजार उद्भवू शकतात.
याच बाबीचा विचार करून अतिरिक्त अर्थसंकल्प 2024 – 25 सदर करतांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती आता हि योजना अंमलात येत आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जात व योजनेत झाले बदल नवीन GR आला.
योजनेची पात्रता
योजनेची पात्रता खालील प्रमाणे आहे.
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर गॅस जोडणी घरतील महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे तेंव्हाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुरुषांच्या नावे गॅस नोंदणी असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
अनेक लाभार्थी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेत आहेत, ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरतील ते लाभार्थी देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
राशन कार्डनुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत 1 जुलै 2024 पर्यंत पत्र राशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
1 जुलै 2024 नंतर जे लाभार्थी राशन कार्ड विभक्त करतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
14.2 किलो ग्रॅम वजनाचा गॅस रिफील करून मिळेल.
लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास खालील लिंकवर क्लिक करून माहिती घ्या.
1500 रुपये महिना मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जी आर GR आला
अशी होणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी
14.2 किलो ग्रॅम वजनाचा गॅस सध्या 830 रुपयांमध्ये रिफील करून मिळतो. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत लाभार्थींना 300 रुपये सबसिडी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
आता राज्य शासनाने प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली आहे.
यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे 300 आणि उर्वरित 530 रुपये हे अन्नपूर्णा योजनेतून दिले जाणार आहे अशा पद्धतीने हा मोफत गॅस तुम्हाला मिळणार आहे.
830 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा mukhyamantri annapurna yojana maharashtra gr खालील जी आर पहा.