आजच्या या लेखामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी व्यवसाय कर्ज योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ज्या व्यक्ती खाजगी नोकरीमध्ये होते लॉकडाऊनमुळे त्यांची ती नोकरी सुद्धा गेल्यामुळे बेरोजगारीमध्ये आणखीच भर पडली आहे. अशा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजना माहित असाव्यात जेणे करून ते या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
व्यवसाय कर्ज योजना संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा
सध्या अनेक वेबसाईट विविध योजना संदर्भातील माहिती देत असतात परंतु योजनेसंदर्भातील नेमकी माहिती शेतकऱ्याला समजत नाही. आपणास विनंती आहे कि, व्यवसाय कर्ज योजना संदर्भातील हि माहिती वाचून झाल्यावर एक कमेंट करायची आहे कि तुम्हाला कितपत हि माहिती समजली आहे, आणि खरोखरच या माहितीचा तुम्हाला उपयोग होईल का?
व्यवसाय करण्यास कर्ज न मिळाल्यामुळे अनेक तरुणांचा हिरमोड
अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यवसाय करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे कौशल्य देखील असते. परंतु केवळ व्यवसाय करण्यासाठी पैसे नसल्यामुळे ते व्यवसाय उभारू शकत नाहीत. व्यवसायासाठी खाजगी कर्ज काढायचे म्हटल्यास मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागते त्यामुळे केवळ व्यवसाय कर्ज न मिळाल्यामुळे हे तरुण आपला व्यवसाय सुरु करू शकत नाहीत. आजच्या ह्या लेखामध्ये आपण सुशिक्षित बेरोजगार युवकांना कोणत्या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना फायदा होईल या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घ्या.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी या योजनेचा लाभ घेतल्यास व्यवसाय करण्यास प्रकल्पासाठी जे कर्ज काढावे लागणार आहे त्या प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान या योजना मधून तरुणास मिळेल शिवाय शासकीय अनुदान मिळत असल्यामुळे व्यावसायिक कर्ज भरण्यास सोपे जाईल.
एक जिल्हा एक उत्पादन योजना
एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर हि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना योजना राबविली जाणार आहे. या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगार युवक त्यांच्या व्यवसाय उभारू शकतात. यासाठी बँकेतून कर्ज काढता येते आणि या कर्जावर ३५ टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान मिळते त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हि योजना फायदाची ठरू शकते. या योजनेसाठी २७ कोटी ५७ लाख ७८ हजार निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्यासंदर्भातील नवीन जी.आर. नुकताच म्हणजे १५ जून २०२१ ला आला आहे. हा जी.आर व या योजनेसंदर्भातील इतर महत्वाची माहिती मिळवायची असेल तर खालील लिंकवर क्लिक करून जी.आर. व योजनेची अधिक माहिती मिळवू शकता.
उद्योग उभारणीसाठी प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान मिळणार
ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ज्या पिकांचे उत्पादन घेतले जाते त्या संदर्भातील उद्योग उभारण्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. उदाहरणार्थ तुमच्या जिल्ह्यामध्ये तूर किंवा हरभरा या पिकाचे जास्त उत्पादन होत असेल तर दालमिल उद्योग उभारण्यास मदत मिळू शकते. तुमच्या जिल्ह्यामध्ये फळबाग जास्त असेल तर फळबाग प्रक्रिया उद्योग उभारण्यास मदत मिळू शकते उदाहरणच बघायचे झाल्यास जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी फळबागा जास्त आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यासाठी मोसंबी हे उत्पादन निवडण्यात आले आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घ्या.
आता तुमच्या मनांत प्रश्न निर्माण झाला असेल कि या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा तर तो प्रश्न साहजिकच आहे. MOFPI या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांना किंवा इतर ज्या कुणाला व्यवसाय करण्यासाठी कर्ज काढत असाल आणि त्यावर अनुदान हवे असेल अशा तरुणांनी रजिस्ट्रेशन करून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवावा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढे लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करू शकता. MOFPI या वेबसाईटवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे नोंदणी करून घ्या.
व्यवसाय कर्ज योजना संदर्भात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
- MOFPI या वेबसाईटवर नोंदणी करा.
- नोंदणी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवा
- योजना व प्रकल्पासंदर्भातील माहिती वाचून घ्या.
- ऑनलाईन अर्ज करा.
- ऑनलाईन करतांना तुमच्या तालुक्यातील आत्मा अधिकारी यांची देखील मदत घेऊ शकता.
एक जिल्हा एक उत्पादन योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यास जिल्हा पातळीवरून मदत मिळेल.
तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज परिपूर्ण जरी सादर करता आला नाही तरी काळजी करू नका. ऑनलाईन अर्जामध्ये जेवढी शक्य होईल तेवढी माहिती भरा. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा पातळीवर एक किंवा अनेक तज्ञाची नियुक्ती केलेली असते आणि त्यांचे कामच असते कि ज्यांना हा अर्ज भरण्यास अडचण येईल त्यांना संपूर्ण मदत करणे/ एवढेच नव्हे तर या प्रकल्पासाठी प्रकल्प अहवाल तयार कसा करावा, उद्योग आधार कसे काढावे हि व इतर संपूर्ण मदत तुम्हाला त्यांच्याकडून केली जाईल कारण तसा जी.आर. शासनाचे यापूर्वीच काढला आहे. तो जी.आर व योजने संदर्भातील माहितीसाठी खालील बटनावर टच करा.
व्यवसाय कर्ज योजना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मिळेल जिल्हापातळीवरून मदत
जेंव्हा तुम्ही नोंदणी करता त्यावेळी तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकावा लागतो. जिल्हा पातळीवर नेमलेला मदतनीस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फोन करून संपर्क साधेल आणि तुम्हाला येत असलेल्या अडचणी सोडविण्यास पूर्ण मदत करेल. तुम्हाला या योजना संदर्भात ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. हे मदतनीस जिल्हातील सर्व अर्जदारांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप ( WhatsApp Group ) बनवितात आणि त्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करतात.
जिल्ह्यातील एक जिल्हा एक उत्पादन अर्जदारांचा व्हॉट्सॲप ग्रुप
एक जिल्हा एक उत्पादन योजनेसंदर्भातील एखादी मिटिंग असेल किंवा प्रशिक्षण असेल तर त्या संबधीची सूचना या व्हॉट्सॲप ग्रुप येते त्यामुळे तुम्ही माहितीच्या बाबतीत अपडेट राहू शकता. तुमच्या सारखेच इतर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या योजनेसाठी अर्ज केलेला असतो त्यामुळे तुम्ही आणि इतर सुशिक्षित बेरोजगार युवक एकत्र जोडले जातात आणि या योजनेतून जो प्रकल्प राबविण्यात येणार आहे त्या संदर्भात विचारांची देवाण घेवाण होते.
खाली काही महत्वाच्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हि योजना कशी आहे या संदर्भातील मागील जुने संपूर्ण जी.आर. व योजनेची माहिती बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
नवीन जी.आर. बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
या संदर्भातील इतर माहितीचे व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ऑनलाई अर्ज करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
शेती संबधित विविध विषयावरील माहितीसाठी आमच्याशी जोडा
आम्ही सतत शासकीय योजना व इतर माहितीचे व्हिडीओज आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर प्रसारित करत आलेलो आहे या व्हिडीओमुळे अनेक शेतकरी बांधवांना मदत मिळत आहे तुम्ही देखील आमच्या युट्युब चॅनलशी जोडू शकता त्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या फेसबुक ग्रुप व व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये सहभागी व्हा. शेती व इतर विविध शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना फेसबुकवर किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर लिंक शेअर करण्यास विसरू नका.
Apan sagitleli mahiti yogya aahe pan kutlya Dist sati kutla udyog aahe jas me Bhandara Dist cha aahe tar mla kutla udyog kraych aahe
प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील महत्वाच्या उत्पादननुसार उद्योग निवडला जातो तुमच्या तालुक्यामध्ये आत्मा संस्थेने अधिकारी असतील तर त्यांना पण तुम्ही या संदर्भात विचारू शकता.
पोल्ट्री फार्म लोन भेटू शकतो का
तुमच्या जिल्ह्यात जे उत्पादन निवडले आहे त्या उद्योगावर दिले जाते अनुदान
Hello sir,
GR link bhetli tar bar hoiel.