शेतकरी बांधवांसाठी केंद्र शासन विविध योजना राबवीत असते. यापैकीच एक योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना होय pm kisan mandhan yojana.
पीएम किसान मानधन योजनेसाठी नियमित हफ्ते भरल्यास शेतकरी बांधवाना वयाच्या ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये एवढे पेन्शन मिळते.
या योजनेसाठी तुम्ही अगदी काही मिनिटामध्ये तुमचा अर्ज करू शकता. सीएससी सेंटर आणि स्वतः ऑनलाईन अर्ज कसा करता येते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पुढील योजना पण बघा बांधकाम कामगार नोंदणी अर्जाचे ऑनलाईन माहिती तपासा मोबाईलवर
पीएम किसान मानधन योजना 2022
सगळ्यात आधी सीएससी सेंटर युजर आयडी वापरून पीएम किसान मानधन योजना ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा हे जाणून घेवूयात.
त्यानंतर ज्या शेतकरी बांधवाना हा अर्ज स्वतः ऑनलाईन करायचा आहे या संदर्भात माहिती अगदी सविस्तरपाणे जाणून घेवूयात.
दोन्ही अर्ज ऑनलाईन कसे केले जातात या संदर्भातील एक व्हिडीओ देखील शेतकरी बांधवांसाठी बनविण्यात आलेला आहे.
पीएम किसान मानधन योजना ऑनलाईन अर्ज व्हिडीओ पहा
व्हिडीओ पाहून देखील तुम्ही तुमचा पीएम किसान मानधन योजना ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. या व्हिडीओची लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे.
सगळ्यात अगोदर जाणून घेवूयात कि हि योजना कोणासाठी आहे.
- हि योजना अशा शेतकरी बांधवांसाठी आहे ज्यांच्याकडे २ हेक्टर पर्यंत जमीन आहे.
- १८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकरी या योजनाचा लाभ घेऊ शकतात.
- नियमितपणे हप्ते भरल्यास ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला ३ हजारची पेन्शन मिळते.
- १८ वर्षे वय असणाऱ्या शेतकऱ्यांना ५५ रुपये हफ्ता तर ४० वर्षे वय असणाऱ्या शेतकऱ्यांना २०० रुपये हफ्ता भरावा लागतो.
- या योजनेसाठी ५० टक्के रक्कम शेतकरी तर उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून भरली जाते.
चला तर आता जाणून घेवूयात कि पीएम किसान मानधन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा आणि कोणत्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
असा करा ऑनलाईन अर्ज.
- https://maandhan.in/scheme/pmkmy या वेबसाईटवर जा किंवा येथे क्लिक करा.
- वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर Enrolment हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
- या ठिकाणी तुम्हाला PM Kisan mandhan yojana असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर Self enrolment आणि CSC VLE असे दोन पर्याय दिसतील त्यावर क्लिक करा.
- शेतकरी स्वतः PM Kisan mandhan yojana ऑनलाईन अर्ज करणार असेल तर Self enrolment या पर्यायावर क्लिक करा.
- एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
सीएससी सेंटरवर देखील सादर केला जातो पी एम किसान मानधन योजनेच अर्ज.
ज्या प्रमाणे शेतकरी स्वतः PM Kisan mandhan yojana ऑनलाईन अर्ज करतांना माहिती सादर करतात अगदी तशाच पद्धतीने सीएससी युजर आयडी आणि पासवर्ड वापरून माहिती सादर करावी लागते. अधिक माहितीसाठी वरील व्हिडीओ पहा.