बियाणे योजना अंतर्गत मिळणार शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे.

बियाणे योजना अंतर्गत मिळणार शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे.

तुम्हालाही बियाणे योजना संदर्भात लॉटरी लागला असल्याचा संदेश आला असेल तर तुमचे अभिनंदन कारण तुम्हाला आता अनुदानावर बियाणे मिळणार आहे. बऱ्याच शेतकरी बांधवांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर विविध योजनांसाठी अर्ज भरले होते. यामध्ये प्रामुख्याने बियाणे अनुदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवानी ऑनलाईन अर्ज भरले होते. ज्या शेतकरी बांधवांनी महाडीबीटी शेतकरी पोर्टलवर बियाणे योजना अंतर्गत मका बियाणे, सोयाबीन बियाणे व इतर बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज भरले होते त्यांना आता संदेश येण्यास सुरुवात झालेली.

ज्या शेतकऱ्यांनी बियाणे योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरले होते त्यांना खलील प्रमाणे संदेश येत आहे.

कृषी योजनांच्या ऑनलाईन सोडतीत बियाणे या घटकांतंगर्त आपली निवड झाली आहे. मका व प्रमाणित बियाण्यांचे प्रमाणित वितरण बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहय्यकांशी संपर्क करा. असा संदेश अनेक शेतकऱ्यांना येत आहेत. तुम्हाला हि जर असा संदेश आला असेल तर तुमचे हार्दिक अभिनंदन कारण तुम्हाला आता शासकीय अनुदांवर बियाणे मिळणार आहे.

बियाणे योजना

बियाणे अनुदानाचा संदेश आला नसेल तर काय करावे.

तुम्हाला जर बियाणे अनुदानाचा संदेश आला नसेल तर काय करावे हे आता बघुयात. अनेक शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर बियाणे मिळणार आहे म्हटल्यावर इतर शेतकऱ्यांना आनंद होत असतांना तुम्हाला कदाचित थोडेफार नैराश्य येण्याची शक्यता असू शकते मात्र काळजी करण्याचे काही कारण नाही तुम्ही अर्ज भरला असेल तर ऑनलाईन चेक करून घ्या. तुमचे नाव बियाणे अनुदान यादीमध्ये आहे किंवा नाही हे कसे चेक करावे या संदर्भात जाणून घेवूयात.

असे तपासा तुमचे बियाणे योजना अनुदानातील नाव.

शेतकरी बंधुंनो तुम्हाला जर शासकीय अनुदानावर बियाणे मिळणार असल्याचा संदेश आला नसेल तर तुम्ही स्वत: तुमचे नाव चेक करू शकता. एक बाब याठिकाणी लक्षात घ्या कि यासाठी तुम्ही अगोदर महाडीबीटी पोर्टलवर बियाणे योजना अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा. तुम्हाला जर माहित नसेल कि बियाणे योजना अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो हे समजून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.

कोठे चेक करणार बियाणे योजना मधील तुमचे नाव.

बियाणे योजना अनुदानासाठी नाव चेक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करायचे आहे

  • mahadbt farmer login
  • महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन होईल
  • या ठिकाणी दिसत असलेल्या युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा
  • स्क्रीनवर डाव्या बाजूला दिसत असलेल्या मी अर्ज केलेल्या बाबी बटनावर क्लिक करा.
  • तुम्ही ज्या बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे त्या बाबी समोरील स्थिती या रकान्यामध्ये winner upload documents for under scrutiny असे लिहिलेले असेल तर समजून जावे कि या योजनेसाठी आपली निवड झालेली आहे.
  • महाडीबीटी शेतकरी अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

बियाणे योजना मध्ये नाव नसेल तर काय करावे.

मित्रांनो शक्यता अशीही असू शकते कि तुम्हाला बियाणे अनुदान योजना अंतर्गत तुमची निवड झाल्याचा संदेश येवून देखील जेंव्हा तुम्ही महा डीबीटी या शेतकरी पोर्टलवर चेक कराल त्यावेळी कदाचित स्थिती या रकान्यामध्ये  winner upload documents for under scrutiny असा संदेश दिसणारहि नाही. अशा वेळी तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी सहाय्यक साहेबांना या संदर्भात विचारणा करा. तुमच्या मोबाईलवर आलेला संदेश जपून ठेवा आणि गरज पडल्यास संबधित अधिकारी साहेबांना दाखवा.

खालील शेतकरी योजनांचा पण लाभ घ्या.

विविध शासकीय योजनांसाठी आमच्याशी कनेक्ट व्हा.

शेतकरी योजना, महाडीबीटी योजना त्याचप्रमाणे ऑनलाईन योजनेचे अर्ज कसे भरावेत तसेच विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव pdf मध्ये डाउनलोड कसे करावेत हे जाणून घेण्यासाठी आमच्या डिजिटलडीजी डॉट इन ( https://digitaldg.in/ ) या वेबसाईटला भेट देत राहा. विविध माहितीचे व्हिडीओज बघण्यासाठी Digital DG Youtube Channel ला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या फेसबुक ग्रुपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *