पाणंद व शेतरस्ता मोजणी फी रद्द करण्यात आली आहे आता हि मोजणी मोफत केली जाणार आहे.
शेतरस्त्यांवरून अनेक ठिकाणी वाद विवाद होत असतात, विशेषतः पावसाळा आला कि हे वाद जास्त वाढतात. अशावेळी शेतरस्ता मोजणी करण्यासाठी भूमीअभिलेख विभागाकडे मोजणी फी भरून रस्ता मोजता येत होता.
रस्ता मोजताना मोजणी फी कोणी भरावी यामध्ये देखील वाद विवाद होत होता. आता मात्र शेतातील रस्ता मोजणी फी रद्द करण्यात आली आहे याचा अर्थ शेतरस्ता मोजणी मोफत केली जाणार आहे.
शेतात ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा इतर मालवाहतूक करण्यासाठी वाहने न्यावी लागतात. रस्त्यावर अतिक्रमण केल्याने किंवा रस्ता अडविल्याने यामध्ये अडचणी निर्माण होतात.
अशावेळी रस्ता मोजणी करून हद्द कायम करावी लागते यासाठी रस्ता मोजणी फी भरावी लागत असे आता मात्र हि फी माफ करण्यात आली असून यापुढे शेतात जाणारा रस्ता किंवा पानंद रस्ता मोजणी करण्याची झाल्यास त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
शेत रस्ता अडविल्यास करा कायदेशीर कार्यवाही
लवकरच पावसाळा सुरु होत असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाळा असेल तर शेतात वाहन कोणत्याही शेतकऱ्यांच्या खाली रस्त्यातून नेता येते. परंतु पावसाळा सुरु झाल्यावर शेतात जाण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या रस्त्यावरूनच जावे लागते.
शेतरस्ता फी रद्द झाल्याने नक्कीच शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी आहे परंतु जर कोणी रस्ता अडविला तर त्यासाठी काय उपाय योजना आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.
एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी नकाशावर अगोदरच रस्ता उपलब्ध असेल आणि हा रस्ता एखाद्या शेतकऱ्याने अडविला असेल तर अशावेळी मामलेदार कोर्ट कायद्यानुसार तहसीलदार यांच्याकडे रस्ता मागणी अर्ज करता येतो.
शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर नवीन रस्ता मिळू शकतो
वरती सांगितल्याप्रमाणे शेतात जाण्यासाठी रस्ता असणे खूपच महत्वाचे आहे. शेत नकाशावर रस्ता उपलब्ध असेल आणि तो कोणी अडविला असेल तर असा रस्ता कायदेशीर पद्धतीने मोकळा करता येतो.
मात्र शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशावेळी तुम्हाला नवीन रस्ता देखील मिळू शकतो.
१९६६ च्या महाराष्ट्र जमीन अधिनियमानुसार कलम १४३ नुसार शेतात जाण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यासाठी तहसीलदार यांच्याकडे मागणी करता येते.
शेत रस्ता मागणी अर्ज मोफत हवा असेल तर खालील बटनावर क्लिक करा.
शेत रस्ता मोजणी फी रद्द झाल्याने नक्कीच अनेक रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागू शकतो.