शेत रस्ता प्रश्न सुटणार शिवाय शेतरस्त्याची नोंदणी जमिनीची रजिस्ट्री करतांना इतर अधिकारामध्ये घेतली जाणार पहा सविस्तर माहिती.
वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत संबधित तालुक्यातील तहसीलदार यांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यात अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
जे अस्तित्वातील रस्ते आहेत त्यांना आता क्रमांक मिळणार आहे. यापुढे जमीन खरेदी किंवा विक्रीच्या रजिस्ट्रीमध्ये जे शेत घेतले किंवा विकले त्यासाठी कोणता रस्ता आहे हे दाखविणे बंधनकारक करणे.
शेतरस्त्याच्या नोंदी सातबाराच्या इतर अधिकारामध्ये दाखविणे या संदर्भात सूचना महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.
तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर त्यासाठी तुम्ही तहसील कार्यालयात अर्ज देखील सादर करू शकता.
शेत रस्ता मागणी अर्ज डाउनलोड करण्यसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Rasta magni arj 2024 शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा
शेत जमीन वहिवाटरस्ता संदर्भात तहसीलदार यांना सूचना करण्याचे निर्देश
शेत जमीन वहिवाटरस्ता संदर्भात तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या असून आता रस्ता प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लागणार आहेत.
रस्ता वाद तक्रार असेल तर त्या संदर्भात सगळ्यात आधी तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली जाते त्यानंतर तक्रारदार थेट उच्च नायालयात अपील करू शकतात.
परंतु थेट उच्च न्यायालयात अपील होण्यापूर्वी आता मध्यस्त म्हणून आणखी नवीन एक पर्याय देण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी.
थेट उच्च न्यायालयात अपील करण्यापूर्वी अतिरिक्त उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागता येणार आहे अर्थात या संदर्भात महसूल मंत्री यांनी सूचना केल्या असून लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता आवश्यक
शेतीमध्ये यांत्रिकीकारणाने अनेक कामे केली जातात. यामुळे आता बैलबारदाना एवजी सर्रासपणे ट्रॅक्टरचलित यंत्राच्या सहाय्याने अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील कामे करत आहेत.
परंतु काही ठिकाणी पाउलवाट असल्याने अशा रस्त्याने ट्रॅक्टर जावू शकत नाही त्यामुळे शेतीची मशागतीच्या कामांवर विपरीत परिणाम होतो.
शेतात खत न्यायचे असेल तर ते देखील रस्त्याअभावी करता येत नाही.
शेतातील मालाची मळणी केल्यानंतर रस्ता नसल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल योग्य वेळी बाजारात आणता येत नसल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते.
यामुळे शेतीला रस्ता असणे गरजचे आहे.
शेत रस्त्यासाठी 24 लाख रुपये मिळणार मंत्र्याची माहिती
शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर मिळतो नवीन शेत रस्ता
तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल किंवा आहे तो रस्ता कोणी अडविला असेल तर अशावेळी तुम्ही तहसीलदार यांच्याकडे दाद मागू शकता.
रस्ता मागणी केल्यानंतर किंवा रस्त्याची तक्रार केल्यानंतर तहसीलदार या प्रकरणात हस्तक्षेप करून निर्णय देवू शकतात.
अर्थात तहसीलदार यांच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आवाहन देखील देता येते.
शेत रस्ता प्रश्न सुटणार असल्याने शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.