mahadbt krushi yojana रोपवाटिका अनुदान योजना

mahadbt krushi yojana रोपवाटिका अनुदान योजना

mahadbt krushi yoajana महाराष्ट्र शासन कृषी योजना 2024 अंतर्गत रोपवाटिका योजना विषयी आपण जाणून घेणार आहोत. रोपवाटीका व्यवसाय व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला असल्यामुळे या व्यवसायास खूप चांगले भविष्य आहे.

आधुनिक रोपवाटिका योजना राबवून तसेच चांगल्या प्रकरे नर्सरी व्यवस्थापन करून अनेक शेतकरी चांगल्या प्रकारे अर्थार्जन करताहेत. रोपवाटिका किंवा नर्सरी योजनेविषयी तुम्ही मराठीमध्ये माहिती शोधत असाल तर तुमचा शोध या ठिकाणी संपत आहे.

या ठिकाणी रोपवाटिका अनुदान आधारित ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

कृषी विभाग योजना 2020

मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासन कृषी योजना 2020 विषयी माहिती जाणून घेणार आहोत. शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु असतात.

जसे कि ट्रॅक्टर योजना, कांदा चाळ योजना, रोपवाटीका योजना अशा अनेक योजना शेतकरी अनुदान योजना शासनाच्या वतीने सुरु असतात.

परंतु कृषी विभागाच्या योजना विषयी शेतकऱ्यांना कदाचित माहिती नसते आणि केवळ माहिती न मिळाल्यामुळे शेतकरी अशा अनुदान योजना पासून वंचित राहण्याची शक्यता असते.

शेतकरी अनुदान योजना किंवा कृषी विभाग योजना  महाराष्ट्र शासन त्याच प्रमाणे शेतकरी योजना माहिती किंवा अनुदान योजना महाराष्ट्र या विषयावर शेतकऱ्यांना माहिती मिळावी यासाठी डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर विविध शासकीय योजनेचे व्हिडीओ अपलोड केले जातात.

तुम्ही ते व्हिडीओ बघून विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट द्या. येथे क्लिक करा.

mahadbt krushi yojana  शेतकरी स्वतः भरू शकतात रोपवाटिका योजना फॉर्म.

मित्रांनो शासकीय योजना म्हटले कि अनेकांना वाटते कि csc center, आपले सेवा किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस असलेल्या केंद्रावरच सदरील योजनेचे फॉर्म्स भरावे लागतात परंतु असे नाही मित्रांनो.

तुम्ही स्वतः देखील या योजनेचा फॉर्म भरू शकता, त्यासाठी फक्त थोडे मार्गदर्शन हवे असते. रोपवाटिका म्हणजेच नर्सरी निर्माण करून तुम्ही अनेक प्रकारची रोपे निर्माण करून त्यामधून पैसे कमावू शकता.

शेती संबधित हा व्यवसाय असल्याकारणाने आपण याला जोड व्यवसाय म्हणू शकतो. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रोपांचा पुरवठा करून एक प्रकारे त्यांच्यासाठी  हि सेवाच ठरू शकते. त्यामुळे रोपवाटिका या व्यवसायामधून पैसा आणि समाधान दोन्ही गोष्टी मिळतात.

खालील योजनेचा पण लाभ घ्या.

बांधकाम कामगार शिष्यवृत्तीसाठी कागदपत्रे लागतात pdf मध्ये डाउनलोड करून घ्या

रोपवाटिका व्यवसायास भविष्यामध्ये मोठी संधी

२०२० वर्षामध्ये मिरची या पिकास प्रचंड प्रमाणात बाजार भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना या पिकामुळे पैसा प्राप्त झालेला आहे.

मिरची या पिकास सध्या मिळत असलेल्या बाजार भावाचा विचार केल्यास पुढील वर्षी मिरची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि आणि शेतकरी बांधवांकडून मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जेदार रोपांची मांगणी वाढू शकते.

अशा वेळी तुमच्याकडे रोप वाटिका असेल तर तुम्ही त्यांना चांगल्या दर्जाची मिरची रोपे देऊ शकता.रोपवाटिकेमध्ये केवळ रोपेच नाही तर इतरही उत्पादन घेता येवू शकते आणि कमी जागेत जास्त उत्पन्न मिळविता येवू शकते. mahadbt krushi yojana.

रोपवाटिका योजनेविषयी माहिती

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत रोपवाटिका या अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याअगोदर ह्या योजनेचा सारांश काय आहे?

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांचा उद्देश काय आहे? कोणकोणते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात? ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता काय असावी लागते?  या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हि सर्व माहिती pdf फाईलमध्ये उपलब्ध आहे.

रोपवाटिका योजनेविषयी माहिती असलेली pdf फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

रोपवाटिका-योजना-माहिती.pdf (1999 downloads )

रोपवाटिका ऑनलाईन अर्ज प्रक्रिया.

गुगलमध्ये टाईप करा maha dbt किंवा या वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login त्यानंतर या ठिकाणी mahadbt या वेबसाईटचा इन्टरफेस दिसेल.

या तुमच्याकडे युजर आयडी किंवा पासवर्ड असेल तर या ठिकाणी दोन प्रकारे लोगिन करता येवू शकते एक पद्धत आहे युजर आयडी आणि पासवर्ड वापरून व दुसरी पद्धत आहे आधार क्रमांकद्वारे.

परंतु जर तुमच्याकडे जर लोगिन आयडी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी या बटनावर क्लिक करून तुमची नोंदणी करू शकता व युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकता.

  • लोगिन करा
  • अर्ज करा या बटनावर क्लिक करा
  • फलोत्पादन या योज्नेसामोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा
  • फलोत्पादन योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये रोपवाटिका निवडून संपूर्ण माहिती भरा.
  • रोपवाटिका योजनेची पूर्ण माहिती भरल्यानंतर जतन करा या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
  • अर्ज सादर करा या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा
  • अर्ज सादर करा या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा
  • मेक पेमेंट या बटनावर क्लिक करा
  • पेमेंट यशस्वी प्रून झाल्यानंतर तुमच्या पेमेंटची पावती प्रिंट करा.
  • परत mahadbt dashboart वर या
  • स्क्रीन वर डाव्या बाजूला वरून खाली चौथ्या क्रमांकवर असलेल्या मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.
  • याठिकाणी पैसे भरल्याची पावती डाउनलोड करता येईल शिवाय तुमच्या अर्जाचे सद्यस्थिती बघता येईल.

वरील पद्धतीने तुम्ही रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करू शकता. रोपवाटिका योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या विषयी सविस्तर व्हिडीओ माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *