ऊसतोड कामगार योजना संदर्भातील नवीन जी आर आलेला आहे. हि योजना कशा पद्धतीने राबविली जाणार आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
राज्यामध्ये जवळपास १२ लाख ऊसतोड कामगार आहेत. ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याची प्रोसेस लगेच सुरु होणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ अंतर्गत हि योजना राबविली जाणार आहे.
ज्या पद्धतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना ओळख पत्र मिळाले आहे अगदी त्याच पद्धतीने हे ओळखपत्र असणार आहे.
बरेच ऊसतोड कामगार हे मराठवाडा विभागातील आहेत. विशेषतः खालील जिल्ह्यातील जास्त कामगार आहेत.
बीड.
अहमदनगर.
जालना.
नांदेड.
परभणी.
धाराशिव.
लातूर.
छत्रपती संभाजी नगर.
नाशिक जळगाव.
वरील जिल्ह्यातील ऊसतोड कामगार वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कामासाठी स्थलांतर देखील करतात.
ऊसतोड कामगार योजना नोंदणी संदर्भात नवीन जी आर
राज्यातील ऊसतोड कामगार नोंदणी आणि ओळखपत्र तयार करण्यासाठी शासनाने एक एजन्सी नियुक्त केली आहे. या एजन्सी मार्फत सर्व कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.
शासनाकडून नियुक्त केलेल्या एजन्सीस ऊसतोड कामगार नोंदणी व ओळखपत्र तयार करण्यासाठी प्रती व्यक्ती १७५ रुपये खर्च येणार आहे.
असंघटीत उसतोड कामगारांना संघटीत करून त्यांना विविध योजनांचा लाभ देणे हि या योजनेचा हेतू आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी झाली आणि त्यांना ओळखपत्र मिळाले कि शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे.
योजनेचा जी आर पहा
ऊसतोड कामगार योजना कोणकोणत्या योजनांचा मिळणार लाभ
ऊसतोड कामगारांना लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळणार आहेत. त्या योजना खालीलप्रमाणे आहेत.
- ऊसतोड कामगाराच्या झोपडीस आग लागली आणि त्यामध्ये त्यांचे साहित्य नष्ट झाले तर अशावेळी कामगारास १० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळेल.
- अपघातामध्ये जर उसतोड कामगार यांचा मृत्यू झाला तर ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळेल.
- ऊसतोड कामगारांना अपघातामध्ये अपंगत्व आले तर २५०००० हजार रुपये अनुदान मिळेल.
- वैद्यकीय खर्चासाठी ५०००० रुपये अनुदान मिळेल.
- ऊसतोड कामगाराची बैलजोडी लहान असेल आणि बैलांचा अपघात झाला असेल किंवा त्यांना अपंगत्व आले असेल तर अशावेळी ७५००० रुपये अनुदान मिळेल.
- बैलजोडी मोठी असेल आणि अपघात किंवा अपंगत्व आले तर १००००० रुपये अनुदान मिळेल.
अशा प्रकारे उसतोड कामगारांना सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
ऊसतोड कामगार योजना अटी आणि शर्थी
लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार कल्याण योजनेचा लाभ केवळ उसतोड गाळप हंगाम सुरु असतांना लागू राहील. या कालावधीत त्यांना अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरी देखील या योजनेचा लाभ मिळेल.
शासनाच्या अपघातग्रस्त योजनेचा यापूर्वी लाभ घेतला असेल तर अशा अपघातग्रस्तांच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनांतर्गत खालील बाबींचा समावेश राहणार नाही.
- नैसर्गिक मृत्यू.
- योजना अंमलबजावणीपूर्वीचे अपंगत्व पात्र ठरणार नाही.
- जाणूनबुजून स्वतः जखमी करणे.
- अमलीपदार्थ सेवन करून झालेला अपघात.
- बैलगाड्यांची शर्यत.
- जवळच्या लाभ्धारकाकडून झालेला खून.
इत्यादी बाबी ऊसतोड कामगार योजनेत समाविष्ट नाहीत.
कोणत्या बाबी योजनेसाठी पात्र आहेत.
ऊसतोड कामगार योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी खालील बाबी ग्राह्य धरल्या जाणार आहेत.
रस्ता किंवा रेल्वे अपघात.
पाण्यात बुडून मृत्यू होणे.
औषधे हाताळतांना विषबाधा.
विजेचा धक्का बसून झालेला अपघात.
वीज पडून मृत्यू.
साप चावणे किंवा विंचू दंश.
जनावरांच्या हल्ल्यामध्ये जखमी होणे.
बाळंतपानातील मृत्यू.
वरील कारणामुळे जर अपघात झाला किंवा मृत्यू ओढवला तर गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार योजनेचा लाभ मिळू शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार योजना नोंदणी झाल्यावर आणि ओळखपत्र मिळविल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
- उसतोड असल्याचे ओळखपत्र.
- कामगाराचे मृत्यू प्रमाणपत्र.
- उसतोड कामगाराचे वारस असल्याबाबत वारसाची नोंद.
- कामगाराच्या वयाचे प्रमाणपत्र.
- स्थळ पंचनामा.
- नुकसान झाल्याचा फोटो.
वरील प्रकारचे कागदपत्रे योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात. योजनेचा लाभ देण्यासाठी वारस म्हणून अपघातग्रास्ताची पत्नी, अविवाहित मुलगी, कामगाराची आई, कामगाराचा मुलगा, कामगाराचे वडील, कामगाराची सून किंवा इतर अन्य कायदेशीर वारसदार.
योजनेची थोडक्यात माहिती
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अपघात झाल्यावर प्रस्ताव ३० दिवसाच्या आत जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सहआयुक्त समाजकल्याण यांच्या कार्यालयात सादर करावा. लोकनेते गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार योजना संदर्भात खाली थोडक्यात माहिती दिली आहे.
| योजनेचे नाव | गोपीनाथ मुंढे ऊसतोड कामगार योजना |
| पात्र लाभार्थी | उसतोड काम करणारे कामगार |
| किती मिळेल अनुदान | १० हजार रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल. |
| कोठे करावा अर्ज | जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सहआयुक्त समाज कल्याण |
| योजना माहिती जी आर लिंक | येथे क्लिक करा |
| योजनेचा प्रकार | महाराष्ट्र शासन. |
तुम्ही जर ऊसतोड कामगार असाल किंवा तुमच्या घरातील, मित्र परीवरील कोणी सदस्य ऊसतोडी करत असेल तर त्यांना या योजनेची माहिती जरूर द्या.

दादाराव गावंडे हे digitaldg.in चे संस्थापक असून 2018 पासून महाराष्ट्रातील सरकारी योजना, शेतकरी योजना, महिला योजना आणि बांधकाम कामगार विषयांवर माहितीपर लेखन करत आहेत. ते शासन निर्णय (GR) आणि अधिकृत माहितींवर आधारित अचूक व सोप्या भाषेत माहिती देण्यावर भर देतात. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सरकारी योजनांची योग्य माहिती पोहोचवणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.