सौरचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज 2025 सुरु मोबाईलवरून असा करा अर्ज

सौरचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज 2025 सुरु मोबाईलवरून असा करा अर्ज

सौरचलीत फवारणी पंप ऑनलाईन अर्ज 2025 सुरु झालेले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध अनुदान योजनेसाठी अर्ज करता येतो. हे अर्ज तुम्ही आता मोबाईलवरून देखील करू शकतात. पूर्वी वेबसाईटचा इंटरफेस हा मोबाईल फ्रेंडली नव्हता आता मात्र वेबसाईटमध्ये बदल करण्यात आला असून मोबाईलवरून देखील अर्ज करता येणार आहे.

ज्या शेतकरी बांधवाना सीएससी सेंटरवर जाण्यास वेळ नाही किंवा ऑनलाईन सेंटर जाता येत नाही असे शेतकरी बांधवान आता सौर चलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन देखील अर्ज सादर करू शकतात. फवारणी पंप ऑनलाईन अर्ज 2025 संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Shetkari yojana Maharashtra महाडीबीटी शेतकरी योजना महाराष्ट्र

सौर चलित फवारणी पंपाचे फायदे

शेतकरी बांधवाना आपल्या शेतातील पिकांवर औषधी फवारणी करण्यासाठी फवारणी पंपाची आवश्यकता असते. अनेक शेतकरी बांधवांना पेट्रोल किंवा डीजेल इंजिनवर चालणाऱ्या फवारणी पंपाचा उपयोग करून औषध फवारणी करतात.

फवारणी पंप खरेदी करण्यासाठी खर्च तर येतोच परंतु त्यावर औषध फवारणी करण्यासाठी पेट्रोल किंवा डीजेलसाठी वेगळा खर्च येतो. यामध्ये शेतकरी बांधवाना अधिकच खर्च करावा लागतो.

आता मात्र सौर चलित फवारणी पंप अनुदानावर मिळणार आहे. यासाठी शेतकरी बांधवान महाडीबीटी या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया अगदी सोपी असून मोबाईलद्वारे देखील ऑनलाईन अर्ज सादर करता येवू शकतो.

कसा मिळणार योजनेचा लाभ

शेती संबधित विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना महाडीबीटी वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो. पूर्वी लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवड केली जाता होती.

आता मात्र महाडीबीटी योजनांच्या धोरणांमध्ये बदल करण्यात आला असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नुसार लाभ दिला जाणार आहे. शिवाय लॉगीन करण्यासाठी आता शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.

ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी नसेल ते शेतकरी महाडीबीटी योजनेचा लाभ घेवू शकत नाही.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जे शेतकरी प्रथम अर्ज करतील त्यांना प्रथम लाभ दिला जाईल. अर्ज करण्याची प्रोसेस अगदी सोपी असून मोबाईलवरून देखील ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.

महाडीबीटी वेबसाईटवर सौर चलित फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा या संदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

सौर चलित फवारणी पंप योजनेचा अर्ज करण्याची पद्धत

सौरचलीत फवारणी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करा.

ब्राउजरच्या सर्च बारमध्ये mahadbt farmer login असा शब्द सर्च करा.

agri login या लिंकवर क्लिक करा.

वेबसाईटला खाली स्क्रोल करा. सूचना वाचून घ्या ओके या बटनावर क्लिक करा.

तुमचा शेतकरी आयडी दिलेल्या चौकटीमध्ये टाका.

असा जाणून घ्या तुमचा फार्मर आयडी

कदाचित तुम्हाला तुमचा शेतकरी आयडी माहित नसेल तर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा अशी एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा.

आधार नंबर टाका आणि get OTP या बटनावर क्लिक करा.

दिलेल्या चौकटीत otp टाकून otp तपासा या बटनावर क्लिक करा.

या ठिकाणी तुम्हाला तुमचा शेतकरी ओळख क्रमांक दिसेल तो सेव्ह करून घ्या आणि ओके या बटनावर क्लिक करा.

आता हा शेतकरी ओळख क्रमांक या चौकटीमध्ये आपोआप समाविष्ट होईल त्या खाली दिसत असलेल्या otp पाठवा या बटनावर क्लिक करा.

दिलेल्या चौकटीमध्ये otp टाईप करा आणि otp तपासा या बटनावर क्लिक करा.

सौरचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

सौरचलित फवारणी पंप ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

  • महाडीबीटी पोर्टलवर लॉगीन केल्यानंतर अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस खालील पद्धतीने आहे.
  • अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  • कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
  • मुख्य घटक या पर्यायासाठी कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
  • तपशिलामध्ये मनुष्यचलित औजारे हा पर्याय निवडा.
  • यंत्रसामग्रीमध्ये पिक संरक्षण औजारे हा पर्याय निवडा. मशिनच्या पर्यायामध्ये सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय निवडा. बॉक्सला टिक करा.
  • जतन करा या बटनावर क्लिक करा. अजून काही अर्ज करायचे असल्यास एस या बटनावर क्लिक करा किंवा नो या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

पहा या बटनावर क्लिक करा.

बॉक्समध्ये टिक करून pay application fees या बटनावर क्लिक करा.

महाडीबीटी ऑनलाईन पेमेंट करण्याची पद्धत

२३.६० एवढी फी नवीन अर्जदाराला भरावी लागणार आहे. Make payment या बटनावर क्लिक करून पेमेंट करा.

पेमेंट करण्यासाठी या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी कोणताही एक पर्याय वापरून पेमेंट करा.

शक्यतो क्यूआर कोड वापरून पेमेंट करणे सोपे असते त्यामुळे हा पर्याय वापरल्यास सोप्या पद्धतीने पेमेंट होईल.

पेमेंट यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर पावती काढून घ्या.

अर्जाच्या पावतीची प्रिंट काढण्यासाठी किंवा पावती pdf मध्ये सेव्ह करण्यासाठी घटक इतिहास पहा या बटनावर क्लिक करा.

लागू केलेले घाटक या पर्यायावर क्लिक करा.

पावती पहा या बटनाखाली दिसत असलेल्या बाणावर क्लिक करताच सदरील पावती तुम्हाला दिसेल हि पावती प्रिंट करून घ्या किंवा तुमच्या मोबाईलमध्ये pdf मध्ये सेव्ह करून घ्या.

अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर सौरचलित पंपासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो.

Maha dbt website link

योजनेचा सारांश

सौर चलित फवारणी पंप योजनेची संक्षिप्त माहिती खालीलप्रमाणे. फवारणी पंप ऑनलाईन अर्ज 2025.

योजनेचे नाव.सौरचलित फवारणी पंप योजना.
वेबसाईट.महाडीबीटी.
अर्ज करण्याची पद्धत.ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.नोंदणी केल्यानंतर लॉगीन करण्यासाठी फार्मर आयडी.
लाभार्थी पात्रता.शेतकरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *