शेळी गट वाटप 2025 गाय म्हैस कुक्कुटपक्षी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

शेळी गट वाटप 2025 गाय म्हैस कुक्कुटपक्षी अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

शेळी गट वाटप 2025 योजना व इतर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले असून या योजना कोणकोणत्या आहेत आणि त्यासाठी अर्ज कसे केले जातात या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुधाळ गाई म्हशी व शेळी गट वाटप 2025 या वर्षासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2025 ही आहे.

शेळी गट वाटप गाई म्हैस मांसल कुक्कुटपक्षी वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता कोणती असते शिवाय यासाठी अर्ज कोठे आणि कसा करावा लागतो या संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

या लेखाच्या सर्वात शेवटी एक व्हीडीओ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा व्हीडीओ बघून देखील तुम्ही शेळी गट वाटप किंवा दुधाळ गाई म्हशी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

नाविन्यपूर्ण योजनेचा उद्देश म्हणजे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. योजनेचा प्राधान्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक ज्यांच्याकडे स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केली आहे.

अल्पभूधारक शेतकरी.

महिला बचत गट.

घरकुल योजना ऑनलाइन सर्व्हे सुरू मोबाईल वरून करा सेल्फ सर्व्हे

बेरोजगार युवकांना शेळी गट वाटप योजना अंतर्गत होणार लाभ

सध्या अनेक तरुणांच्या हाताला काम नसल्याने असे युवक बेरोजगार आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन किंवा दुग्ध व्यवसाय केला तर अशावेळी रोजगार उपलब्ध होईलच परंतु आर्थिक भरभराट देखील होईल.

अनेक तरुणांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन किंवा दुग्धव्यवसाय करण्याची इच्छा असते परंतु दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी किंवा शेळ्या खरेदी करण्यासाठी अशा तरूणांकडे आर्थिक भांडवल उपलब्ध नसते. त्यामुळे इच्छा असूनही अशा होतकसरू तरुणांना आपला व्यवसाय सुरू करता येत नाही.

आता मात्र महाराष्ट्र शासनाच्या पशू संवर्धन विभागाच्या वतीने शासकीय अनुदानावर दोन गाई किंवा दोन म्हशी याशिवाय शेळी गट किंवा मांसल कुक्कुटपक्षी अनुदानावर देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना किंवा होतकरू तरुंनांना आपला व्यवसाय सुरू करण्यास मदत मिळणार आहे.

गाय किंवा म्हशीसाठी किती मिळेल अनुदान

सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नाविन्यपूर्ण योजनेतील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला स्वहिस्सा किती भरावा लागेल आणि या योजनेसाठी अनुदान किती मिळेल.

अनुदानाचे स्वरूप खलील प्रमाणे आहे.

संकरीत गाईसाठी प्रती गाय 70 हजार रुपये अनुदान म्हणजेच दोन गाईसाठी 1 लाख 40 हजार रुपये. यामध्ये 18 जीएसटी आणि 10.20 टक्के विमा एकूण प्रकल्प किंमत 1 लाख 56 हजार 850 रुपये होते.

अर्जदारला म्हैस घ्यायची असेल तर एका म्हशीसाठी 80 हजार याप्रमाणे 2 म्हशींची किंमत होते 1 लाख 60 हजार रुपये. यामध्ये देखील 19 हजार 258 रुपये विमा आणि जीएसटीसाठी समाविष्ट केले आहेत. एकूण प्रकल्प किंमत होते 1 लाख 79 हजार 258 रुपये.

अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर 50 टक्के हिस्सा भरावा लागेल आणि 50 टक्के अनुदान शासनाकडून मिळेल. अनुसूचीत जाती किंवा जमाती प्रवर्गातील लाभार्थ्याला मात्र 25 टक्केच हिस्सा भरावा लागेल उर्वरित 75 टक्के हिस्सा शासन भरेल.

बांधकाम कामगार योजना तीन योजना आल्या मिळणार ५१ हजार अनुदान.

शेळी गट वाटप योजना अनुदान स्वरूप

या योजनेमध्ये 10 शेळ्या एक बोकड दिला जातो किंवा 10 मेंढया आणि एक नर मेंढा अनुदान स्वरुपात दिला जातो.

शेळी जर उस्मानाबादी किंवा संगमनेरी असेल तर 8 हजार प्रती शेळी या पद्धतीने 10 शेळ्यांसाठी 80 हजार रुपये तर याच जातीच्या बोकडासाठी 10 हजार रुपये अनुदान दिले जाते.

स्थानिक पैदासीच्या शेळ्या असतील तर मात्र 6 हजार रुपये प्रती शेळी प्रमाणे 60 हजार रुपये 10 शेळ्यांसाठी दिले जाते व याच जातीच्या बोकडासाठी 8 हजार रुपये अनुदान दिले जाते.

यामध्ये देखलील सर्वसामान्य प्रवर्गातील लाभर्थ्याला 50 टक्के अनुदान तर अनुसूचीत जाती जमाती प्रवर्गातील लाभर्थ्याला 75 टक्के अनुदान शासनाकडून मिळणार आहे.

बांधकाम कामगार भांडे योजनेसाठी करा अर्ज मिळेल 30 भांडे अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा 2025

कुक्कुटपालन शेड व भांडे खरेदी करण्यासाठी अनुदान

नाविन्यपूर्ण जिल्हास्तरीय योजना अंतर्गत 1000 चौरस फुट जागेत निवासाची सोय यामध्ये स्टोअर रुम, लाइटची व्यवस्था, पाण्याची टाकी इत्यादीसाठी 2 लाख रुपये तर कुक्कुट पक्षांसाठी लागणारे भांडे, ब्रडर इत्यादीसाठी 25 हजार रुपये असे एकूण 2 लाख 25 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

यामध्ये देखील 50 आणि 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे अर्थात 50 टक्के अनुदान खुल्या प्रवर्गासाठी तर 75 टक्के अनुदान एससी एसटी प्रवर्गातील लाभर्थ्यांसाठी असणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीकडे शेड करण्यासाठी जागा मात्र स्वत:ची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली असावी.

शेळी गट वाटप योजना व इतर योजनेसाठी पात्रता

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळी गटव वाटप योजना किंवा दुधाळ गाई म्हशी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते अर्जदार पात्र असतील आणि कोणते अपात्र असतील ते खालीलप्रमाणे.

अपात्रता.

महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत नगरपालिका कटकमंडळे या क्षेत्रामधील नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाभार्थी पात्रता.

ज्यांच्याकडे १ ते २ हेक्टरपर्यंत जमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी.

अत्यल्प भूधारक शेतकरी ज्यांच्याकडे केवळ १ हेक्टरपर्यंत जमीन आहे असे शेतकरी.

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी.

सुशिक्षित बेरोजगार युवक.

महिला बचत गटातील लाभार्थी.

एका आधारकार्डला केवळ एकच मोबाईल नंबर टाकता येईल.

एकदा अर्ज केल्यानंतर ५ वर्षे अर्ज ग्राह्य धरला जाईल जेष्ठता यादीनुसार नंतर लाभ दिला जाईल.

आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन अर्ज करतांना कोणतेही कागदपत्रे अपलोड करावी लागत नाही. मात्र फोटो आणि सही अपलोड करावी लागते. अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची निवड झाली तर मात्र काही कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती खालीलप्रमाणे आहेत.

फोटो.

जमिनीचा सातबारा.

८ अ.

अपत्य दाखला.

आधार कार्ड.

लाभार्थीचे सातबाऱ्यामध्ये नाव नसल्यास संमतीपत्र.

अर्जदार जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला.

योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी AH – MAHABMS या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येतो. ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

वरील व्हिडीओ बघितल्यानंतर अर्जदाराला अर्ज करतांना कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. अर्ज करण्याआधी 80 KB साईजचा फोटो आणि ४० केबी साईजची स्वाक्षरी असणे स्कॅन करून ठेवा जेणे करून अर्ज सादर करतांना सोपे जाईल.

अशा पद्धतीने नाविन्यपूर्ण योजना २०२५ अंतर्गत दुधाळ गाई म्हशी शेळी गट वाटप योजना व इतर योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येतो.

तुम्ही जर या शेळी गट वाटप 2025 योजनेसाठी पात्र असाल तर शेवटच्या तारखेच्या आत तुमचा अर्ज सादर करून द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *