ई पीक पाहणी मुदतवाढ हि असेल शेवटची तारीख शासनाचे पत्र बघा.

ई पीक पाहणी मुदतवाढ हि असेल शेवटची तारीख शासनाचे पत्र बघा.

शेतकरी बांधवांसाठी खुशखर आहे कि आता ई पीक पाहणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पासून ई पीक पाहणी अभियान राबविण्यात येत आहे. e pik pahani मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतकऱ्याने आपापल्या पिकांची माहिती आणि छायाचित्रे अपलोड करण्यचे आवाहन करण्यात आलेले आहे.

जाणून घ्या ई पीक पाहणी मुदतवाढ दिलेली तारीख

e pik pahani मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतातील पिकांची माहिती अपलोड करण्यासाठी शेवटची तारीख म्हणजेच e pik pahani last date हि ३० सप्टेबर २०२१ देण्यात आलेली होती परंतु ई पीक पाहणी ॲप्लिकेशनची माहिती समजून घेण्यास शेतकरी बांधवाना अनेक अडचणी येत होत्या. याच बाबीचा विचार करून हेमोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पिकांची नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा.

ई पीक पाहणी मुदतवाढ शासनाचे पत्र बघा.

शेतकरी बंधुंनो ई पीक पाहणी मुदतवाढ संदर्भातील शासनाचे पत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले आहे. हे पत्र तुम्हाला वाचायचे असल्यास किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचे असल्यास खालील पत्र डाउनलोड करा या बटनावर क्लिक करा आणि हे पत्र सविस्तर वाचून घ्या. १५ ऑक्टोबर २०२१ हि नवीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

ई पीक पाहणी मुदतवाढ

ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून पिकांची नोंद करून घ्या.

ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पिकांची नोंद करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. बऱ्याच शेतकरी बांधवांकडे एंड्राइड प्रणालीवर चालणारे मोबाईल फोन्स नाहीत त्यामुळे त्यांना या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे पिकांची नोंद करण्यास अडचणी येत आहे. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेवून आता १५ ऑक्टोबर २०२१ हि नवीन तारीख देण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवानी या तारखेच्या आत आपापल्या पिकांची नोंद करून घ्यावी.

शेतकऱ्यांसाठी e peek pahani मोबाईल ॲप्लिकेशन ठरणार वरदान.

बऱ्याच शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन एक डोकेदुखी वाटत आहे. सध्या ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन जरी अडचणीचे ठरत असले तरी भविष्यात या ॲप्लिकेशनचा खूप मोठ्या प्रमाणत शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे. त्यामुळे ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा तिरस्कार न करता हे मोबाईल ॲप्लिकेशन कसे वापरावे या संदर्भातील माहिती जाणून घ्या.

शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करा.

शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. आज शेतकऱ्यांना नमुना नंबर बारावर स्वतः पिके नोंदणी करण्याचा अधिकार शासनाने दिला आहे कदाचित भविष्यामध्ये सात देखील शेतकऱ्यांच्या हातामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकरी बंधुंनो अशाचप्रकारची विविध माहिती तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आमच्या teligram group मध्ये सहभागी व्हा किंवा तुम्ही आमच्या whatsapp ग्रुपमध्ये देखील सहभागी होऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *