समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ ह्या योजनांचा लाभ मिळणार.

समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ ह्या योजनांचा लाभ मिळणार.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ या वर्षासाठी नियोजनाचे आदेश देण्यात आलेले आहेत. समृद्धी बजेट २०२२-२३ द्वारे शेतकऱ्यांना लखपती करण्याचा शासनाचा उद्देश आहे. gotha bandhkam anudan digital dg.

वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांकडून यासाठी अर्ज भरून घेण्यात येत आहे. तुम्ही जर समृद्धी बजेट २०२२-२३ साठी अर्ज सादर केला नसेल तर तो अर्ज लगेच डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या गावातील संबधित अधिकारी यांच्याकडे सादर करा. समृद्धी बजेट २०२२-२३ चा अर्ज डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. ( खालील व्हिडीओ पहा )

समृद्धी लेबर बजेट २०२२ – २३ अंतर्गत शेतकऱ्यांना लखपती होण्या करिता आवश्यक कामे

कामाचे नावअंदाजित रक्कमयंत्रणा
वैयक्तीक सिंचन विहीर३,२७,०००.००ग्राम पंचायत
शेततळे६३,७४४.००ग्रा.प./कृषी
जनावरांचा गोठा७७,१८८.००ग्राम पंचायत
शेळी पालन शेड४९,२८४.००ग्राम पंचायत
कुक्कुटपालन शेड४९,७६०.००ग्राम पंचायत
वैयक्तिक सौचालय१२,०००.००ग्राम पंचायत
शोषखड्डा२५६६.००ग्राम पंचायत
रेशीम लागवड२,८२,०००.००रेशीम विभाग
वैयक्तिक वृक्ष लागवड१२,००,०००.००ग्राम पंचायत
फळबाग लागवडफळांच्या प्रकारानुसारग्रा.प./कृषी
ढाळीचे बांध१०,०००.००ग्रा.प./कृषी
घरकुल२२,३०२.००ग्राम पंचायत
विहीर पुनर्भरण१२,०००.००ग्राम पंचायत

शेतकऱ्यांना लखपती होण्या करिता आवश्यक कामांची यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक किंवा टच करा. gotha bandhkam digital dg

समृद्धी लेबर बजेट २०२२ – २३ शासन परिपत्रक

समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ संदर्भातील एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहे या परिपत्रकाची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे. त्यावर क्लिक किंवा टच करून तुम्ही ते बघू शकता. महाराष्ट्र राज्यातील रोजगार हमी विभागाने ” मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृध्द’ हे धोरण अंगिकारले आहे. या योजनेतून गरीब जनतेला व तसेच शेतकरी व शेतमजूर कुटुंबाला लखपती बनविणे हा शासनाचा उद्देश आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेमुळे शेतकरी होणार लखपती.

ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबियांना दारिद्र्यरेषेच्यावर आणणे आणि त्यांचे जीवनमान उंचाविणे या उद्देशाने  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना लखपती बनविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शरद पवार ग्राम समृद्धी समृद्धी योजनेंतर्गत खालील योजनांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे समृद्धी लेबर बजेट २०२२ – २३ साठी अर्ज सादर करणे महत्वाचे ठरणार आहे.

गाई गोठा प्रस्ताव मोफत डाउनलोड करा.

समृद्धी लेबर बजेट २०२२-२३

गाई गोठा अंदाजपत्रक (Estimate ) मोफत डाउनलोड करा.

समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ संदर्भातील अर्ज डाउनलोड करा.

तुम्हाला जर शासनाच्या लखपती योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ संदर्भातील अर्ज  तुमच्या गावातील रोजगार सेवक किंवा इतर संबधित व्यक्ती किंवा अधिकारी यांच्याकडे तुम्ही तो अर्ज सादर करू शकता. अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा. विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या. येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *