2025 परदेश अभ्यास दौरा : शेतकऱ्यांसाठी विमानाने जाण्याची सुवर्णसंधी

2025 परदेश अभ्यास दौरा : शेतकऱ्यांसाठी विमानाने जाण्याची सुवर्णसंधी

2025 परदेश अभ्यास दौरा योजना अंतर्गत शेतकर्‍यांना विमानाने परदेश वारी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. या दौर्‍यामध्ये शेतकर्‍यांना शेती विषयक भरपूर माहिती मिळणार आहे.

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाची भर घालून उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही वाढवणं हे आजच्या काळात अत्यावश्यक बनलं आहे.

हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत परदेश कृषी अभ्यास दौरा योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण १८० शेतकऱ्यांना विविध परदेशांमध्ये शेती अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी दिली जाणार आहे. यामध्ये विशेष बाब म्हणजे महिला शेतकरी व कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी ३४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

2025 परदेश अभ्यास दौरा योजनेचा उद्देश काय आहे?

विदेशातील प्रगत शेती पद्धती, अत्याधुनिक यंत्रसामग्री, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यात व्यवस्था, जलसंधारण तंत्रज्ञान आणि जैविक शेतीचे अनुभव घेऊन, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बदल घडवावेत, हा या 2025 परदेश अभ्यास दौरा योजनेचा मुख्य हेतू आहे.

या परदेश अभ्यास दौर्‍यामुळे शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील शेतीविषयक संकल्पना, मार्केटिंग युक्त्या आणि प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहेत, जे त्यांच्या वैयक्तिक विकासासाठी आणि त्यांच्या गावातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकणार आहेत.

कोणती देशदौरे उपलब्ध आहेत?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील देशांमध्ये अभ्यास दौऱ्यासाठी जाण्याची संधी दिली जाणार आहे.

  1. दौरा 1 : युरोप – नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स.
  2. दौरा 2 : इस्राईल.
  3. दौरा 3 : चीन.
  4. दौरा 4 : जपान.
  5. दौरा 5 : मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपिन्स.
  6. दौरा 6 : दक्षिण कोरिया.

वरील देशांमध्ये जावून तेथील शेतीचे प्रगत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा आपल्या शेतामध्ये उपयोग करून आपला पर्यायाने इतरांचा विकास साधने शक्य होऊ शकते.

जिल्हावार लक्षांक (Target Quota)

विभागशेतकरी संख्येचा उद्दिष्ट
कोकण२५
नाशिक२०
पुणे१५
कोल्हापूर१५
संभाजीनगर१५
लातूर२५
अमरावती२५
नागपूर३०

परदेश दौर्‍यासाठी कोणत्या व्यक्ती ठरतील पात्र

परदेश अभ्यास दौरा योजनेसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत :

तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून अर्ज प्रमाणित असणे आवश्यक आहे.

अर्जदाराने यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून परदेश दौरा केलेला नसावा.

उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत शेतीच असावे.

अर्जदार कोणत्याही सरकारी/खासगी नोकरीत किंवा व्यावसायिक सेवेत (डॉक्टर, वकील, इंजिनिअर, ठेकेदार) नसावा.

महिला शेतकरी, केंद्र/राज्य शासनाचे कृषी पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि पीक स्पर्धा विजेते यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे .

शेतकऱ्यांना द्यावे लागणारे हमीपत्र (Declaration)

शेतकऱ्यांनी अर्जासोबत एक स्वघोषणा (Declaration) व हमीपत्र द्यावे लागेल, ज्यात खालील बाबी नमूद असतील:

  • मी यापूर्वी शासकीय मदतीवर कोणताही विदेश दौरा केलेला नाही.
  • माझे उत्पन्न फक्त शेतीवर अवलंबून आहे.
  • मी कोणत्याही शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था किंवा खासगी नोकरीत नाही.
  • डॉक्टर, वकील, अभियंता, ठेकेदार इत्यादीपैकी मी व्यावसायिक नाही.

2025 परदेश अभ्यास दौरा अर्जाचा नमुना कुठे मिळेल?

शासनाने 2025 परदेश अभ्यास दौरा संदर्भातील प्रस्तावाचा अधिकृत नमुना PDF स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.

शेतकऱ्यांनी हा नमुना डाऊनलोड करून प्रिंट काढावी आणि सर्व संबंधित माहिती भरून, तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून सादर करावा.

📥 अर्ज नमुना PDF डाउनलोड करा

वरील बाटनावर क्लिक करून हा अर्ज डाउनलोड करून घ्या. यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.

योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.

  • विहित नमुन्यातील अर्ज प्रपत्र – १
  • स्वयंघोषणा प्रपत्र घोषणा – २
  • वैध पासपोर्ट अर्थात पारपत्राची झेरॉक्स प्रत.
  • ७/१२ व ८ अ ची मूळ प्रत.
  • आधार प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.
  • शिधापत्रिका अर्थात राशन कार्डची झेरॉक्स प्रत.
  • वैदकीय अधिकारी यांचे आरोग्य स्वस्थ असल्याचे प्रमाणपत्र.

वरील कागदपत्रे या योजेंचा लाभ घेण्यासाठी प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदाराने द्यावयाचा हमी पत्राचा नमुना देखील याच कागदपत्रांसोबत जोडलेला आहे. त्यामुळे वरील बटनावर क्लिक करून तुम्ही प्रस्तावाचा हा परिपूर्ण प्रस्तावाचा नमुना डाउनलोड करू शकता.

निवड प्रक्रिया कशी असेल?

  • जिल्हास्तरीय समिती १ ऑगस्ट २०२५ रोजी अर्जांची सोडत घेणार आहे.
  • अर्ज पूर्ण असणे आणि नियमांनुसार असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • निवड झालेल्या शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाईल.
  • जर महिलांसाठी व कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसाठी राखीव जागा भरण्यासाठी आवश्यक त्या संख्येने पात्र अर्जदार न मिळाल्यास, उर्वरित जागा इतर पात्र शेतकऱ्यांनी भरल्या जातील.
परदेश अभ्यास दौरा योजना 2025–26 साठी कोण पात्र आहे?

महिला शेतकरी, केंद्र/राज्य शासनाचे कृषी पुरस्कार विजेते, पीक स्पर्धा विजेते आणि अन्य प्रयोगशील शेतकरी अर्ज करू शकतात. अर्जदार शेतीवर पूर्णतः अवलंबून असावा आणि यापूर्वी विदेश दौऱ्यावर गेला नसावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

✅ या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2025 आहे. त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या दौऱ्यात कोणत्या देशांना भेट दिली जाईल?

या योजनेत युरोप (नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड), इस्राईल, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, चीन, फिलिपिन्स इत्यादी देशांचा समावेश आहे.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

अर्जाचा नमुना PDF स्वरूपात उपलब्ध आहे. तो भरून तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून पुढे विभागीय कृषी संचालकांमार्फत कृषी आयुक्तालय पुणे येथे पाठवावा लागतो.

महिला शेतकऱ्यांना किती जागा आहेत?

महिला शेतकऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक आणि एकूण 34 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांसाठी विशेष प्राधान्य आहे का?

होय. राज्य किंवा केंद्र शासनाकडून कृषी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांना अग्रक्रम देण्यात येणार आहे, आणि त्यांच्या साठीही 34 जागा राखीव आहेत.

परदेश दौऱ्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे का?

होय, वैध पासपोर्ट आवश्यक आहे. जर पासपोर्ट नसेल तर अर्ज करताना त्याची प्रक्रिया सुरू असल्याचा पुरावा (जसे की अप्लिकेशन रसीद) द्यावी.

अर्ज फॉर्म कुठे मिळेल?

अर्जाचा अधिकृत नमुना PDF वेबसाईटवर उपलब्ध आहे. तुम्ही तो खालील लिंकवरून डाउनलोड करू शकता:
📥 अर्ज नमुना PDF डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *