शेतकरी कर्जमाफीसाठी १.२५ कोटी निधी वितरण बाबत शासनाच्या नवीन जी. आर आलेला आहे. बँकेचे कर्ज वेळेवर मिळाले नाही तर शेतकऱ्यांना सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी जावे लागते. शासनाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांनी शासकीय बँकेचे कर्ज घेतले होते त्यांचे कर्ज माफ झालेले आहेत किंवा होत आहेत. परंतु जय शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते त्याचे काय?
शासनाने याच बाबीवर विचार विनिमय करून ज्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे त्यांचे कर्ज सुद्धा माफ केले जाईल अशी घोषणा केलेली आहे आणि त्या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत.
हा लेख पण वाचा असे पहा तुमची पीएम किसान योजनेची ekyc झाली आहे किंवा नाही.
शेतकरी कर्जमाफीसाठी १.२५ कोटी संदर्भातील शासन निर्णय पहा.
ज्या शेतकऱ्यांनी खाजगी सावकार म्हणजेच असा सावकार ज्याकडे सावकारी करण्याचा शासनाचा अधिकृत परवाना आहे. अशा सावकारांकडून शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले असेल आणि ते थकबाकीत असेल तर अशा शेतकऱ्यांचे सर्व कर्ज शासन देणार आहे.
यासाठी लागणारा निधी वितरीत करण्यासंदर्भात आज दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी शासन निर्णय शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेली आहे. हा शासन निर्णय म्हणजेच जीआर तुम्हाला बघायचा असेल तर खालील बटनावर क्लिक करा.
शेतकरी कर्जमाफीसाठी १.२५ कोटी निधी वितरणामुळे शेतकऱ्यांना मिळणार लवकरच लाभ.
या शासन निर्णयानुसार विदर्भ व मराठवाडा या क्षेत्रातील शेतकऱ्यांस या योजनेचा लाभ मिळणार आहे. ३७४९ एवढ्या शेतकऱ्यांनी परवाना धारक सावकारांकडून कर्ज घेतलेले आहे. सध्यास्थितीमध्ये या योजनेसाठी २.५० एवढा निधी वितरीत करण्यात आलेला असून उर्वरित १.२५ कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांना बँकेचे लोन घेण्यासाठी खूपच कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते यामुळे एनवेळी शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही त्यामुळे त्यांना खाजगी सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी जावे लागते.
ज्या सावकारांकडे सावकारी करण्याचा शासकीय परवाना आहे ते शासनाच्या नियमाच्या अधीन राहून कर्ज देतीलही परंतु जे खाजगी सावकार आहे ते शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज देवून पिळवणूक करू शकतात.
पुढील लेख पण वाचा मोबाईलवरून असी करा पी एम किसान योजनेची ekyc
शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे यासाठी शासनाची कृषी कर्ज मित्र योजना.
कमी कागदपत्रे सादर करून शेतकऱ्यांना वेळेवर बँकेचे कर्ज मिळवे यासाठी शासनाचे आणखी एक नवीन योजना सुरु केलेली आहे ज्या योजनेचे नाव आहे शेतकरी कृषी कर्ज मित्र.
कृषी कर्ज मित्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यास मदत करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळू शकेल. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने कृषी कर्ज मित्रांना कोणकोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.