लाडकी बहिण योजनेचा अर्ज मराठीमध्ये सादर केला पण मंजूर होईल का पहा काय आहेत शासनाच्या सूचना

लाडकी बहिण योजनेचा अर्ज मराठीमध्ये सादर केला पण मंजूर होईल का पहा काय आहेत शासनाच्या सूचना

अनेकांना प्रश्न पडलेला होता कि लाडकी बहिण योजनेचा अर्ज मराठी भाषेमध्ये सादर केला असेल तर तो मंजूर होईल का जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज सादर करतांना अनेकांनी मराठी भाषेमध्ये त्या अर्जामध्ये माहिती सादर केली आहे.

हे अर्ज जे आहे ते इंग्रजी भाषेमध्ये सादर करणे गरजेचे होते परंतु ग्रामीण भागातील महिलांना इंग्रजी जास्त येत नाही.

त्यामुळे अनेक महिलांनी किंवा ज्यांनी हे अर्ज सादर केले त्यांना देखील इंग्रजी भाषा समजत नसल्याने अनेकांनी हे अर्ज मराठी भाषेत सादर केलेले आहेत.

इंग्रजी येत असूनही अर्ज कोणत्या भाषेमध्ये सादर करावा याची माहिती नसल्याने लाडकी बहिण योजनेचे अर्ज मराठी भाषेमध्ये सादर केले गेले असल्याची देखील एक शक्यता असू शकते.

खालील माहिती पण पहा

लाडकी बहिण योजनेची नवीन वेबसाईट आली पहा कशी आहे वेबसाईट

लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर होईल का?

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ज्यांनी मराठी भाषेमध्ये लाडकी बहिण योजनेचे अर्ज सादर केले आहेत त्यांना आता असे वाटत आहे कि आपला अर्ज रद्द होतो कि काय.

कारण हा अर्ज इंग्रजीभाषेमध्ये सादर करणे गरजेचे होते. शासनाने नुकतीच तयार केलेल्या माझी लाडकी बहिण वेबसाईटवर सुद्धा अर्ज केवळ इंग्रजीमध्ये सादर करावा अशी सूचना देण्यात आली आहे.

त्यामुळे ज्यांनी मराठी भाषेमध्ये अर्ज सादर केला आहे त्यांचे काय होणार त्यांचे अर्ज रद्द होणार का? त्यांना पुन्हा अर्ज सादर करावा लगणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले आहेत.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

लाडकी बहिण योजनेचा चुकीचा अर्ज असा करा दुरुस्त नाहीतर मिळणार नाही 1500 रुपये

काय आहे शासनाच्या सूचना

लाडकी बहिण योजनेचे ज्यांचे अर्ज मराठीमध्ये सादर केलेले आहेत या संदर्भात अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

ज्यांनी यापूर्वी मराठी भाषेमध्ये लाडकी बहिण योजनेचे अर्ज सादर केले आहे त्यांचे अर्ज नामंजूर होणार नाहीत. अशी सूचना बालविकास मंत्री यांनी ट्वीटरच्या माध्यमांतून केली आहे.

खाली महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची ट्वीटची लिंक दिली आहे वाचून घ्या.

या ठिकाणी तुम्ही ट्वीट बघू शकता.

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. कृपया कोणीही या बाबत गैरसमज करून घेऊ नये.

मराठी भाषेमध्ये सादर केलेले अर्ज होणार नाहीत रद्द

महिला व बाल विकास मंत्री यांनी ट्वीटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ज्यांचे अर्ज मराठीभाषेमध्ये सादर झाले आहेत त्यांचे अर्ज रद्द किंवा बाद होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जर मराठीमध्ये लाडकी बहिण योजनेचा अर्ज सादर केला असेल तर तो रद्द होणार नाही.

मात्र तुम्ही अजूनही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल तर मात्र अर्ज सादर करतांना इंग्रजी भाषेमध्येच करा जेणे करून तुमचा अर्ज मंजूर होईल.

लाडकी बहिण योजनेचा अर्ज मोबाईलवरून देखील करता येतो. अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *