Soyabean rate today market शेतकरी बांधवानी साठवून ठेवलेला सोयाबीन विक्रीसाठी काढण्यास सुरुवात केली आहे. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणत सोयाबीनची आवक वाढलेली आहे. सोयाबीनची आवक वाढल्याने सुरुवातीला मिळत असलेल्या भावामध्ये किंचित घसरण झालेली आहे.
मात्र काही दिवसानंतर सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे. अजून काही दिवसानंतर सोयाबीनचे भाव ६ हजार रुपये प्रती क्विंटल वाढू शकतात.
फेब्रुवारी २०२२ मध्ये सोयाबीनच्या किंमतीमध्ये कमालीची वाढ झाली होती. त्यावेळी सोयाबीन 7हजार प्रती क्विंटलप्रमाणे विकला गेला होता. यामुळे खरीप हंगाम २०२२ मध्ये अनेक शेतकरी बांधवानी सोयाबीनचा पेरा वाढविला होता.
केवळ मराठवाड्याचा विचार केला तर एकट्या मराठवाड्यामध्ये 23 लाख 98 हजार 967 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती.
पुढील लेख पण वाचा मक्याला ३ हजार पेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता हे आहे मोठे कारण.
सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता Soyabean rate today market
राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे आणि त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसाने सोयाबीन भिजल्याने काळवंडलेली होती शिवाय सुरुवातीला सोयाबीनमध्ये ओलावा असल्याने अशा सोयाबीन पिकास कमी भाव मिळत होता.
सोयाबीन हे तेलवर्गीय पिक आहे. दैनदिन जीवनामध्ये स्वयंपाकासाठी तेल खूप गरजेचे असते. सोयाबीन तेलाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. गरजेच्या वस्तूंची किंमत शक्यतो जास्त कमी होत नाहीत.
अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जमा करून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीमध्ये म्हजेच ढीगामध्ये पाणी गेल्याने सोयबीन काळा पडला आहे. त्यामुळे अशा खराब सोयाबीनला कमी भाव मिळत आहे.
सुरुवातीला मिळाला कमी भाव
परंतु चिंता करण्याचे कारण नाही लवकरच सोयाबीनचे भाव वाढू शकतात असे जाणकारांचे मत आहे. सोयाबीन पिकास चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीन पिकांची साठवणूक करून ठेवलेली आहे. सोयाबीनचे दर ४८०० पासून आजपर्यंत ५९०० पर्यंत गेलेले आहेत अर्थात हा काही तंतोत आकडा नसला तरी भविष्यामध्ये सोयाबीन पिकाला नक्कीच चांगला भाव मिळू शकतो.
तुमच्याकडे देखील सोयाबीन असेल तर बाजार भावाचा अंदाज घेवूनच विक्रीस काढावा. तुम्हाला जो अपेक्षित भाव असेल तो भाव आल्यास सोयाबीन विक्रीस काढावा अन्यथा थोडी वाट बघावी.
शेतकरी बांधवांकडे आर्थिक अडचण निर्माण झाली के ते सोयाबीन विक्रीस काढतात अर्थात त्यासाठी काहीच पर्याय नसतो. त्यामुळे वाटेल त्या किमतीस सोयाबीन शेतकरी विकून टाकतात. थोड्या दिवसानंतर त्याच पिकांचे भाव वाढले कि मग अशा शेतकरी बांधवाना थोडासा पश्चाताप होण्याची शक्यता असते.
का वाढणार आहे सोयाबीनचा भाव पहा सविस्तर माहिती
आर्थिक अडचण नसेल तर घाई न करता योग्य वेळी माल मार्केटमध्ये विक्रीस न्यावा जेणे करून चांगला बाजार भाव मिळेल. परंतु कधी कधी उलट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही हि बाब शेतकरी बांधवानी आवर्जून ध्यानी घ्यावी.
भाव वाढण्याची अपेक्षा ठेवून शेतकरी बांधव माल विकत नाहीत परंतु शेवटी अगदी कमी किमतीमध्ये माल द्यावा लागतो आणि शेतकरी बांधवाना तोटा सहन करावा लागतो त्यामुळे या बाबीचा पण विचार करणे गरजेचे आहे Soyabean rate today market.
जाणून घ्या का वाढणार आहेत सोयाबीनचे दर पहा सविस्तर माहिती येथे क्लिक करा.
सोयाबीनचे भाव वाढण्याची जशी शक्यता आहे तशी ती कमी होण्याची देखील असते त्यामुळे सारासार विचार करून शेतकरी बांधवानी आपली सोयाबीन विक्रीस न्यावी.