Crop loan online application पिक कर्ज नोंदणी नवीन लिंक आली

Crop loan online application पिक कर्ज नोंदणी नवीन लिंक आली

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता crop loan online application ची नवीन लिंक आलेली आहे. हि लिंक कोणती आहे. नवीन अर्ज कसा करावा या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेवूयात.

अनेक शेतकरी बांधवाना शेतीसाठी कर्ज हवे असते. बँकेकडून कर्ज मिळाले नाही तर सावकाराकडून अशा शेतकरी बांधवाना कर्ज घ्यावे लागते. अशावेळी जर शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज मिळाले तर नक्कीच शेतकऱ्याचे सोईचे होऊन जाते.

शासकीय योजनांची मोफत माहिती हवी असेल तर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा.

Crop loan online application नवीन लिंक उपलब्ध.

पूर्वी कर्ज मागणीसाठी गुगल लिंक देण्यात आली होती. या लिंकवर क्लिक करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीचे तसेच बँकेचे सर्व तपशील टाकून अर्ज सादर करावा लागत होता. कर्ज मागणी अर्ज गुगल फॉर्मवर सादर केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती कळत नव्हती.

आता कर्ज मागणी करण्यासाठी नवीन लिंक जालना जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आलेली आहे. या लिंकवर क्लिक करून जालना जिल्ह्यातील शेतकरी त्यांचा अर्ज सादर करू शकतात. नवीन लिंकद्वारे पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती पहा.

crop loan online application

Crop loan online application संदर्भातील व्हिडीओ पहा.

Crop loan online application अर्थात पिक कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने समजावे यासाठी आम्ही एक व्हिडीओ तयार केला आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्ही त्या पद्धतीने तुमचा पिक कर्जाचा ऑनलाईन अर्ज अगदी आरामात सादर करू शकता.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पिक कर्ज ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  • https://jalna.cropsloan.com/ या वेबसाईटला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
  • वेबसाईटओपन झाल्यावर या ठिकाणी दोन लिंक दिसतील १) नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा. २) अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
  • नवीन अर्ज करण्यासाठी नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा क्लिक करा.
  • तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर पिक कर्ज नोंदणी अर्ज ओपन होईल. त्यामध्ये विचारलेली माहिती भर आणि अर्ज सादर करा.
  • तुम्ही केलेल्या अर्जाची सद्यस्थिती बघण्यासाठी अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा या लिंकवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल.

पिक कर्जासाठी नवीन लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज कसा करावा हे अधिक चांगल्या सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावे यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हिडीओ पहा.

व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *