पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्ज मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत १५ हजार रुपयांची टूलकीट तर मिळतेच परंतु उद्योग व्यवसायासाठी बँकेकडून १ व २ लाख रुपये कर्ज देखील मिळते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी नोंदणी पीएम विश्वकर्मा या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर ग्रामपंचायत अर्ज पुढे पाठविते.
अर्जदाराचा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांना त्यांनी निवडलेल्या ट्रेड संदर्भात ७ दिवसाचे किंवा १५ दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
ज्यांनी पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत निवडलेल्या ट्रेड संदर्भात प्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा अर्जदारांना आता कर्ज मिळण्याची प्रोसेस देखल सुरु झाली आहे.
15000 रुपये टूलकीट अनुदान पहा pm vishwakarma योजना संदर्भातील माहिती
खालील व्हिडीओ पहा.
प्रशिक्षण सुरु असतांना मिळते प्रती दिन पाचशे रुपये
अर्जदाराने निवडलेल्या ट्रेड संदर्भातील प्रशिक्षण सुरु असतांना लाभार्थींना प्रती दिन पाचशे रुपये याप्रमाणे स्टायपेंड मिळते.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अर्जदारास सुरुवातीला १ लाख रुपये आणि नंतर २ लाख रुपये या प्रमाणे कर्ज मिळते.
पीएम विश्वकर्मा योजनेचा उद्देश म्हणजे पारंपारिक उद्योजकांना प्रशिक्षित करून त्यांना अर्थसहाय्य देवून त्यांच्या व्यवसायाची प्रगती करणे हा आहे.
त्यामुळे जे पारंपारिक व्यवसाय करत आहेत त्यांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा जेणे करून त्यांना देखील अर्थ सहाय्य मिळेल.
पीएम विश्वकर्मा ओळखपत्र डाउनलोड करा ऑनलाईन pm vishwakarma identity card download
बेरोजगारांसाठी उत्तम योजना
तरुणांच्या हाताला काम नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहेत. काही तरुणांच्या घरी पारंपारिक व्यवसाय करत असतात. याच व्यवसायाला अधिक बळकटी करून यामध्ये अनेकांना रोजगार देखील उपलब्ध करून देता येतो.
तुमचा जर पारंपारिक व्यवसाय असेल आणि त्याला अधिक मजबूत करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
कसा करावा लागेल अर्ज.
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया एकदम सोपी आहे
https://pmvishwakarma.gov.in या वेबसाईटला भेट देवून ऑनलाईन अर्ज सादर करता येते. तुमच्या गावातील सीएससी सेंटर वर जावून तुम्ही अर्ज सादर करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी लक्षात असू द्या कि तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. त्यावर आलेला otp पडताळनी केली जाते.
एकदा का तुम्ही अर्ज सादर केला कि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रोसेस होते आणि मग अर्जदाराला पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत उद्योग व्यवसाय बळकटीकरणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत पात्र लाभार्थींना कर्ज मिळण्यास सुरुवात झाली असून यामुळे लहान व्यवसायांना नवसंजीवनी मिळणार आहे.