१० हजार कोटींची घोषणा पण कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार.

१० हजार कोटींची घोषणा पण कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार.

शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा. सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतातील  पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी १०, ००० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मित्रांनो हि शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. खालील व्हिडीओ पहा.

अतिवृष्टी निधी आला जाणून घ्या किती निधी आला.

१० हजार कोटींची घोषणा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार

महाराष्ट्र राज्यामध्ये माहे जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी तसेच पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले.  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य जाहीर करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. मित्रांनो शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे अतिवृष्टी व गारपिटीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यामुळे शेतकरी बांधव खूप मोठ्या नैराश्यामध्ये आले होते त्यामुळे १० हजार कोटींची घोषणा हि शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

विविध शासकीय योजनांच्या मोफत माहितीसाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा.

कधी मिळणार हा १० हजार कोटींची निधी

साधारणत: दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीपर्यंत हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीची काही प्रमाणात का होईना भरपाई मिळणार असल्याने शेतकरी बांधवानी दिवाळी किंवा दसरा गोड होणार आहे हे नक्की. शेतकरी म्हटला कि संकटाचा डोंगर असे समीकरण सध्या पहावयास मिळत आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पार मोडून गेलेले आहे त्यामुळे एन दिवाळीमध्ये अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे.

खरीप पिक विमा निधी आला. जाणून घ्या किती मिळणार पैसे

१० हजार कोटींची घोषणा पण किती मिळणार निधी

आजच्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये जरी  १० हजार कोटींचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे परंतु कोणत्या पिकांची किती निधी मिळणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खालीलप्रमाणे हा निधी वितरीत केला जाणार आहे.

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर,
  • बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर,
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर.
  • ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल.

विविध योजनांची माहिती मिळवा अगदी मोफत

तर शेतकरी बंधुंनो अशा प्रकारे हि एक मोठी अपडेट होती जी तुम्हाला कळावी या उद्देशाने आमच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. शेतकरी बंधुंनो शेती संबधित विविध शासकीय योजना व इतर महत्वाच्या माहितीसाठी आमचे डिजिटल डीजी ह्या युट्युब चॅनलला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.

१० हजार कोटींची घोषणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *