आता यापुढे पिक नुकसान भरपाई 30 दिवसात मिळणार नसता अधिकाऱ्यांच्या पगारातून व्याजाची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री यांनी नुक्तीची हिवाळी अधिवेशनामध्ये दिली आहे.
शेतकरी बांधवांसाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जातात परंतु या योजनांचा शेतकरी बांधवाना पाहिजे तसा लाभ मिळत नाही. योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना खूप वाट पहावी लागते.
शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शासनाकडून पिक नुकसान भरपाई देण्यात येते. पिक नुकसान झाल्यावर झालेल्या पिकांचे पंचनामे होऊन अनेक दिवस लोटतात परंतु शेतकऱ्यांना काही पिक नुकसानभरपाई मिळत नाही.
पुढील योजना पण पहा Pik nuksan bharpai yadi 2022 पिक नुकसान भरपाई यादी यादी पहा
पिक नुकसान भरपाई 30 दिवसात नसता भरपाईचे व्याज पगारातून कपात
याच बाबीचे महत्व लक्षात घेवून आता शेतकऱ्यांना ३० दिवसाच्या आत पिक नुकसानभरपाई नाही मिळाली तर पिक हानी भरपाईवरील व्याज अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात केले जाणार आहे.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी हि माहिती दिली आहे.
शेतामध्ये वन्य प्राण्याकडून जर शेतातील पिकांचे नुकसान झाले तर होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत शासन नवीन धोरण आखात आहे. पिक नुकसान झाल्यापासून ३० दिवसाच्या आत पिक नुकसानभरपाई मिळावी असा शासनाचा विचार असल्याची माहिती त्यांनी या अधिवेशनामध्ये त्यांनी दिली.
३० दिवसात भरपाई रक्कम मिळाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून व्याजाची रक्कम देण्यात येईल अशी माहिती देखील वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीला उत्तर
आमदार विनोद अग्रवाल यांनी याबाबत लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती त्यावर उत्तर देताना मंत्री मूनगंटीवार हि माहिती दिली आहे. शेतकरी बांधवांच्या पिकांचे जर नुकसान झाले तर शासनाकडून यापूर्वी हेक्टरी 25 हजार रुपये इतकी नुकसानभरपाई दिली जात होती.
मात्र आता ही रक्कम 70 हजार रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी बांधवाना नक्कीच फायदा होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवाना शेती करत असतांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. यामध्ये जर नैसर्गिक अप्पतीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले तर शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते.
शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढणे आवश्यक आहे. पिक विमा काढल्यास पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीस पिक नुकसानीचा क्लेम सादर करता येतो.
तर आता पिक नुकसान भरपाई 30 दिवसात मिळणार असल्याने शेतकरी बांधवाना याचा नक्की फायदा होणार आहे.