शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार उपमुख्यमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार उपमुख्यमंत्र्यांची माहिती

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार उपमुख्यमंत्री यांची माहिती. सततच्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शेतकरी बांधवाना याबदल्यात नुकसान भरपाई मिळणार आहे crop loss compensation.

सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन winter session 2022 सुरु आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल.

मात्र हि नुकसानभरपाई देण्यासाठी काही यासाठी निकष ठरवले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यास मिळणार मदत

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये अतिवृष्टी अनुदानापासून वगळण्यात आलेल्या गावांबाबत सदस्य नारायण कुचे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.फडणवीस यांनी हि माहिती दिली आहे.

सततच्या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान जर झाले तर अतिवृष्टीग्रस्त परिसरातील पिकाच्या नुकसानीसाठी एनडीआरएफने दर ठरवून दिले आहेत. NDRF एनडीआरएफच्या दरानुसार शेतकरी बांधवांना पिक नुकसान भरपाई देण्यात येते.

नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील नवीन दर नुकतेच सरकारने घोषित केले आहेत. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकरी बांधवाना मदत देण्यात आली आहे एनडीआरएफच्या निकषात सततचा पाऊस ही संकल्पना नाही.

मदत देण्यासंदर्भात विमा कंपनीस निर्देश

तरी देखील सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत दिलेली आहे.

यापुढे मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आणि त्यांना या बदल्यात मदत द्यायची झाल्यास त्यासाठी काही निकष ठरविले जाणार आहेत.

हे निकष ठरविण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल आणि द्याव्या लागणाऱ्या मदतीसाठीचे निकष समितीमार्फत एक महिन्याच्या आत ठरविले जातील. 

तसेच पिक विमा कंपनीने किती नफा कमवावा या संदर्भात मर्यादा निश्चित करण्यासाठी नवीन धोरण आणण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी जी रक्कम दिली जाईल ती कमीत कमी१ हजार असावी तसा धनादेश शेतकरी बांधवास विमा कंपनीने देणे गरजेचे असल्याचे निर्देश देखील विमा कंपनीस देण्यात आलेले आहेत.

अशा प्रकारच्या सूचना संबधितांना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे शेतकरी बांधवाना त्यांच्या शेतातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची मदत मिळणे अधिक सोपे होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शेतकरी बांधवानी रब्बी पिक विमा उतरवून घ्यावा.

नैसर्गिक आप्प्तीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा आवश्य उतरवून घ्यावा.

रब्बी पिक विमा rabi crop insurance 2022 शेतकरी बांधवानी उतरवून घ्यावा

ऑनलाईन रब्बी पिक विमा कसा काढला जातो हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

अशा पद्धतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *