पहा कशी असते मुख्यमंत्री वयोश्री योजना फाईल.
तुम्ही जर ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिक असाल तर शासनाकडून तुम्हाला विविध साहित्य खरेदी करण्यासाठी ३००० रुपये अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा करून देत आहेत.
बऱ्याच वेळेस या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे जमा करावी लागतात आणि ती कोठे सादर करावी या संदर्भात अनेकांना माहिती नसते.
अशावेळी या योजनेचा तुम्हाला मी लाभ मिळवून देते असू म्हणून एखाद्या मध्यस्थाला तुम्हाला शिल्लाक्चे पैसे द्यावे लागू शकतात.
खालील माहिती पण वाचा
वयोश्री योजना अर्ज सुरु 3000 खात्यात होणार जमा शासनाकडून आली अर्जाची लिंक मोबाईलवरून करता येतो अर्ज
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची गरज नाही
आता तुम्हाला कोणताही मध्यस्थाची सहायता घेण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला या ठिकाणी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे लागणार आहे ती उपलब्ध करून देणार आहोत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कोठे सादर करावी या संदर्भातील अगदी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत.
लाईव्ह व्हिडीओ पहा.
एवढेच नव्हे तर कागदपत्रे pdf मध्ये सुद्धा उपलब्ध करून देणार आहोत.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना देवदर्शनासाठी मिळेल शासनाकडून 30 हजार रुपये अनुदान नवीन जी आर आला
मुख्यमंत्री वयोश्री योजना फाईल pdf मध्ये डाउनलोड करा.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ३ हजार रुपये लाभ मिळविण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे तुमच्या जिल्ह्याच्या सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे सादर करावी लागतात.
हि कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे.
- विहित नमुन्यातील परीपूर्ण माहिती सादर केलेला अर्ज.
- स्वयंघोषणा पत्र १.
- स्वयंघोषणापत्र २.
- आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
- तहसीलदार कार्यालय यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र झेरॉक्स प्रत.
- मतदान कार्डची झेरॉक्स प्रत.
- बँक पासबुक झेरॉक्स प्रत.
योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आम्ही तुमच्यासाठी pdf मध्ये उपलब्ध करून ठेवलेली आहेत.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही हि कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता.
वयोश्री योजनेचे शासनाचे प्रसिद्धीपत्रक बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कागदपत्रे सादर केल्यानंतर लागणारी पोहोच पावती डाउनलोड करा.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कोठे करावा या संदर्भातील वृत्तपत्रातील बातमी पहा
कोठे कराल कागदपत्रे सादर
वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून सर्व कागदपत्रे व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. त्यांची प्रिंट काढून त्यामध्ये व्यवस्थित भरा.
संपूर्ण माहिती भरल्यानंतर सर्व कागदपत्रांची एक फाईल तयार करा आणि हि संपूर्ण विहित नमुन्यातील फाईल जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयात सादर करा.
मुख्यमंत्री वयोश्री योजना संदर्भात कशा पद्धतीने माहिती सादर करावी लागते या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी तुम्ही खाली व्हिडीओ बघू शकता.
व्हिडीओ पहा.