महाडीबीटी शेतकरी योजना अपडेट प्रथम येणाऱ्यास मिळेल प्रथम प्राधान्य

महाडीबीटी शेतकरी योजना अपडेट प्रथम येणाऱ्यास मिळेल प्रथम प्राधान्य

नवीन महाडीबीटी शेतकरी योजना अपडेट आता यापुढे जो शेतकरी लवकर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करेल त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर अनेक शेतकरी विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करत असतात. योजनेचा लाभ देण्यासाठी लॉटरी पद्धतीचा नियम असल्याने अनेक शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागलेले आहे.

त्यामुळे आता २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून लाभ देण्याची पद्धत बदलली असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यानुसार लाभ दिला जाणार आहे.

महाडीबीटी शेतकरी योजना अपडेट शेतकऱ्यांना होणार लाभ

प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या नियमामुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. लॉटरी पद्धतीमध्ये उदाहरणार्थ एखाद्या योजनेसाठी ५०० शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि त्या योजनेचा लक्षांक ५० असेल तर केवळ ५० शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ मिळायचा.

सदरील योजनेसाठी उर्वरित शेतकऱ्यांना परत त्या योजनेसाठी पुन्हा नव्याने अर्ज करावा लागत असे. आता मात्र नवीन नियमानुसार उर्वरित शेतकऱ्यांना परत अर्ज करण्याची गरज राहणार नाही.

उर्वरित शेतकरी प्रलंबित यादीमध्ये टाकले जाणार असून त्यांना अर्जाच्या ज्येष्ठतेनुसार लाभ मिळणार आहे.

Mahadbt farmer registration महाडीबीटी वेबसाईटवर अनेक योजना लाभ घेण्यासाठी अशी करा नोंदणी

काय आहे अर्जाची ज्येष्ठता

एखाद्या व्यक्तीने २० तारखेला अर्ज केला असेल दुसऱ्या व्यक्तीने २१ तारखेला अर्ज केला असेल तर २० तारखेच्या अर्जदाराची जेष्ठता हि २१ तारखेवाल्या अर्जदरापेक्षा जास्त असणार आहे.

अशावेळी जर अर्जदाराला योजनेचा लाभ मिळाला नसेल आणि अर्ज प्रलंबित यादीत असेल तर अर्जाच्या जेष्ठतेनुसार लाभ दिला जाणार आहे.

फार्मर आयडी असेल तरच मिळणार लाभ

महाडीबीटी पोर्टलवरीलच नव्हे तर अनेक योजनांसाठी फार्मर आयडी असणे गरजेचे ठरणार आहे. जर शेतकऱ्यांची महाडीबीटी योजनेसाठी निवड झाली मात्र सदरील शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशावेळी त्या शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळणार नाही त्याएवजी प्रलंबित शेतकऱ्याची निवड केली जाईल.

फार्मर आयडी असे करा डाउनलोड 2025 पहा ऑनलाईन नोंदणीची सविस्तर माहिती

शेतकरी बांधवानी लवकरात लवकर जवळच्या सीएससी सेंटरवर जावून फार्मर आयडी काढून घ्यावे जेणे करून विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

महाडीबीटी वेबसाईट लिंक

महाडीबीटी पोर्टलवर मिळतो विविध योजनांचा लाभ

शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर उपलब्ध आहेत. यामध्ये ट्रॅक्टर मळणी पेरणी यंत्र नांगर फवारणी पंप शेततळे शेडनेट या आणि इतर अनेक योजनांचा समावेश आहे.

वरील सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे असते. नोंदणी केल्यावर अर्जदाराला युजरआयडी आणि पासवर्ड मिळतो.

लॉगीन केल्यानंतर विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. तर हे महाडीबीटी शेतकरी योजना अपडेट होते तुम्हाला हि माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *