जाणून घेवूयात मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन अर्ज संदर्भात सविस्तर माहिती.
तुम्ही जर बेरोजगार असाल तर तुम्हाला आता योजनादूत होण्यची नामी संधी मिळाली आहे. योजनादूतसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून शासकीय यंत्रणेसोबत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
योजनादूत म्हणून प्रत्येक गावातून १ व्यक्ती या योजनेसाठी निवडली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये ५० हजार योजनादूत निवडले जाणार आहेत.
योजना दूतांना महिन्याला १० हजार रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर लगेच अर्ज सादर करून द्या कारण ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२४ हि आहे.
जाणून घेवूयात योजनादूत संदर्भातील सविस्तर माहिती.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडक्या बहिणींना गॅस मोफत Mukhyamantri annpurna yojana 2024
मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन अर्ज किती मिळणार मानधन
योजना दूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन मिळणार असून शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पोहचविण्याचे काम या योजना दूतांना करावे लागणार आहे.
हा जॉब केवळ ६ महिनेच असून त्यानंतर मात्र हे मानधन मिळणार नाही. शासनाकडून तुम्हाला तुम्ही काम कशा पद्धतीने केले या संदर्भातील प्रमाणपत्र मात्र मिळेल.
भविष्यामध्ये तुम्हाला जर खाजगी कंपनीमध्ये या कामासंदर्भात जर जॉब हवा असेल तर या प्रमाणपत्राचा तुम्हाला उपयोग होणार आहे.
लोखंडी बैलगाडी अनुदान योजना bailgadi anudan yojna 2024
कोण करू शकतो अर्ज
योजनादूत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शासनाच्या वेबसाईट भेट द्या. अर्ज करण्याआधी तुमच्याकडे आधार कार्ड.
रहिवासी दाखला.
पदवी असल्याचे प्रमापात्र.
संगणक प्रमाणपत्र (MSCIT) किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वय १८ ते ३५ दरम्यान असावे.
हि सर्व पात्रता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
अर्ज नोंदणी कशी करावी लागते या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
बेरोजगार तरुणांसाठी उत्तम संधी
तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल तर तुम्ही या योजनादूत योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. यामध्ये शासकीय योजनांची माहिती तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी लागणार आहे.
महिन्यामध्ये कमीत कमी २० दिवस काम केल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून हे पैसे जमा केले जाणार आहे.
ज्या बँक खात्यामध्ये पगार येणार आहे त्या खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री योजनादूत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
योजना दूत ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आली तर infor@mahayojanadoot.in या इमेलवर तुम्ही मेल करून मदत मागू शकता.