लाडकी बहिण दुसरा हफ्ता. लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.ladki bahin yojana dusara hafta.
पहिल्या टप्प्यातील महिलांना ३ हजार रुपये मिळाल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील पैसे कधी मिळणार या संदर्भात उत्सुकता लागलेली होती.
अनेक महिला दुसऱ्या टप्प्यातील मिळणाऱ्या लाडकी बहिण योजनेच्या पैशांची आतुरतेने वाट बघत होत्या. हि आतुरता आता संपलेली असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता दुसऱ्या टप्प्यातील ४५०० हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज मराठीमध्ये सादर केला पण मंजूर होईल का पहा काय आहेत शासनाच्या सूचना
एवढा निधी केला आतापर्यंत जमा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्याचे वितरण नागपूर येथील रेशीमबाग मैदान येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात १ कोटी ७ लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये ३ हजार २२५ कोटी एवढी रक्कम एवढी रक्कम जमा करण्यात आलेल आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ५२ लाख महिलांच्या बँक खात्यात १५६२ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहिण लाभार्थी यादी अशी करा डाउनलोड Ladki bahin labharthi list download
माझी लाडकी बहिण दुसरा हफ्ता ३१ ऑगस्ट होती अर्ज करण्याची शेवटची तारीख
लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट देण्यात आली होती त्यामुळे अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केले होते.
ज्या महिलांना अर्ज मंजुरीचा संदेश आला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.
परंतु काही कारणांमुळे जवळपास ५० हजार महिलांचे अर्ज बाद झाले आहे. ज्या महिलांचा अर्ज बाद झाले आहे त्यांना आता पुन्हा अर्ज करता येणार आहे का हा प्रश्न अनेक महिलांना पडलेला आहे.
अर्ज बाद झालेल्या महिलांना पुन्हा करता येणार अर्ज
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लडकी बहिण वेबसाईट शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर पात्र महिलांना अर्ज करता येणार आहे.
काही कागदपत्रे असतील किंवा ऑनलाईन अर्ज करतांना काही चूक झाली असेल तर अशा महिलांना परत एकदा अर्ज करता येणार आहे.
ज्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची संधी सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे.
त्यामुळे तुमचा अर्ज बाद झाला असेल तर काळजी करू नका कारण तुम्हाला परत एकदा अर्ज करण्याही संधी मिळणार आहे जेणे करून लाडकी बहिण योजनेचे पैसे तुम्हाला देखील मिळू शकतील. लाडकी बहिण दुसरा हफ्ता.
लाडकी बहिण योजनेचा अर्ज रद्द झाल्यास कशा पद्धात्तीने पुन्हा एकदा अर्ज करावा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुम्हाला जर लाडकी बहिण वेबसाईटवर जावून अर्ज करायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करा.