Biyane anudan maharashtra बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु.

Biyane anudan maharashtra बियाणे अनुदानासाठी अर्ज सुरु.

Biyane anudan maharashtra संदर्भात माहिती जाणून घेवूयात. तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला शासकीय अनुदानावर बियाणे हवे असेल तर लगेच ऑनलाईन अर्ज करून द्या कारण बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

बियाणे खते योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर अनुदानावर बियाणे हवे असेल तर लगेच mahadbt वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून द्या.

पुढील योजना पण महत्वाची आहे बेरोजगारांसाठी मिळणार आर्थिक सहाय्य

Biyane anudan maharashtra संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.

शेतीमधील कामांची सध्या मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. पेरणीसाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. अशावेळी शेतकरी खते खरेदी करणे, बियाणे खरेदी करण्याच्या तयारीला लागलेले आहेत.

शासकीय अनुदानावर बियाणे घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांचा बराच खर्च शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यासाठी होत असतो. तुम्ही जर शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी केले तर नक्कीच तुमचा खर्च वाचेल.

पुढील योजनेची माहिती पण वाचा बांधकाम कामगारांना मिळेल घरकुल योजनेचा लाभ

Biyane anudan maharashtra ऑनलाईन अर्ज संदर्भात संपूर्ण माहिती.

शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या व खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. अशावेळी जर तुम्ही शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी केले तर नक्कीच तुमच्या खर्चाची बचत होऊ शकते.

बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर बियाणे कसे मिळते. बियाणे कोणत्या ठिकाणी मिळते या संदर्भातील संपूर्ण माहितीची लिंक देखील आपण खाली दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला या बियाणे अनुदान योजनेची माहिती समजून घेण्यास मदत मिळेल.

शासकीय अनुदानावर बियाणे खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज अतिशय सोपा असतो. अर्ज कसा करावा या संदर्भातील एक व्हिडीओ देखील या लेखाच्या सर्वात शेवटी देण्यात आलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही बियाणे खरेदी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

बियाणे अनुदानासाठी असा करा ऑनलाईन अर्ज.

खालील माहिती बियाणे अनुदानासाठी अर्ज कसा करावा या संदर्भात दिलेली आहे. याव्यतिरिक्त ऑनलाईन अर्जासंबधीची माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी एक व्हिडीओ देखील तयार करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही त्याप्रमाणे अर्ज सादर करू शकता. व्हिडीओ लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे.

Biyane anudan maharashtra
Biyane anudan maharashtra
  • mahadbt शेतकरी पोर्टलला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
  • लॉगीन करा.
  • लॉगीन केल्यावर अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  • दिसणाऱ्या अनेक योजनांपैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासामोरील बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारच्या बियाण्यांसाठी अर्ज करता येतो. १) पिक प्रात्यक्षिक बियाणे २) प्रमाणित बियाणे.
  • पिक प्रात्यक्षिक बियाण्यास १०० टक्के अनुदान दिले जाते
  • प्रमाणित बियाण्यांसाठी जास्तीत जास्त ५० टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.
  • बियाणे औषधे व खते योजनेचा अर्ज ओपन झाल्यावर योग्य ती माहिती भरा.
  • विविध पिकांसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
  • अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर अर्ज जतन करा या बटनावर क्लिक करा.
  • पहा या बटनावर क्लिक करून योजनेस प्राधान्य द्या.
  • अर्ज करा या बटनावर क्लिक करताच 23.60 एवढी फी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे.
  • दिलेल्या पेमेंटचा पर्याय वापरून पेमेंट करा.
  • पेमेंट पावतीची प्रिंट काढून घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही बियाणे अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. योजनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *