zilla parishad bharti 2022 जिल्हा परिषद भरती जी आर आला

zilla parishad bharti 2022 जिल्हा परिषद भरती जी आर आला

जाणून घ्या zilla parishad bharti 2022 संदर्भातील लेटेस्ट माहिती. अनेक तरुणांनी आरोग्य सेवक परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते. परीक्षेची तयारी देखील केली होती परंतु काही कारणास्तव हि परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांची प्रचंड निराशा झाली होती.

मार्च २०१९ मध्ये आरोग्य विभागाशी संबधित zilla parishad bharti आरोग्य सेवक व इतर पदांसाठी शासनाकडून जाहिरात देण्यात आली होती. दिलेल्या जाहिरातीनुसार तरुणांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज केले होते.

shetkari whatsapp group link
shetkari whatsapp group link

zilla parishad bharti 2022 लवकरच होण्याची शक्यता.

या परीक्षा घेणे त्यावेळेस शक्य झाले नसले तरी आता लवकरच जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतीतील गट क संवर्गातील परीक्षा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. zilla parishad bharti 2022.

ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ मध्ये प्रसिद्द झालेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज केले होते त्यांची परीक्षा आता लवकरच होऊ शकते कारण या संदर्भातील शासन निर्णय म्हणजेच जी आर नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा त्यासाठी येथे टच करा

zilla parishad bharti 2022 १३५१४ रिक्त पदे  भरली जाणार.

ज्यांनी मार्च २०१९ मध्ये ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशाच उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी नव्याने जाहिरात दिली जाणार नसून नवीन अर्ज देखील मागविले जाणार नाहीत असे देखील या जी आर मध्ये सूचित करण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाच्या विविध विविध विभागातील महत्वाच्या सेवेशी निगडीत पदभरती करण्यासंदर्भात यापूर्वीच मान्यता देण्यात आलेली आहे.

राज्यातील जिल्हा परिषदामधील गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा संदर्भातील सूचना १३ फेब्रुवारी २०१९ शासनाच्या शुद्धीपत्रकानुसार देण्यात आल्या होत्या. सर्व जिल्हा परिषदांमधील गट क मधील १८ संवर्गातील १३५१४ एवढे रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी २०१९ वर्षामध्ये जाहिरात देण्यात आली होती.

निवडणुका व महापोर्टल झाल्यामुळे पुढे ढकलली होती परीक्षा.

मध्यंतरी लोकसभा निवडणुका तसेच विधानसभा निवडणुका त्याचप्रमाणे महापोर्टल रद्द झाल्यामुळे वरील पदभरती अजूनही करण्यात आलेली नाही. परंतु आता लवकरच हि पदभरती केली जाणार आहे.

मार्च २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार हि पदभरती करण्यात येणार होती. परंतु यामध्ये खूप मोठ्या प्रमाणत अडथळे निर्माण झाले हे अडथळे खालीलप्रमाणे होते.

zilla parishad bharti 2022
zilla parishad bharti 2022
  • SEBC आरक्षण मा. न्यायालयाने रद्द केले.
  • कोरोना १९.
  • अनुकंपा नियुक्तीच्या पदसंख्येत वाढ.

व इतर कारणास्तव मार्च २०१९ व चालू वर्षातील रिक्त पदसंख्येत तफावत आढळून आली. आता यापुढे जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व रिक्त पदे जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरली जाणार आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय नुकताच म्हणजेच दिनांक १० मे २०२२ रोजी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित केलेला आहे.

जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबधित खालीलपदांसाठी होणार पदभरती

  • आरोग्य सेवक
  • आरोग्य सेविका.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
  • औषध निर्माता.
  • आरोग्य पर्यवेक्षक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *