जाणून घेवूयात बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड योजना संदर्भातील सविस्तर माहिती.
बांधकाम कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जातो. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला देखील या योजनांचा लाभ मिळू शकतो.
बांधकाम कामगार नोंदणी केल्यावर कामगारांना कार्ड construction labor smart card मिळते.

बांधकाम कामगार कार्ड कसे मिळविले जाते या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हि माहिती संपूर्ण वाचा जेणे करून तुम्हाला बांधकाम कार्ड bandhkam card मिळू शकेल.
याशिवाय तुम्हाला जर ऑनलाईन बांधकाम नोंदणी कशी करायची हे माहित नसेल तर ती सुद्धा माहिती तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी येथे क्लिक करा.
कसे असते बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
ज्या प्रमाणे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असते अगदी त्याच आकाराचे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड असते. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हे कार्ड वितरीत केले जाते.
बांधकाम कामगार कार्डावर खालील माहिती असते.
- बांधकाम कामगारांचा नोंदणी क्रमांक.
- कामगाराचे नाव.
- लिंग.
- बांधकाम कामगाराची जन्म तारीख.
- भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल नंबर.
- बांधकाम कामगाराच्या कामाचा प्रकार.
- नोंदणीचे ठिकाण.
- जिल्हा.
वरील प्रकारची माहिती या स्मार्ट कार्डवर असते. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी हे कार्ड असणे महत्वाचे असते.
कामगारांना मिळणार ३२ योजनांचा लाभ पहा संपूर्ण माहिती.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड संदर्भातील सूचना.
- बांधकाम कामगार कार्ड जपून ठेवावे.
- हे स्मार्ट कार्ड म्हणजेच ओळखपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रत शुल्क भरून देण्यात येते.
- ओळखपत्र गहाळ झाल्यास त्वरित संबंधित जिल्हा कार्यालयास कळवावे.
- बांधकाम कामगार ओळखपत्र सापडल्यास कृपया खालील पत्त्यावर पाठवणे – मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, MMTC हाऊस पाचवा मजला ई ब्लॉक सी 22 बीकेसी बांद्रा पूर्व मुंबई.
महराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने हे स्मार्ट कार्ड दिले जाते.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
बांधकाम कामगार नोंदणी केल्यावर हे ओळखपत्र दिले जाते. कार्ड तयार झाल्यावर कामगाराच्या पत्त्यावर हे कार्ड पाठविले जाते. काही ठिकाणी जिल्हा बांधकाम कार्यालयातून बांधकाम कामगारांना कार्ड संदर्भात फोन केला जातो. बांधकाम कामगार कार्यालयास भेट देवून देखील हे कार्ड हस्तगत करू शकतात.
बांधकाम कामगार कार्ड काढण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील कामगार कार्यालयास भेट द्या. सोबत कामगार नोंदणी पावती असू द्या. संबधित अधिकारी साहेबांकडे या संदर्भात विचारणा केल्यावर तुम्हाला बांधकाम कामगार कार्ड मिळू शकते.
स्मार्ट कार्ड डाउनलोड करता येते का labour card download
सध्या तरी हे बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड bandhkam kamgar smart card download सुविधा उपलब्ध नाही. बांधकाम कामगार संदर्भातील विविध योजनाची माहिती, ऑनलाईन अर्ज नोंदणी व महत्वाची कागदपत्रे मात्र डाउनलोड करण्याची व्यवस्था बांधकाम कामगार मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
बांधकाम कामगार नोंदणी, विविध शासकीय योजना व इतर महत्वाच्या माहितीसाठी तुम्ही कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देवू शकता. खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देवू शकता.
अधिकृत वेबसाईट लिंक
ज्या व्यक्तीचे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झालेली आहे अशा व्यक्तींना बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळते.
विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी या कार्डचा उपयोग होतो.
तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाली कि जिल्हा बांधकाम कार्यालय येथे तुमच्या नावाचे बांधकाम कामगार स्मार्ट मिळते.
ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने बांधकाम कामगार नोंदणी करता येते. ऑफलाईन नोंदणी करायची झाल्यास बांधकाम कामगार कार्यालयास भेट द्यावी लागते.
बांधकाम कामगारांना एकूण ३२ शासकीय योजनांचा लाभ मिळतो. त्या संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे वाचून घ्या.