मातोश्री शेत रस्ते योजना शेतात जाण्यासाठी रस्ते मिळणार जी आर आला

मातोश्री शेत रस्ते योजना शेतात जाण्यासाठी रस्ते मिळणार जी आर आला

नुकताच मातोश्री शेत रस्ते योजना ज्याला आपण मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे म्हणतो तर या योजनेचा शासन निर्णय म्हणजेच जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी या योजनेंतर्गत रस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. रस्ता निर्माण करण्यासंदर्भातील या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जी आर बघण्याची लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेली आहे. या योजनेसंदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे टच करा.


मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना संदर्भातील मंत्रीमंडळ निर्णय बघा.


मातोश्री शेत रस्ते योजना ठरणार शेतकऱ्यांना वरदान.

शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता हवा असतो. त्यामुळे शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेत रस्ता किंवा पाणंद रस्ता असणे खूपच आवश्यक असते. शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते निर्माण केले तरी देखील जास्त पावसामुळे हे रस्ते वाहून जातात परिणामी केलेल्या रस्त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. याच बाबीचे महत्व अधोरेखित करून शासनाच्या वतीने पालकमंत्री शेत/पाणंद योजना राबविण्यात येत होती त्याच योजनेचे नाव बदलून आता मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना असे ठेवण्यात आले आहे.


शेत रस्ता मागणीसाठी असा करा अर्ज. अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा.


मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत रस्त्यांची वर्गवारी खालीलप्रमाणे

 • एका गावावरून दुसऱ्या गावी जाणारे रस्ते.
 • शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडी मार्ग.
 • इतर ग्रामीण रस्ते.

घरकुल योजना यादी आली बघा तुमच्या मोबाईलवर.


मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे कामे करता येतील.

अस्तित्वातील शेत किंवा पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करणे.

बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते अस्तित्वात आहेत परंतु त्या रस्त्यांची अवस्था अगदी बिकट झलेली आहे. तर अशा रस्त्यांचे मजबुतीकरण मातोश्री शेत रस्ता योजना मधून केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता मिळू शकतो आणि शेतातील माल बाजारात आणण्यासाठी जी समस्या येत आहे ती सुटू शकते.


पिक विमा यादी आली जाणून घ्या तुमचे नाव यादीमध्ये आहे कि नाही.


शेत रस्ता किंवा पाणंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा व पक्का रस्ता एकत्रित करणे.

शेतामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी अतिक्रमण केलेले असते. अशा घटनेमध्ये बऱ्याच ठिकाणी वर्षानुवर्षे वाद चालत आलेले आहेत परंतु आता शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच रस्ता असेल आणि या रस्त्यावर किंवा पाणंद रस्त्यावर कोणी अतिक्रमण केले असेल तर हे अतिक्रमण हटवून पक्का रस्ता निर्माण करण्यात येणार आहे.

आमच्या टेलिग्राम ग्रुप ची लिंक

शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग

शेतकरी बंधुनो शेतामध्ये जाण्यासाठी पायमार्ग व गाडीमार्ग रस्ते नकाशावर दर्शविलेले नसतात. जर कधी शेतात जाण्यासाठी गाडीमार्ग किंवा पाय किंवा पाऊल मार्ग देखील आपण त्याला म्हणू शकतो तर अशा रस्त्याचा वाद निर्माण झाला तर या रस्त्यांबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम १४३ नुसार तहसीलदार यांना देण्यात आलेले आहेत. तर अशा रस्त्यांचे काम देखील मातोश्री शेत रस्ते योजना मधून केले जाणार आहे.

विविध शासकीय योजनांची तुमच्या मोबाईलवर मोफत माहिती हवी आहे का? तर मग लगेच आमच्या whatsapp group मध्ये सामील व्हा.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे शेत रस्ते तयार करण्यात येणार.

रोजगार हमी योजनेतून हे सर्व कामे केली जाणार आहेत. या योजनेची अमलबजावणी करत असताना अकुशल कुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० ठेवण्यासाठी राज्य रोजगार हमी योजनेतून कुशल निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेत रस्ता आहे किंवा पाणंद रस्ता आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानकाप्रमाणे रस्ते तयार करण्यात यावेत असा स्पष्ठ उल्लेख या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे.

असा केला जाणार रस्ता मातोश्री शेत रस्ता.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा ज्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे ती कशी असणार आहे या संबधी शासन निर्णयामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे यापैकी काही ठळक बाबी आपण बघुयात.

 • शेत रस्ता किंवा पाणंद रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला चर खोदले जाणार आहेत.
 • खोदलेल्या चारातील माती व मुरूम शेत रस्ता किंवा पाणंद रस्त्यावर टाकण्यात येईल.
 • चारातील खोडलेली माती आणि मुरुमावर दबाई म्हणजेच रोलर फिरविण्यात येईल.
 • रस्ता निर्माण करत असताना त्या ठिकाणी जर काळी माती लागली असेल तर त्यावर कमीत कमी ३०० एम एम जाडीचा कठीण मुरूम टाकावा लागेल आणि त्यावर पाणी शिंपडून रोलर फिरविला जाईल.
 • पक्का रस्ता करण्यासाठी खडी देखील वापरण्यात येणार आहे. खादीचा आकार ५५ एम एम असावा आणि जाडी एकूण २२५ एमएम असावी.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत रस्ता बांधकामाच्या या काही ठळक बाबी आहेत. या व्यतिरिक्त अजून बऱ्याच बाबी शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही सविस्तर वाचून घ्या.

आमच्या फेसबुक ग्रुपची लिंक

मातोश्री शेत रस्ते योजना नमुना अंदाजपत्रक बघा.

मातोश्री शेत रस्ते योजना

मातोश्री शेत रस्ते योजना अंतर्गत केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या अंदाजपत्रकाचा नमुना दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकाशित केलेल्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे. तो खालीलप्रमाणे.

अ.क्र.तपशीलरक्कम
अकुशल – मनरेगा९,०२,८७९.००
कुशल – मनरेगा६,०१,९७९.००
राज्य रोजगार हमी योजना -कुशल८,८०,०५८.००
एकूण२३,८४,८५६.००

११ नोव्हेंबर २०२१ रोजीचे एक किलोमीटर मुरुमाच्या पक्क्या रस्त्याचे अंदाजपत्रक

अ.क्र.तपशीलरक्कम
अकुशल – मनरेगा७,५८,६८३.००
कुशल – मनरेगा२,१७,७३७.००
एकूण९,७६,४२०.००

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेची कामे खालील यंत्रणे मार्फत केली जातील.

मातोश्री शेत रस्ते योजना जरी राबविली जाणार आहे तरी तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल कि या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमक्या कोणत्या विभागाला संपर्क साधावा किंवा कोणता विभाग या योजनेची अमलबजावणी करेल. तर खालीलप्रमाणे विभागाप्रमाणे या योजनेची अमलबजावणी केली जाईल.

 • ग्रामपंचायत.
 • जिल्हा परिषद बांधकाम विभाग / उपविभाग.
 • सार्वजनिक बांधकाम विभाग / उपविभाग.
 • वनविभाग.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आणि ग्रामपंचातची जबाबदारी.

 • शेतकऱ्याने जर मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत शेतात जाण्यासाठी रस्त्याची मागणी केली तर अशा शेत किंवा पाणंद रस्त्याचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी हि ग्रामपंचायतवर असणार आहे.
 • ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेवून शेतकऱ्यांना समजावून सांगणे व संबधित रस्त्याचे अतिक्रमण दूर करणे.
 • जर गाव पातळीवर प्रकरण मिटत नसेल तर अशी प्रकरणे तालुका स्तरीय समितीकडे सादर करावीत आणि त्या समितीच्या निर्देशानुसार पोलीस यंत्रणेची मदत घ्यावी.

योजनेच्या सविस्तर माहितीसाठी जी आर बघा.

मित्रांनो अशा प्रकारे हा शासन निर्णय दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी काढण्यात आलेला आहे. या शासननिर्णयामध्ये अगदी सविस्तर माहिती सांगितलेली आहे त्यापैकी ज्या ठळक बाबी होत्या त्या तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला जर संपूर्ण जी आर बघायचा असल्यास खालील जी आर डाउनलोड करा या बटनावर टच करून हा जी आर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *