कृषी यांत्रिकीकरण उप अभियान खुल्या प्रवर्गासाठी ५५.८० कोटी निधी

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान खुल्या प्रवर्गासाठी ५५.८० कोटी निधी

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५५.८० कोटी निधी वितरीत करण्याबाबतचा जी आर म्हणजेच शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर दिनांक १५ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांना शेती उपयोगी कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत अनुदान दिले जाते. यासाठी महाडीबीटी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला जातो.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

हा लेख पण वाचा कडबाकुट्टी मशीनसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

कोणत्याही योजनेचा लाभ द्यायचा असेल तर त्यासाठी जातप्रवर्ग ठरविला जातो. या जात प्रवर्गानुसार ज्या त्या जातीतील लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. यासाठी शासनाकडून ठराविक निधीची तरतूद केली जाते.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत ५५.८० कोटी निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्द करण्यात आलेला आहे.

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत विविध योजनांसाठी करता येतो ऑनलाईन अर्ज

सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी जो ५५.८० लक्ष निधी वितरीत करण्यात येणार आहे त्यामध्ये ३३४८.१६ लक्ष केंद्राचा हिस्सा असून २२३२.१० लक्ष राज्याचा हिस्सा आहे.

हा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावून हा जी आर वाचू शकता किंवा खालील बटनावर क्लिक करा.

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान

कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत सगळ्यात लोकप्रिय योजना म्हणजे ट्रॅक्टर योजना होय. बऱ्याच शेतकरी बांधवाना ट्रॅक्टर घेण्याची इच्छा असते परंतु कमी निधीमुळे ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शासकीय अनुदानावर ट्रॅक्टर घेवून तुम्ही तुमच्या शेती व्यवसायामध्ये प्रगती करू शकता.

या अभियान अंतर्गत केवळ ट्रॅक्टरच नव्हे तर रोटाव्हेटर, कल्टीवेटर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र व इतर यांत्रिक अवजारे शासकीय अनुदानावर घेऊ शकता.

असा करा ऑनलाईन अर्ज

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कारवा लागणार आहे. हि ऑनलाईन अर्ज प्रोसेस तुम्हाला महित नसेल तर खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही या संदर्भात अगदी तपशीलवारपणे माहिती घेऊ शकता.

वरील योजनांसाठी अर्ज करायचा असेल तर mahadbt वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागते. हि नोंदणी कशी करावी हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्या संदर्भातील संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

खुल्या प्रवर्गासाठी हा निधी वितरीत करण्याच्या शासननिर्णयामुळे पुढील कामास गती मिळेल आणि खुल्या प्रवर्गातील ज्या शेतकरी बांधवानी या योजने अंतर्गत ट्रॅक्टर सोबत इतर यांत्रिक अवजारासाठी ऑनलाईन अर्ज केले होते अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदानाची रक्कम जमा होईल.

विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या. आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *