मित्रांनो गुढीपाडवा माहिती मराठी भाषेमधून जाणून घेवूयात gudi padwa in marathi. गुढीपाडवा gudi padwa या सणापासून मराठी नूतनवर्षाला सुरवात केली जाते.
जेव्हा आपण एखादे कार्य करतो तेंव्हा त्यासाठी मुहूर्त बघावा लागतो पण गुढी पाडव्याला मुहूर्त बघायची गरज लागत नाही. कारण गुढी पाडव्याला मराठी वर्षाची सुरवात होते. म्हणूनच गुढीपाडवा सणाची माहिती मराठी भाषेमधून जाणून घेणे खूपच महत्वाचे आहे.
शेती संबधित विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. त्यासाठी येथे टच करा.
गुढीपाडवा माहिती मराठी gudi padwa information in marathi
महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा सण gudi padwa Festival शुभ महूर्त मानला जातो. महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हा एकमेव दिवस हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुभ मनाला जातो.
साडेतीन मुहुतापैकी हा एक मुहूर्त आहे जो की वेदांग जोतिष या ग्रंथात सांगितलेला आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि २ एप्रिल २०२२ या दिवशी हा दिवस साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा गुढी उभारून सादर केला जातो व त्या गुढीला मराठवाड्यातील महिला साडी व पिताळाचा तांब्या लाऊन गुढी उभी करतात.
आजच्या लेखामध्ये आपण गुढीपाडवा माहिती मराठी म्हणजेच gudi padwa mahiti marathi संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
पितळाच्या तांब्याला कुंकू लावून घाटी देखील बांधतात.
जेव्हा मराठी वर्षाचा हा पहिला दिवस येतो तेव्हा सर्वजण या दिवशी खूप छान गोडधोड पदार्थ बनून एकमेकांसोबत आनंदाने आपल्या नवीन वर्षाला सुरवात करतात.
पौराणिक कथा मध्ये असा उल्लेख केला जातो कि श्रीराम जेव्हा वनवासातून परत आयोध्येला आले होते तेव्हा पासून गुढी पडावा सण साजर केला जातो.
आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. त्यासाठी येथे टच करा.
गुढीपाडवा माहिती इतिहास gudi padva festival history
गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करतात.
गुढी पाडवा हा शब्द दोन शब्दानासून बनलेला आहे गुढी म्हणजेच विजय चिन्ह असा होतो आणि पाडवा या शब्दाचा अर्थ प्रतिपदा असा होतो.
पौराणिक कथा नुसार भगवान ब्रम्हानी या दिवशी विश्वाची निर्मिती केली या दिवशी भगवान ब्राम्हची विधिवत पूजा केली जाते.
महाष्ट्ररात त्याला गुढी पाडवा असे म्हणतात तर कर्नाटक व अन्द्रप्रदेशात त्याला उगादी असे देखील म्हटले जाते.
आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये जॉईन व्हा.
गुढीपाडवा माहिती मराठी पहा असा झाला गुढीपाडवा सणाचा उगम.
अनेकजण या दिवसाला शुभ दिवस मानतात व नवी खरेदी देखील करतात परंतु १६८९ मध्ये गुढी पाडव्याच्या आधल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराची निर्घुण हत्या करण्यात आली.
परिणामी हा दिवस राज्यासाठी अशुभ मानला जातो. तेलगु लोंकाच्या भाषेत गुढीचा आर्थ लाकूड किवा तोरण असा होतो तसेच लाकूड उभे करू उभारलेली कुटी किवा झोपडी यालाच हिंदीत कुंडी असे म्हणतात.
आणि यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असे मानले जाते. मराठवाड्यातील महिला गुढीला कडू लिंबाचे पाने पण लावतात. आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.
गुढीपाडवा सण सदृढ आरोग्याचे प्रतिक.
गुढी पाडव्याच्या दिवशी कडू लिंबाच्या पानांचे सेवन केले जाते त्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. कडू लिंबाचे पाने खाल्याने पचनास मदत होते.
चैत्र महिन्यामध्ये खूप जास्त उन्हाळा असतो अशावेळी तुम्ही जर’ अंघोळीच्या पाण्यामध्ये कडू लिंबाचे पाने टाकाल तर तुमच्या शरीराला थंडावा मिळू शकतो परिमाणी तुमचे आरोग्य चांगले राहू शकते.
गुढीवरील कलश हा मानवी मस्तक आणि बांबू हा शरीराचा किवा पाठीचा कणा दर्शवितो. भारतात असे मानले जाते की गुढी पाडव्याच्या दिवशी कोणत्याही कार्यास सुरवात केल्याने ते कार्य चांगल्या रीतीने पार पडतात.
नैसर्गिक दृष्टीने गुढीपाडवा सण महत्वाचा.
गुडीपाडवा सणाच्या अगोदरच्या एक दोन महिन्यामध्ये निसर्गामध्ये असा बदलाव होतो कि सर्व झाडांची पालवी आपोआप खाली पडते व त्यानंतर प्रतेक झाडाला नवीन पालवी येण्यास सुरुवात होते.
गुढीपाडव्याच्या दिवशी असे मानले जाते कि गरजू व्याकीना मदत केल्याने आपल्या घरातील कुटुंबाना सुख समृद्धी लाभते.
मोहनजोदड़ो व हडप्पा संस्कृतीच्या काळात देखील प्रत्येक घरावर उंच ठिकाणी दिवे लावलेले असत. लांबून दिसेल अशा ठिकाणी दिवे किवा पताका लावलेले असत. नंतरच्या काळात आकाश कंदील लावण्याची खूप जुनी परंपरा आहे.
गुढीपाडवा सणाच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध.
ब्रम्हदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली असल्याचे वाचनात आले आहे. मराठी माणसाच्या दृष्टीने आणखी महत्वाची बाजू म्हणजे याच दिवशी पंचागपूजा देखील केली जाते.
प्रभू श्रीराम चौदा वर्षे वनवास भोगून व लंकापती रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते ते याच म्हणजेच गुढी पाढवयाच्या दिवसी होय.
गुढीपाडवा हा दिवस वसंत ऋतूच्या पहिल्या महिन्यात साजरा केला जातो. पुराणातील काही कथा सुद्धा प्रसिद्ध आहे जसे कि भगवान शंकर आणि पार्वती देवींचे विवाह याच दिवशी म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशीच ठरला गेला .
गुढी पाडव्याच्या दिवसापासून लग्नाला सुरवात झाली आहे असे पुराणात लिहले गेले आहे.
गुढीपाडवा सण आपण सादर करत असलो तरी काही जणांना याविषयी माहिती नसण्याची शक्यता आहे. जसे की महाभारतात राजा इंद्राला दिलेले आदिपर्वत उपरीचर यांनी कालकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरवातीला पूजा केली. याच दिवसापासून गुढीपाडवा सण साजरा करण्यास सुरुवात झाली.
पारंपारिक सण उत्सव साजरे करण्याने आनंद निर्मिती.
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र राज्यात सर्व बांधव अतिशय आनंदाने साजरा करतात. गुढीपाडवा सणामागील इतिहास काय आहे हे जवळपास सर्वाना माहितीच असतो त्यामुळेच असे पारंपारिक सण साजरे करतांना जास्त आनंद निर्माण होतो.
आपली जुनी परंपरा पुढे अबाधितपणे सुरु ठेवायची असेल तर आपल्या सणाविषयी आपल्याला माहिती असायलाच हवी.
गुढी पाडवा ज्या दिवशी असतो त्या दिवशी पारंपारिक वेशभूषाचा वापर केला जातो.
त्यामध्ये महिला नवीन साड्या परिधान करतात जसे कि नऊवारी साडी, पैठणी, शालु तर पुरुष धोती आणि कुडता व डोक्याला पटका अशी वेशभूषाचा परिधान करून गुढीपाडवा सण साजरा करतात.
आधुनिकता जपताना पारंपारिक सण उत्सव जपणे देखील महत्वाचे.
या वर्षी गुढी पाडवा २ एप्रिल २०२२ या दिवशी साजरा केला जाईल अशी अशा करूयात कि या दिवशी प्रत्येक जण पारंपारिक वेशभूषा परिधान करून घराबाहेर पडेल.
गृहिणी आपल्या अंगणात मोठाल्या रांगोळ्या काढतील आणि आपल्या नवीन वर्षाच स्वागत करतील.
हल्ली बहुधा सगळ्यांकडेच स्मार्ट फोन, आयपॉड, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स आलेले आहेत. यामध्ये आपण आपल्या संस्कृतीला विसरून जाता कामा नये. कितीही तंत्रज्ञान आले तरी आपल्या भारताची संस्कृती सगळ्यात महान आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही. यामुळेच आपली ओळख जगभर आहे.
आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी असल्या कारणानेच आज पाश्च्यात्य देशातील नागरिक आपल्या देशात येवून योग विद्येचे शिक्षण घेत आहे.
योग हि भरताने सर्व जगाकरिता दिलेले सर्वात मोठे योगदान आहे ज्याद्वारे मानवाच्या आरोग्यामध्ये क्रांतीकरी बदल घडवून येवू शकतात.
त्यामुळे तंत्रज्ञान कितीही विकसीत झाले तरी काही बाबी ह्या अशा असतात ज्यांना बदले किंबहुना त्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे शक्य नसते.
तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेतले आहे कि कशाप्रकारे गुढीपाडवा सण साजरा केला जाते. गुढीपाडवा सणाचे महत्व काय असते. का आपण गुढीपाडवा सण साजरा करतो आणि का साजरा करायला हवा.