सोयाबीन 5 हजार प्रती क्विंटल.
तुम्ही जर सोयाबीन उत्पादक असाल आणि तुम्ही अजूनही तुमची सोयाबीन विक्री केली नसेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आता सोयाबीनला ५ हजार रुपये भाव मिळाल्याची बातमी आहे.
अनेक दिवसांपासून सोयाबीन पिकला भाव वाढ देण्याची मागणी होती. या संदर्भात विविध ठिकाणी आंदोलने देखील झाले होते.
आता याच बाबीचा विचार करून सोयाबीनच्या बाजार भावात वाढ झाली असून शेतकरी बांधवांसाठी नक्कीच हि आनंदाची बातमी ठरणार आहे.
खालील योजनेचा पण लाभ घ्या.
बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
सोयाबीन 5 हजार प्रती क्विंटल सोयाबीनचा भाव वाढला या वर्षी सोयाबीनचा विक्रमी पेरा
चालू वर्षी महाराष्ट्र राज्याध्ये सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. खरीप सिजनमध्ये ३४ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. अर्थातच यामुळे सोयाबीनचे उत्पादन देखील खूप मोठ्या प्रमाणत झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने सोयाबीनला ४८९२ एवढा हमीभाव जाहीर केला आहे. सुरुवातीच्या काळात या हमीभाव रकमेपेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये देखील विरोधकांनी सोयाबीन दराचा मुद्दा उपस्थित केला होता आणि याचा फटका देखील लोकसभेत सत्ताधाऱ्यां बसला होता. याचाच परिणाम म्हणून विधानसभा निवडणुकीपूर्वी सोयाबीनला ४८९२ एवढा हमीभाव देण्यात आला आहे.
आता मात्र जवळपास ५ हजार रुपये दराने काही ठिकणी खरेदी होत असल्याची बातमी आहे.
काही व्यापारी वर्गाकडून होऊ शकते पिळवणूक
बऱ्याच वेळा सोयाबीनची खरेदी अत्यंत कमी किमतीमध्ये केली गेल्याने अनेक शेतकरी बांधवाना झळ सोसावा लागला आहे.
काही व्यापारी जर कमी किमतीत सोयाबीन खरेदी करत असेल तर शेतकरी बांधवानी कृषी मार्केटमध्ये नेवून आपली सोयाबीन विकावी जेणे करून शेतकऱ्यांना शासनाचा ४८९२ एवढा हमीभाव मिळू शकेल.
बऱ्याच दिवसांपासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा होती त्यामुळे आता हि बातमी शेतकरी बांधवांसाठी नक्क्कीच आनंदाची ठरणार आहे.