थेट कर्ज योजना २५ हजारांएवजी आता मिळणार १ लाख रुपये कर्ज

थेट कर्ज योजना २५ हजारांएवजी आता मिळणार १ लाख रुपये कर्ज

जाणून घ्या थेट कर्ज योजना thet karj yojana संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखामध्ये. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते.

या योजना अंतर्गत लाभार्थींना याअगोदर २५ हजार रुपयापर्यंत कर्ज मिळत होते. आता कर्जाची मर्यादा वाढविण्यात आली असून हि कर्ज मर्यादा आता १ लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे loan scheme for business.

थेट कर्ज योजना direct loan scheme अंतर्गत कर्ज रक्कम वाढवून देण्यात आल्यासंदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर निर्गमित करण्यात आलेला आहे.

व्हॉटस्ॲप ग्रुप लिंक

दिनांक १ जुलै २०२२ रोजीचा शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.

शासन निर्णय पहा.

थेट कर्ज योजना direct loan scheme

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विविध योजना सुरु असतात. या योजनांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर या योजनांची अधिक माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

योजनेच्या अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.

दिनांक १ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर थेट कर्ज योजनेची रक्कम वाढविली असल्याचाच जी आर म्हणजेच शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. जाणून घेवूयात या योजनेविषयी अधिक माहिती.

पुढील योजना पण बघा व्यवसाय कर्ज योजना

महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो, या प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील कार्डमध्ये ज्यांची नावे आहेत अशा लाभार्थाना रोजगार उपलब्ध व्हावा हा या योजनेचा उद्देश आहे.

थेट कर्ज योजनेचा उद्देश

यापूर्वी या योजनेसाठी २५ हजार एवढे कर्ज मिळत होते. परंतु आता वाढलेली महागाई लक्षात घेता योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्यात आलेली आहे.

योजनेचा उद्देश

 • विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे.
 • वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांना या थेट कर्ज योजनेचा लाभ देवून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून आर्थिक सक्षमता प्रदान करणे.
 • विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थींना व्यवसाय करण्यासाठी तत्काळ कर्ज पुरवठा करून देणे.

खालील व्यवसाय सुरु करता येईल.

 • मत्स्य व्यवसाय.
 • कृषी क्लिनिक.
 • पावर टिलर.
 • हार्डवेअर व पेंट शॉप.
 • सायबर कॅफे.
 • संगणक प्रशिक्षण.
 • झेरॉक्स.
 • स्टेशनरी.
 • सलून.
 • ब्युटी पार्लर.
 • मसाला उद्योग.
 • पापड उद्योग.
 • मसाला मिरची कांडप उद्योग.
 • वडापाव विक्री केंद्र.
 • भाजी विक्री केंद्र.
 • ऑटोरिक्षा.
 • चहा विक्री केंद्र.
 • सॉफ्टटाईज विक्री केंद्र.
 • डीटीपी वर्क.
 • स्वीट मार्ट.
 • ड्राय क्लीनिंग सेंटर.
 • हॉटेल टायपिंग.
 • इन्स्टिट्यूट.
 • ऑटो रिपेरिंग वर्कशॉप.
 • मोबाईल रिपेरिंग गॅरेज.
 • फ्रिज दुरुस्ती.
 • ए.सी. दुरुस्ती.
 • चिकन मटन शॉप.
 • इलेक्ट्रिकल शॉप.
 • आईस्क्रीम पार्लर.
 • मासळी विक्री.
 • भाजीपाला विक्री.
 • फळ विक्री.
 • किराणा दुकान.
 • आठवडी बाजारामध्ये छोटेसे दुकान.
 • टेलिफोन बूथ किंवा अन्य तांत्रिक लघुउद्योग

वरील प्रकारचे लघु उद्योग लाभार्थी थेट कर्ज घेवून सुरु करू शकतात. विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थी जर निराधार विधवा महिला असेल तर अशावेळी लाभार्थींना तत्काळ लाभ दिला जावू शकतो.

थेट कर्ज योजनेचे स्वरूप. format of direct loan scheme

वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्याच्या थेट कर्ज योजनेचा उद्देश खालील प्रमाणे आहे.

 • प्रकल्प कर्ज – १ लाखापर्यंत मिळू शकेल.
 • महामंडळाचा सहभाग – १०० टक्के सहभाग.
 • व्याजदर आहे का – या थेट कर्ज योजनेसाठी कुठलाही व्याजदर नाही.
 • कर्ज परत फेड – थेट कर्ज योजना अंतर्गत जे कर्ज लाभार्थ्यास दिले जाणार आहे त्या कर्जाचे समान ४८ हफ्ते भारावे लागणार आहे.
 • कर्ज परत फेडीचा हफ्ता २०८५ एवढा असणार आहे.
 • जे लाभार्थ्यांकडून हफ्ता थकविला जाईल त्यांच्याकडून दंड म्हणून जेवढे हफ्ते थकविले जाईल त्यावर द.सा.स.शे. 4 टक्के व्याज आकारले जाईल.
 • पहिला हफ्ता ७५ टक्के मिळेल म्हणजेच ७५ हजार रुपये.
 • दुसरा हफ्ता २५ टक्क्याचा मिळेल परंतु हा हफ्ता मिळविण्यासाठी लाभार्थीला उद्योग सुरु करून ३ महिन्याचा कालावधी झालेला असावा. यासाठी जिल्हा व्यवस्थापक तपासणी पथक तपासणी करेल त्यानंतरच उर्वरित २५ हजार रुपये मिळतील.
थेट कर्ज योजना
direct loan scheme

योजनेसाठी लाभार्थी पात्रता. eligibility for thet karj yojana or direct loan scheme

 • लाभार्थी किंवा अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेस मागास प्रवर्गातील असावा.
 • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे.
 • वय १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे.
 • एकूण वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे.
 • कुटुंबातील एकच व्यक्ती या थेट कर्ज योजनेचा लाभ घेवू शकते.
 • अर्जदाराच्या बँक खात्यास आधार कार्ड लिंक असावे आणि त्याच खात्याचा तपशील अर्ज करतांना सादर करावा.
 • अर्जदाराकडे महामंडळाच्या कोणत्याही योजनेची थकबाकी नसावी.

वरील प्रकारे या थेट कर्ज योजनेसाठी पात्रता ठरवून देण्यात आलेली आहे government subsidy loan for business. अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला त्यांच्या संबधित जिल्ह्यातील कार्यालयास संपर्क साधायचा आहे. त्याच ठिकाणहून अर्ज देखील लाभार्थी घेवू शकतात.

योजनेच्या अधिक माहितीसाठी दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी काढण्यात आलेला जी आर पहा. जी आर बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

जी. आर. बघा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *