ई पिक पाहणी ॲप्लिकेशन द्वारे तुमच्या पिकांची नोंदणी करून घ्या.

ई पिक पाहणी ॲप्लिकेशन द्वारे तुमच्या पिकांची नोंदणी करून घ्या.

शेतकरी बंधुनो ई पिक पाहणी ॲप्लिकेशन नवीन 3.1.5 वर्जन आले असून त्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून शेतातील पिकांची नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

E pik pahani mobile application ई पिक पाहणी ॲप्लिकेशनचा  उपयोग करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर करणे गरजेचे आहे.. इ पिक पाहणी मोबाईल ॲपचा E pik pahani उपयोग बऱ्याच शेतकऱ्यांनी केला असला तरी अजूनही बरेच शेतकरी असे आहेत ज्यांना हि पद्धत माहितीच नाही.

पुढील योजना पण पहा थेट कर्ज योजनेची रक्कम वाढली २५ हजाराहून मिळणार १ लाख रुपये पहा सविस्तर माहिती.

नवीन ई पिक पाहणी ॲप्लिकेशन 3.1.5 वर्जन

परंतु आता जर शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नोंद त्यांच्या सातबाऱ्यावर केली नाही तर अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळविण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते.

किंबहुना असे आवाहनच करण्यात आलेले आहे कि पिक विमा भरण्याआधी तुमच्या शेतातील पिकांची नोंद इ पिक पाहणी E pik pahani ॲपद्वारे द्वारे सातबाऱ्यावर करून घ्यावी.

शेतकऱ्यांनी शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करावा

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक

ई पिक पाहणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा.

गुगल प्ले स्टोरवर इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचे 1.0.0.7 उपलब्ध आहे. सध्या तरी गुगल प्ले स्टोरवर इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचे 3.1.5 वर्जन उपलब्ध नाही. परंतु लवकरच हे वर्जन उपलब्ध होऊ शकते.

खालील दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरील इ पिक पाहणी मोबाईल ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येईल.

E pik pahani mobile version 3.1.5 व E pik pahani mobile version 1.0.0.7 तुलना

इ पिक पाहणी 1.0.0.7 च्या तुलनेत 3.1.5 हे वर्जन खूपच सोपे आणि सुटसुटीत आहे. मागील वर्षी इ पिक पाहणी 1.0.0.7 च्या मदतीने त्यांच्या शेतातील पिकांची नोंद केली होती. कोणता शेतकरी कोणत्या शेतातून पिकांची नोंद करत आहे हे समजण्यास अवघड होते.

ई पिक पाहणी ॲप्लिकेशन

ई पिक पाहणी ॲप्लिकेशन चा उपयोग करून नोंदणी कशी करावी या संदर्भातील व्हिडीओ पहा.

3.1.5 या वर्जनमध्ये छायाचित्राचे अक्षांस रेखांश सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे अचूकता निर्माण होते.

चला तर आता जाणून घेवूयात कि हि पिक पाहणी आपल्या मोबाईलवरून कशी करावी.

  • सगळ्यात अगोदर दिलेल्या लिंकवर क्लिक करून नवीन इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या.
  • इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर मोबाईलचं सेटिंगमध्ये बदल करून इंस्टाल करून घ्या.
  • एकदा का हे इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन E pik pahani तुमच्या मोबाईल मध्ये इंस्टाल झाले कि मग तुम्हाला तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी करायची आहे.

इ पिक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन ३.१.५ च्या सहाय्यने पिकांची नोंदणी कशी करावी हे अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावे यासाठी खालील व्हिडीओ पहा. हे वर्जन debug apk आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *