सौर कृषी पंपाचा मार्ग मोकळा आता शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप

सौर कृषी पंपाचा मार्ग मोकळा आता शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सौर कृषी पंपाचा मार्ग मोकळा आता मिळणार सौर कृषी पंप. कुसुम योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी महाउर्जा वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केलेले होते.

परंतु अनेक शेतकऱ्यांना त्यांचे कृषी पंप अजूनही मिळालेले नाहीत. परंतु शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण सौर कृषी पंपाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि याच संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

सौर कृषी पंप अस्थापना संदर्भातील शासन निर्णय नुकताच शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेला आहे. या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय तुमच्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर बघू शकता. या योजनेसंदर्भातील व्हिडीओ पहा.

हा लेख पण वाचा जाणून घ्या कोणता सौर कृषी पंप किती किमतीला मिळतो.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कुसुम योजना अंतर्गत solar pump maharashtra या अभियानाच्या घटक ब अंतर्गत एकूण १ लाख पारेषण विरहीत सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले असून त्याची अमलबजावणी महाउर्जाद्वारे करण्यात येत आहे.

सौर कृषी पंपाचा मार्ग मोकळा २७५० सौर कृषी पंप आस्थापित केले जाणार

ज्या शेतकरी बांधवानी सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज केले होते ते पंप कधी मिळणार याकडे वाट बघून होते. एकूण ३८०० सौर पंप आस्थापित करण्यास मान्यता देण्यात आली होती परंतु सौर कृषी पंपाचा पुरवठा करणाऱ्या एकूण ९ पुरवठादारांपैकी २ पुरवठादरांनी स्वीकृती न दिल्याने केवळ सात सौर कृषी पंप पुरवठादारांकडून एकूण २७५० सौर कृषी पंप आस्थापित केले जाणार आहेत.

पुढील लेख पण वाचा तुषार सिंचन सबसिडी खात्यावर जमा होण्यास सुरुवात.

सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकरिता शासन निर्णयाप्रमाणे २७५० नग सौर कृषी पंपासाठी २५० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे.

दिनांक २० जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार कुसुम अभियानच्या घटक ब अंतर्गत एकूण मंजूर १००००० सौर कृषी पंपापैकी ४.५८ कोटी महाऊर्जास वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

सौर कृषी पंपाचा मार्ग

तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीअपरात्री शेतामध्ये जावे लागते.

हि दुविधा टाळण्यासाठी अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील विहिरीवर सौर पंप बसविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केले होते.

आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक.

तुम्हाला देखील तुमच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवायचा असेल तर त्यासाठी महाउर्जा वेबसाईटवर जावून ऑनलाईन अर्ज करून द्या.

या संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकला टच करा किंवा क्लिक करा.

विविध शासकीय योजनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. आमच्या whatsapp group मध्ये देखील तुम्ही सामील होऊ शकता आणि विविध योजनांची मोफत माहिती मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *