Maharashtra loan scheme थेट कर्ज योजना सुरु झाली असा घ्या लाभ.

Maharashtra loan scheme थेट कर्ज योजना सुरु झाली असा घ्या लाभ.

थेट कर्ज योजना maharashtra loan scheme योजनेचा लाभ घेवून बेरोजगार तरुण त्यांच्या व्यवसाय उद्योग सुरु करू शकतात. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. अशावेळी तुम्ही जर या थेट कर्ज योजनेचा maharashtra loan scheme लाभ घेतला तर तुम्हाला १ लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते आणि यामुळे नक्कीच तुमचा फायदा होऊ शकतो.

थेट कर्ज योजना कशी आहे. कोणते लाभार्थी यासाठी पात्र आहेत हि आणि इतर महत्वाची माहिती आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

Maharashtra loan scheme थेट कर्ज योजने portal सुरु

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभागाच्या वतीने www.msobcfdc.org हे नवीन portl सुरु करण्यात आलेले आहे. ओबीसी युवक-युवतींनी या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नुकतेच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने www.msobcfdc.org हे पोर्टल तयार करण्यात आले असून या वेबपोर्टलचे उद्घाटन देखील काही दिवसापूर्वीच करण्यात आलेले आहे.

 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग प्रवर्गातील युवक व युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याकरिता या ऑनलाईन पोर्टलचा उपयोग करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इतर मागासवर्ग

हि योजना पण कामाची आहे सौर उर्जा कृषी पंपाचे अर्ज पुन्हा सुरु.

maharashtra loan scheme थेट कर्ज योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे.

प्रवर्गातील परंपरागत व्यवसाय करत असलेल्या व्यक्तींना देखील या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेवून व्यावसायिक स्पर्धेत उतरता येईल.

कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लाभार्थींना महामंडळाच्या थेट कर्ज योजना व व्याज परतावा योजनेचा लाभ घेवून व्यवसायदेखील उभा करता येईल. 

तुम्ही जर ओबीसी किंवा इतर मागास प्रवर्गातील असाल तर नक्कीच या योजनाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो.

18 ते 50 वर्ष वयोगटातील इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना या थेट कर्ज योजना किंवा www.msobcfdc.org पोर्टलवर असलेल्या इतर योजनांचा लाभ घेता येवू शकतो.

पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजना maharashtra loan scheme details

  • २० टक्के बीजभांडवल योजना.
  • थेट कर्ज योजना १ लाख रुपयापर्यंत.
  • वैयक्तिक कर्ज योजना ( व्याज परतावा योजना )
  • गट कर्ज ( व्याज परतावा योजना )
maharashtra loan scheme
maharashtra loan scheme

थेट कर्ज योजना १ लाख रुपयापर्यंत योजनेचा तपशील

  • या योजनेसाठी अर्जदाराला कसलाही सहभाग हिस्सा भरावयाचा नाही.
  • अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे एवढे असावे.
  • अर्जदाराचा ५०० एवढा सिबिल क्रेडीट स्कोर असणे आवश्यक आहे.
  • एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी १ लाखापर्यंत असावे.
  • अर्जदाराने जर नियमितपणे ४८ समान मासिक हफ्यांमध्ये मुद्दल रुपये २०८५ तर कोणतेही व्याज भरावे लागणार नाही.
  • परंतु नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर जितके हफ्ते थकीत होतील त्या सर्व थकीत हफ्त्यांच्या रक्कमेवर दर साल दर शेकडा ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो.
  • ७५ हजार रुपयांचा पहिला हफ्ता मिळतो.
  • २५ हजार रुपयांचा दुसरा हफ्ता मिळविण्यासाठी प्रत्यक्ष उद्योग सुरु असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यानंतर ३ महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांची तपासणी होते. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर दुसरा २५ हजार रुपयांचा हफ्ता मिळतो.

थेट कर्ज योजना लाभार्थी पात्रता direct loan scheme

  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि तो इतर मगासवर्गीय असावा.
  • अर्जदाराने शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत किंवा निमशासकीय संस्थामधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असावे.
  • अर्जदाराने ज्या बँक खात्याशी आधार कार्ड सलग्न आहे त्या बँकेचे तपशील सादर करावेत.
  • जो व्यवसाय अर्जदार निवडेल त्या व्यवसायाचे त्यास ज्ञान असणे गरजेचे आहे.

अर्जासोबत जोडावयाचा कागदपत्रांचा तपशील.

  • महामंडळ वेबपोर्टलवर किंवा संगणक प्रणालीवर अर्जदाराची नाव नोंदणी आवश्यक आहे.
  • शिधापत्रिका प्रमाणित प्रत.
  • आधार कार्ड.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु आहे त्याची भाडे पावती.
  • करारनामा.
  • ७/१२ उतारा.
  • जन्म तारखेचा दाखला.
  • दोन जमीनदरांचे हमीपत्र.
  • स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्यवसाय करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र.
  • व्यवसाय सुरु करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र.
  • तांत्रिक व्यवसायासाठी लागणारे परवाण्याची प्रत.
  • प्रकल्प अहवाल.
  • कच्चा माल व यंत्र सामुग्रीचे दरपत्रक.

अर्ज करण्यासाठी खालील यंत्रणेशी संपर्क साधा.

वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे जमा करून अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिकृत वेबसाईट लिंक

अशा पद्धतीने व्यवसाय उभारण्यासाठी शासनाकडून तुम्हाला १ लाख रुपयांचे थेट कर्ज मिळू शकते. या योजनेचे स्वरूप कसे आहे. कागदपत्रे कोणकोणती लागतात. हि आणि इतर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे.

खालील बटनांचा उपयोग करून हि माहिती तुमच्या ग्रुपमधील इतरांना देखील पाठवा जेणे करून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *