ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र 50 टक्के अनुदान मिळविण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. हा अर्ज कशा पद्धतीने सादर करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.
सध्या शेतीतील बहुतांश कामे ही ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे केली जातात. यामुळे शेतकरी बांधवांचा वेळ वाचतो व कामे देखील जलद गतीने होतात.
तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि तुम्ही ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुम्हाला आता 50 टक्के अनुदान मिळू शकते.
महाडीबीटी पोर्टलवर यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.
PVC pipe subsidy in Maharashtra सरकारी अनुदान योजना 2023
ट्रॅक्टरचलित मळणी यंत्र 50 टक्के अनुदान मिळविण्यासाठी कोठे कराल अर्ज
महाडीबीटी पोर्टलवर मळणी यंत्र अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्ज केल्यावर सदरील योजनेच्या लॉटरीत लाभार्थीचे नाव आले तर त्या लाभार्थीच्या नोंदणीकृत मोबाईलवर या संदर्भात संदेश पाठविला जातो.
युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करता येते किंवा आधार OTP च्या सहाय्याने देखील तुम्ही लॉगिन करू शकता.
शेतकर्याची नोंदणी झाली नसेल तर नवीन नोंदणी करून युजर आय डी आणि पासवर्ड मिळविता येतो.
Mahadbt farmer registration महाडीबीटी वेबसाईटवर अनेक योजना लाभ घेण्यासाठी अशी करा नोंदणी
ट्रॅक्टरचलित मळणी यंत्रासाठी अनुदानाचे स्वरूप
ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या ० टक्के अनुदान दिले जाते किंवा १.२५ हजार यापैकी जे कमी असेल ती रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ४० टक्के किंवा १ लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.
सदरील जी आर बघितल्यावर तुम्हाला ट्रॅक्टरचलित मळणी यंत्रासंदर्भातील सविस्तर माहिती मिळू शकेल.
अनुदान मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा केला जातो या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
अनुदान संदर्भातील जी आर बघा
कोणत्या लाभार्थीला किती अनुदान मिळते या संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय तुम्हाला हवा असेल तर खालील बटनावर क्लिक करून तुम्ही हा जी आर बघू शकता.
हा जी आर ४ जुलै २०२४ रोजी काढण्यात आलेला असून यामध्ये राज्यपुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना राबविणे बाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
तर अशा पद्धतीने आपण य लेखामध्ये अगदी व्हिडीओ सहित सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे कि ट्रॅक्टरचलीत मळणी यंत्रासाठी किती आणि कसे अनुदान मिळते.