आजच्या लेखामध्ये Mukhyamantri rojgar yojana maharashtra म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात कि कशा प्रकारे बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता येवू शकतो.
लाभार्थी इय्यता ७ वी उत्तीर्ण असेल तर मिळू शकतात १० लाखापेक्षा आर्थिक सहाय्य मात्र २५ लाखावरील प्रकल्पासाठी १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. बेरोजगारांना रोजगार देणे हे शासनासाठी आव्हान झाले आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
पुढील योजना देखील बघा बांधकाम कामगारांना मिळणार घरकुल
Mukhyamantri rojgar yojana maharashtra बेरोजगारांसाठी उपयुक्त योजना
कशा प्रकारे Mukhyamantri rojgar yojana maharashtra योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत.
कोणता लाभ या योजनेतून बेरोजगार युवकांना मिळणार आहे हि आणि इतर महत्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हि माहिती अत्यंत काळजीपूर्वक वाचा आणि इतरांना देखील पाठवा.
महाराष्ट्र राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यामध्ये निर्माण होत असलेल्या रोजगार व स्वयं रोजगाराच्या नवनवीन संधी विचारात घेवून शासनाने हि सर्वसमावेशक योजना सुरु केलेली आहे.
पुढील योजना पण कामाची आहे असा करा PVC पाईप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
Mukhyamantri rojgar yojana maharashtra उद्दिष्ट
पुढील पाच वर्षामध्ये सुमारे १ लक्ष सूक्ष्म व लघु उपक्रम स्थापीत करणे. या उपक्रमाच्या माध्यमातून १० लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ज्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी सुटण्यास मदत होऊ शकते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रता खालीलप्रमाणे आहे.
- कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी.
- वयाची मर्यादा १८ ते ४५ वर्षे ( अनुसूचित जाती/ जमाती / महिला / अपंग / माजी सौनिक यांच्यासाठी ५ वर्षे वयोमर्यादा शिथिल असेल )
- वैयक्तिक मालकी, भागीदारी व बचत गट ज्यांना वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेली असावी.
- शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे १) लाभार्थी जर इयत्ता ७ उत्तीर्ण असेल तर १० आणि १० उत्तीर्ण असेल तर २५ लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते.
- पती पत्नी पैकी केवळ एकाच कुटुंबातील व्यातीस या Mukhyamantri rojgar yojana म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेता येईल.
पुढील योजना पण उपयोगाची आहे नवीन विहीर खोदकाम अनुदान
योजनेसाठी आर्थिक सहाय्य खालीलप्रमाणे राहील.
अनुसूचित जाती / जमाती / महिला / अपंग व माजी सैनिक
- स्वगुंतवणूक ५ टक्के
- देय अनुदान म्हजेच मर्जीन मनीशहरी २५% ग्रामीण ३५%
- बँक कर्ज शहरी ७०% ग्रामीण ६०%
उर्वरित प्रवर्ग
- स्वत: करावी लागणारी गुंतवणूक १०%
- अनुदान शहरी १५% ग्रामीण २५%
- बँक कर्ज ७५% ग्रामीण ६५%
पुढील माहिती पण बघा घरकुल बांधकाम यादी आली
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदार यांचा फोटो.
- अर्जदाराचा अधिवास दाखला.
- आधार कार्ड.
- शाळा सोडल्याचा दाखला.
- मार्कशीट.
- पॅन कार्ड.
- प्रोजेक्ट रिपोर्ट.
- अर्जदार जात प्रवर्गातील असेल तर जातीचा दाखला.
- घोषणापत्र किंवा हमीपत्र जोडावे.
हि योजना पण बघा बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार शिष्यवृत्ती
Mukhyamantri rojgar yojana maharashtra योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.
Mukhyamantri rojgar yojana maharashtra म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
- उद्योग संचालनालयाच्या वेबसाईटवर जा. वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी येथे क्लिक करा.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वेबसाईट ओपन होईल.
- व्यक्तीसाठी ऑनलाईन अर्ज असे एक निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज करा या बटनावर क्लिक करताच अर्ज ओपन होईल या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरून अर्ज सादर करा.
अर्ज कसा करावा या संदर्भातील सर्व सूचना ऑनलाईन अर्ज करतांना स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल त्यामुळे हा अर्ज करणे तुमच्यासाठी खूपच सोपे होणार आहे.
बऱ्याच जणांना हि माहिती थोडी किचकट वाटू शकते. तुम्हाला अजूनही हि माहिती समजली नसेल तर तुम्ही संबधित विभागाशी संपर्क साधू शकता.
खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या जिल्ह्यातील संबधित कार्यालयाशी संपर्क साधा. खालील लिंकवर क्लिक करताच तुम्हाला संबधित जिल्ह्याच्या कार्यालयाचे फोन नंबर व इमेल आयडी उपलब्ध होईल त्याद्वारे संबधित कार्यालयाशी संपर्क साधा. खाली काही महत्वाच्या लिंक दिलेल्या आहेत त्या देखील पहा.
पुढील योजना पण वाचा असे मिळते पाणी उपसा करण्यासाठी मोटर अनुदान
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संदर्भातील खालील महत्वाच्या बाबी पहा.
संपर्क यादी पहा
राज्य स्तरावर ही योजना राज्य KVIC संचालनालय, राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळे (KVIBs) आणि जिल्हा उद्योग केंद्रे (DICs) आणि बँकांमार्फत राबविण्यात येईल.
KVIC, Khadi & Village Industry Boards (KVIB) and District Industry Centres (DIC) are the implementing agencies in the States.
या योजनासंदर्भातील जी आर देखील वेबसाईटवर उपलब्ध आहे. जी आर म्हणजेच शासन निर्णय बघण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
योजनेचे मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच गाईडलाईन्स बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Mukhyamantri rojgar yojana maharashtra म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर करतांना घोषणापत्र देखील अपलोड करावे लागते. या घोषणापत्राचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे या योजनेसाठी एक प्रकल्प अहवाल तयार करावा लागतो. हा प्रकल्प अहवाल कसा असतो याचा नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Mukhyamantri rojgar yojana maharashtra madhe CSC center ani adhar center open karnyasathi yacha labh gheu shakto ka
Hi
Yes