आजच्या लेखामध्ये Holi information in marathi म्हणजेच होळीच्या सणाविषयी मराठी भाषेमध्ये माहिती जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये अनेक सण,उत्सव साजरे केले जातात. भारत हा विविधतेने नटलेले आहे. भारतामध्ये हा सण खूप थाटामाटात साजरा केला जातो.
महाराष्ट्रामध्ये अनेक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. अनेक धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. अनेक धर्म आणि प्रत्येक धर्माचे विविध सण आहेत. तसेच हिंदू धर्मामध्ये होळी ह्या सणाला विशेष महत्व आहे.
होळी हा सण भारतामध्ये विविध भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी ह्या सणाला होळी पोर्णिमा, होलीकादहन, होलिकोत्सव अशी अनेक नावे आहेत.
हिंदू धर्मामध्ये होळी ह्या सणांला खूप महत्व आहे. कोकणात होळी हा खूप महत्वाचा सण मानला जातो. होळीला महाराष्ट्रामध्ये शिमगा असेही म्हणतात.
हा लेख पण वाचा शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपयांचे अनुदान.
Holi information in marathi अशी साजरी केली जाते होळी.
होळी हा सण वसंताच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा केला जाणारा एक महत्वाचा एक सण आहे. अनेक भागात याला शिमगा पण म्हणतात.
बऱ्याच ठिकाणी होलिका दहन म्हणजेच होळी पेटवली जाते. हा सण मार्च महिन्यात म्हणजे मराठी महिन्यानुसार फाल्गुन महिन्यात येणारा उत्साहवर्धक सण आहे.
शेतात शिशिर ऋतुमुळे जमा झालेला कचरा शेतकरी बांधव जाळून टाकायचे.
शेत जमिनी त्यामुळे सुपीक होण्यास मदत होत होती. ग्रामीण भागामध्ये आजदेखील खेडेगावामध्ये फिरून गवऱ्या जमा करण्याची पद्धत सुरु आहे.
गवऱ्या तसेच वाळलेली लाकडे जमा करून संध्याकाळी होळी पेटवली जाते. गवऱ्या जाळल्याने हवा शुद्ध होते. होळीच्या दिवशी महाराष्ट्रात लाकडे मंत्रोच्चारात जाळली जातात. पेटलेल्या होळीच्या आजूबाजूला बोंबा मारून प्रदिक्षिणा मारली जाते. आणि पेटलेल्या होळीला पुरणपोळीचे नैवेध दाखवून नारळ अर्पण करण्याची प्रस्था आहे.
होळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा.
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन सण साजरा केला जातो. धुलीवंदनामुळे सर्व नागरिक एका ठिकाणी येतात. धुलीवंदनाच्या दिवसी एकमेकांना रंग लावला जातो. लहान लहान मुले पिचकारी मध्ये कलर भरून एकमेकांना रंगवून दिवसभर आनंद लुटतात.
मुलांचा होळी हा सर्वात आवडता सण आहे. होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत लहान लहान मुले जल्लोष साजरा करतात.
भारतीय शेतकरी होळीला विशेष महत्व देतात. होळीच्या निमित्ताने कृष्ण आणि बळीराम यांना आठवून त्यांचे पूजन मोठ्या आनंदात केले जाते. शेतात पिकलेल्या धान्याबाद्द्ल देवांचे आभार मानले जातात.
दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओम्ब्या भाजल्या जातात.
अशी आहे होळी सणाची आख्यायिका Holi information in marathi
होळी बद्दल विविध भागात विविध आख्यायिका प्रसीद्ध आहेत. त्यातीलच एका आख्यायिका नुसार प्रल्हाद हे विष्णू भगवान यांचे एक महान भक्त होते.
राक्षस हिरण्यकश्युप हे भक्त प्रल्हादचे वडील होते. हिरण्यकश्युप यांना विष्णूची भक्ती आवडत नव्हती. भगवान विष्णूवर भक्त प्रल्हाद यांची निस्सीम भक्ती होती त्यामुळे ते दिवसरात्र विष्णूची भक्ती करायचे. याच गोष्टीचा राग त्यांच्या वडिलांना येत होता.
म्हणून हिरण्यकश्युप यांनी भक्त प्रल्हाद यांना मारण्यासाठी होलीकादेवतेला पाठविले परंतु भगवान विष्णू यांनी त्याचा वध केला.
अग्नी सुद्धा जाळू शकणार नाही असा होलिकेला वर मिळालेला होता त्यामुळे भक्त प्रल्हाद यांना जाळण्यासाठी तिने भक्त प्रल्हादला सोबत आग्निकुंडात उडी घेतली. जेणेकरून भक्त प्रल्हाद खाक होईल परंतु भगवान विष्णूच्या भक्तीमुळे प्रल्हाद वाचले आणि होलिकेचाच त्यामध्ये तिचा वध झाला.
त्या आग्निकुंडात होलिकेचे दहन झाले आणि प्रल्हाद वाचले आणि होलिकेची आख्यायिका प्रसिद्ध झाली.
का साजरी केली जाते होळी Holi information in marathi
इतर सणाप्रमाणेच हा सण वाईटावर चांगल्याचा विजय होतो हे अधोरेखित करते.
अनेक राज्यात अनेक प्रकारे होळी सण साजरा केला जातो.
महाराष्ट्र राज्यामध्ये होळीची पूजा केली जाते. होळीच्या दिवशी सर्व घरी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. होळी पुढे कोणी नवस तर कोणी आपले गाऱ्हाणे मांडतात.
होळी हा रंगाचा सण मानला जातो आणि एकमेकांना रंग लावला जातो. होळीला बंजारा समाजात महत्वाचा सण म्हणून साजरा करतात. यामध्ये महिला पारंपारिक पोशाख परिधान करून नृत्य सादर करतात तसेच गाणी गातात.
राजस्थान राज्यस्थानमध्ये महिला आणि पुरुष एकमेकांवर गुलाल उधळून होळी मोठ्या उत्साहात साजरा करतात. गुजरात मध्ये तर होळी हा सण ५ ते ६ दिवस साजरा केला जातो.
होळी हा सण बंधुभाव, प्रेम आणि एकात्मतेचा अनोखा संदेश देणारा महत्वपूर्ण सण आहे.
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त.
होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होते आणि ह्या काळामध्ये भद्राची सावली नसते. होलिका दहन हे शास्त्रानुसार भद्राच्या अंशिक सावलीत करता येते. होळी पेटवण्याचा सर्वोत्तम काळ हिंदू धर्मशास्त्रानुसार संध्याकाळी २ तास २६ मिनिटाचा आहे.
होळीच्या शुभेच्छा holi marathi quotes.
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमच्या जीवनातील सर्व, संकटाचा नाश होवो.
होळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
आली आली होळी, घरी होते पुरण पोळी.
आनंदाच्या वातावरणात दुख जारे जाळी.
होळी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
अग्नीत होळीच्या जाळू सारे दुख
नवीन अंदाचे येईल आता सुख
होळीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा