अतिवृष्टी नुकसान वाढीव निधी लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा. शेती पिकाच्या झालेल्या नुकसानभरपाई पोटी वाढीव रेटने एकशे पंचवीस कोटी सात लाख एक हजार एवढा निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
हा लेख पण वाचा बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पेट्या मिळण्यास सुरुवात
अतिवृष्टी नुकसान वाढीव निधी संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. विविध शासकीय योजनांची मोफत माहिती तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा. तुमचा जिल्हा निवडून तुमचा दहा अंकी WhatsApp नंबर टाका जेणे करून विविध शासकीय योजनांची माहिती नियमित तुमच्या मोबाईलवर आम्ही पाठवत जावू.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा अतिवृष्टी नुकसान वाढीव निधी जमा होणार आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा शासन निर्णय शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावून बघून घ्या.
हा शासन निर्णय बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे याचे संपूर्ण तपशील वरील जीआर सोबत दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यासाठी नेमका किती निधी मिळणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अगदी सोपे होणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना हि मदत दिली जाणार आहे त्या शेतकऱ्यांचे सर्व तपशील संबधित जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्द केले जाणार आहेत. त्यामुळे त्या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही या संदर्भातील माहिती जाणून घेऊ शकता कि कोणत्या शेतकऱ्यास पिक नुकसान भरपाईपोटी किती निधी मिळालेला आहे.
अतिवृष्टी नुकसान वाढीव निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
अतिवृष्टी नुकसान वाढीव निधीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे हि शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.
नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पिक विमा देखील काढत असतात परंतु जेंव्हा शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होते त्यावेळी काही शेतकरी बांधवाना याचा क्लेम करता येणे शक्य होत नाही परिणामी अशा शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानभरपाई पोटी पैसे मिळत नाहीत.
मागच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही अनेक शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत.
अशावेळी शासनाच्या वतीने मिळणारी हि नुकसानभरपाई शेतकऱ्यांसाठी नक्कीच मदतीची ठरणार आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठी लवकरच यादी बँकेत किंवा बँकेसमोर लागू शकते.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतलेले आहे कि किती निधी आलेला आहे आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे.