ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना विषयी माहिती
शेतकरी बंधुंनो नमस्कार, ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे हि नवीन योजना अचलपूर येथे सुरु करण्यात आलेली आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनच्या वतीने विविध अनुदान योजना सुरु असतात त्यातलीच एक योजना म्हणजेचे ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे हि शेतकरी योजना होय. याच योजने संदर्भात आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.
ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना संदर्भातील खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा.
शेतकरी बंधुंनो हि योजना कोणासाठी आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या पुढाकाराने ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे हि योजना राबविण्यात येत आहे. सध्या हि योजना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विभागातील परितक्त्या महिला तसेच विधवा व निराधार त्याचप्रमाणे आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी आहे.
बच्चू कडू साहेबांचे ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना संदर्भातील ट्वीट १
या योजनेचा उद्देश काय आहे.
जेंव्हा एका शेतकरी कुटुंबातील मुख्य कारभारी व्यक्ती दगावते त्यावेळी त्या वेळी त्या महिलांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी येते. अशावेळी शेतातील नांगरणी, वखरणी व इतर मशागतींच्या कामासाठी पैसा लागतो तर हा पैसा आणायचा कोठून असा प्रश्न या महिलांसमोर पडतो. याच गोष्टीचा विचार करून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी हि योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेचा अनेक शेतकऱ्यांना लाभ.
बच्चू कडू यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे या योजनेतून अचलपूर विभागातील १०० पेक्षा जास्त एकरची कामे करण्यात आलेली आहेत. या नाविण्यपूर्ण योजनेमुळे निराधार शेतकरी महिला व त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळत आहेत.
ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना संदर्भातील ट्वीट २
हि नाविन्यपूर्ण योजना बच्चू कडू यांच्या पुढाकाराने सुरु.
बच्चू कडू यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे हि खूपच नाविन्यपूर्ण योजना असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच धर्तीवर या योजनेची अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाना या योजनेचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. नियोजन बद्ध पद्धतीने कार्यवाही केल्यास हि योजना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर यशस्वी होऊ शकते.
शेतकरी योजनांच्या माहितीचा अभाव.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरु असतात. परंतु खूप कमी शेतकरी बांधवाना या योजनांचा लाभ मिळत असतो. अनेक शेतकरी बांधव केवळ माहिती नसल्यामुळे या शेतकरी सरकारी योजनांचा लाभ घेवू शकत नाहीत. शेतकरी अनुदान योजना किंवा महाराष्ट्र शासन कृषी योजना विषयी अधिक चांगल्या प्रकारे जागृती होणे गरजेचे आहे.
शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्र विषयी माहितीसाठी आमच्या युट्युब चॅनलला भेट द्या.
आमच्या डिजिटल डीजी या युट्युब चॅनलवर आम्ही महाराष्ट्र शासन कृषी योजना व इतर शेतकरी अनुदान योजना संदर्भातील माहितीचे व्हिडीओज अपलोड करत असतो. तुम्हाला जर महाराष्ट्र शासन कृषी योजना 2021 संदर्भात माहिती हवी असेल तर डिजिटल डीजी या युट्युब चॅनलला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देत राहा. https://digitaldg.in/
शासकीय अनुदानावर ट्रॅक्टर योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2020/07/22/tractor-subsidy-scheme-maharashtra-2020-pdf/
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://digitaldg.in/2020/09/28/maharashtra-solar-pump-yojana-online-application/