शेतकऱ्यांना आता पाणंद शेत रस्ता निर्मितीसाठी शासनाकडून जेसीबी मिळणार आहे आणि याच संदर्भात आपण आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. शेतात जाण्यासाठी जर रस्ता नसेल तर तुमच्याकडे कितीही सुपीक जमीन असली तरी त्याचा शेतकऱ्याला काही उपयोग होऊ शकत नाही.
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता निर्माण करायचा असेल किंवा आहे तो रस्ता दुरुस्त करायचा असेल. अशावेळी महाराजस्व अभियानांतर्गत शेतकऱ्यांना रस्ता निर्मितीसाठी जेसीबी उपलब्ध करून दिला जातो.
जेसीबी आमचा डीझेल तुमचे या योजनेप्रमाणे हि योजना राबविली जाणार आहे.
हा लेख पण वाचा मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना
काही दिवसापूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू साहेबांच्या पुढाकाराने अमरावती जिल्हातील अचलपूर येथे ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे हि योजना राबविण्यात आली होती. याच पद्धतीने काहीशा या योजनेकडे तुम्ही बघू शकता.
महाराजस्व अभियानांतर्गत शेतकऱ्यांना जेसीबी उपलब्ध करून दिला जातो यामध्ये शेतकऱ्यांनी डीझेल टाकून काम करून घ्यायचे असते.
हि योजना पण पहा ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे
पाणंद शेत रस्ता निर्मितीसाठी कशी काम करते महाराजस्व योजना जाणून घ्या.
महाराजस्व अभियानांतर्गत शेतात जाण्यासाठी रस्ता निर्मितीसाठी तहसील कार्यालयाकडून जेसीबी दिला जातो. ज्या ठिकाणहून हा रस्ता जाणार आहे त्या रस्त्या लगतच्या शेतकऱ्यांचे ना हरकत प्रमाणपत्र यासाठी लागते.
एकदा का हे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले कि मग पुढील कार्यवाही अगदी सोपी होते. या योजनेची कार्यवाही खालीलप्रमाणे केली जाते.
योजनेची कार्यवाही खालील प्रमाणे असते.
- ज्या शेतात शेत रस्ता हवा असेल त्या संबधित शेतकऱ्यांनी तलाठी किंवा तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.
- अर्ज सादर केल्यानंतर तलाठी रस्त्या संदर्भातील अहवाल तहसील कार्यालयाकडे जमा करतात.
- सर्व बाबींची शहानिशा केल्यानंतर मग शेत पाणंद रस्त्यासाठी तहसील कार्यालयाकडून जेसीबी उपलब्ध करून दिला जातो.
वरील प्रमाणे या या योजनेची कार्यवाही केली जाते.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा जी आर बघा.
शेतात पाणंद रस्ते निर्माण करण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा जी आर देखील आलेला आहे आणि हि योजना बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित होण्यास देखील सुरुवात झालेली आहे.
मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेचा आणखी एक जी आर आलेला आहे ज्यामध्ये मंजूर यादी सुद्धा दिलेली आहे. या योजनेमध्ये तुमच्या गावाचे नाव आहे किंवा नाही हे तुम्ही तपासून बघू शकता.
या जी आर सोबतच हि यादी तुम्ही बघू शकता. अधिक माहितीसाठी खालील बटनाला क्लिक करा.
तुम्हाला देखील या महाराजस्व योजनेचा लाभ घेवून शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता बनवायचा असेल तर तुमच्या गावातील तलाठी किंवा तहसील कार्यालयास भेट द्या.