महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. गाव असो किंवा शहर आजच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.
ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये अनेक युवक सध्या काम शोधतांना दिसत आहेत. यामध्ये काही तरुण बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत आहेत. व्हिडीओ पहा.
कोणताही नागरिक असोत ते जर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असेल तर त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो. फक्त या योजनांची माहिती त्यांना हवी.
हा लेख पण वाचा बांधकाम कामगार ऑनलाईन अर्ज
तुम्ही जर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ या ठिकाणी तुमची नोंदणी करू शकता आणि विविध योजनाचा लाभ घेऊ शकता.
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अर्ज pdf मध्ये उपलब्ध.
महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना नोंदणी कशी करावी त्याची पद्धत कशी असते, अर्ज कोठे उपलब्ध असतो, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो हि आणि इतर महत्वाची माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
या लेखाच्या सर्वात शेवटी महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अर्जाचा नमुना pdf format मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या अर्जाच्या नमुन्या प्रमाणे हा अर्ज तुम्ही भरून तुम्हाला सादर करायचा आहे.
पुढील लेख पण वाचा अशी करा डाउनलोड बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी विविध कागदपत्रे
एकदा का तुमची महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी झाली तर तुम्हाला या मंडळाच्या वतीने विविध योजनांचा लाभ दिला जातो.
या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कामगार उपयुक्त कार्यालयामध्ये खालील अर्ज व्यवस्थित माहिती भरून सादर करायचा आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी हे कार्यालय असेल तर हा अर्ज तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी देखील सादर करू शकता.
अर्जासोबत सादर करायचे कागदपत्रे.
खाली दिलेल्या pdf अर्ज डाउनलोड करून घ्या. हा अर्ज अगोदर सविस्तर वाचून घ्या आणि समजून घ्या. अर्जामध्ये पूर्ण माहिती भरल्यानंतर या अर्जासोबत खालील कागदपत्रे तुम्हाला जोडायची आहेत.
- तुमच्या घरातील सर्व सदस्यांचे आधार कार्डची छायांकित प्रत.
- राशन कार्डची छायांकित प्रत.
- बँक पासबुक झेरॉक्स.
- दोन पासपोर्ट साईज फोटो.
वरील कागदपत्रे या योजनेसाठी सादर केल्या जाणाऱ्या अर्जासोबत सादर करायचा आहे. कामगार योजना pdf अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी अर्ज नमुना pdf मध्ये डाउनलोड करा या बटनावर क्लिक करा.