बियाणे अनुदान योजना 2021 रब्बी हंगाम परमिट वाटणे सुरु झाले.

बियाणे अनुदान योजना 2021 रब्बी हंगाम परमिट वाटणे सुरु झाले.

शेतकरी बंधुंनो बियाणे अनुदान योजना 2021 संदर्भात जाणून घेवूयात. खरीप पिके सोंगणीच्या तयारीमध्ये शेतकरी बांधव लागलेले आहेत. खरीपाच्या पिकांची सोंगनी झाल्यानंतर अर्थातच शेतकरी बांधव रब्बी पिकांच्या तयारीला लागणार आहेत. शेतकरी बंधुंनो तुम्हाला माहितच आहे कि सध्या बियाण्यांच्या किमतीमध्ये खूप वाढ झालेली आहे आणि अशामध्ये जर शासकीय अनुदानावर बियाणे मिळाले तर नक्कीच शेतकरी बांधवाना याचा फायदा होईल. ( बियाणे परमिट संदर्भातील व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

लगेच बियाणे अनुदान योजनेचा ऑफलाईन अर्ज डाउनलोड करा.

बियाणे अनुदान योजना 2021 ची परमिटची प्रोसेस जाणून घ्या.

शेतकरी बांधवांना शेती संबधित विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाच्या वतीने महाडीबिटी पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. याच पोर्टलवर अनेक शेतकऱ्यांनी अनुदानावर बियाणे योजनेसाठी अर्ज केले होते. तुम्ही जर हरभरा पिकांसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल आणि तुमची हरभरा बियाणेसाठी निवड झालेली असेल तर या संदर्भातील पुढील प्रक्रिया कशी असते या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

शासकीय योजनांची मोफत माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या Whatsapp Group मध्ये सहभागी व्हा.

बियाणे अनुदान योजना 2021 साठी परमिट कसे असते ते जाणून घ्या.

मित्रांनो एकदा का तुमची हरभरा किंवा इतर कोणत्याही पिकांच्या बियाण्यांसाठी निवड झाली कि मग तुम्हाला तुमच्या तालुक्यातील कृषी विभागाकडून बियाणे खरेदीचे परमिट दिले जाते. हे परमिट कसे असते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील परमिट डाउनलोड करा या बटनावर क्लिक करून तुम्ही हे परमिट तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करू शकता.

बियाणे अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना संदेश.

महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केले जातात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर जर शेतकऱ्यांची बियाणे अनुदानासाठी निवड झाली तर त्यांना त्यांच्या मोबाईलवर एक संदेश येते कि तुमची सदरील बियाण्यासाठी निवड झालेली आहे. एकदा का संदेश आला कि शेतकऱ्याने त्यांच्या तालुक्यातील कृषी सहय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधावा.

आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक

वाटप केंद्रातून घ्यावे लागते शासकीय अनुदानावरील बियाणे.

बियाणे अनुदानासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करतांना जेवढ्या क्षेत्रासाठी हा अर्ज केला असेल त्या क्षेत्रासाठी कृषी विभागाकडून बियाणे उपलब्ध करून दिले जाते. तुमच्या गावाच्या जवळ किंवा तालुक्याच्या ठिकाणी एक बियाणे वाटप केंद्र निर्धारित केले जाते आणि या ठिकाणहून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले जाते.

बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करा.

अनुदानाची रक्कम वजा करून दिले जाते बियाणे.

कृषी अधिकारी तुम्हाला अनुदानावर बियाणे खरेदी करण्यासठी परमिट देतात. हे परमिट घेवून शेतकरी बांधवांनी ठरवून दिलेल्या दुकानावर जायचे आहे. दुकानदाराला हे परमिट दाखविल्यानंतर त्यावर दिलेली अनुदानाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकरी बांधवाना भरावी लागते. अशा प्रकारे तुम्ही शासनाच्या बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता.

फेसबुक ग्रुपची लिंक

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी विविध योजना.

महा डीबीटी वेबसाईटवर शेतकरी बांधवांसाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. तुम्ही जर शेतकरी असाल आणि शासनाच्या शेती संबधित विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छित असाल तर लगेच तुमची नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करून द्या. महाडीबीटी वेब पोर्टलवरील विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, त्यासाठी नोंदणी कशी करावी, ऑनलाईन अर्ज कसा करावा हि आणि इतर माहितीसाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या.

फेसबुक पेज

या लेखाचा सारांश

  • अनुदानावर बियाणे वाटप सुरु.
  • बियाण्याचे परमिट कसे असते ते जाणून घेतले.
  • बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा.
  • महाडीबीटी योजना.
बियाणे अनुदान योजना 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *